Thursday, September 16, 2021

वर्धापनदिन कराड पालिकेचा ; चर्चा सौरभ तात्यांची...

वेध माझा ऑनलाइन
कराड
कराड नगरपालिकेचा वर्धापनदिन नुकताच साजरा करण्यात आला यावेळी लोकशाही आघाडीचे गटनेते सौरभ पाटील यांनी या वर्धापनदिन सोहळ्याच्या निमित्ताने पालिकेच्या स्थापनेपासून शहरासाठी आपलं योगदान देणाऱ्या प्रत्येकाचे आभार व्यक्त केले व या मातृसंस्थेबद्दल ऋण व्यक्त करत नागरिकांच्या हितासाठी भविष्यात एकत्रित मिळून काम करू असे आवाहनदेखील याप्रसंगी केले त्यांनी व्यक्त केलेल्या या कृतज्ञतेची शहरात आजही चर्चा सुरू आहे

निमित्त होते येथील पालिका वर्धापनदिनाचे...

शहराच्या हितासाठी कोणतेही निमित्त असो... सौरभ तात्या तिथे असतातच...नुकत्याच सुरू असलेल्या गणेशोत्सवासाठी अगदी सुरुवातीपासून त्यांनी ग्राउंड वरती राहून शहरातील गणेश मंडळांसाठी केलेले प्रयत्न असोत...किंवा...शहरावर आलेल्या पावसाळ्यातील पुरासारख्या आपत्तीप्रसंगी तात्याची तत्परता पहायला मिळाल्याचे प्रसंग असोत...अशावेळी तात्या शहरासाठी पुढे असतातच...पहिल्यांदाच निवडून येऊन देखील जुन्या जाणत्या अनुभवी नगरसेवकाची प्रगल्भता त्यांच्यात आहे असे त्यांच्याशी बोलताना नक्कीच जाणवते... सौरभ तात्या शहराच्या कोणत्याही प्रभागाची समस्या सोडवण्यासाठी पुढे असतात...नगरसेवक शहराचा असतो केवळ आपल्या वार्डासाठी नव्हे अशी त्यांची वैचारिकता आहे...त्यांच्या एकूणच कामाची पद्धत व शहरासाठी झटण्याची प्रवृत्ती त्यांच्या भविष्यातील उत्तुंग नेतृत्वाची चुणूक नक्कीच दाखवते... जसा राजा तशी प्रजा... या उक्तीप्रमाणे त्यांचे सहकारी बेडेकरदादा,शिवातात्या,नगरसेवक मोहसीन आंबेकरी हे सर्वजण सातत्याने त्यांच्याबरोबर शहरासाठी दिवस रात्र झटताना दिसतात....पालिकेत सत्ता नसताना या लोकांचे समाजकार्य चर्चेत असते...हे कार्य करताना या सर्वांनी दिलेले योगदान प्रकर्षाने जाणवते...पालिका ही आपली मातृसंस्था आहे या भावनेने लोकसेवेचे व्रत अविरतपणे जागृत ठेवत आपली वाटचाल करताना तात्या आणि त्यांच्या टीम चे शहरात नेहमीच कौतुक होताना पहायला मिळते...नुकत्याच झालेल्या पालिकेच्या वर्धापनानिमित्त तात्यांनी आपली उपस्थिती लावून त्यादिवशी व्यक्त केलेल्या आपल्या मनोगतातून जनतेप्रति आपली बांधीलकी व कृतज्ञता दाखवून देत वाहवा मिळवली आणि त्याचीच चर्चा शहरात आजही सुरू आहे... 

पालिकेच्या झालेल्या वर्धापनानिमित्त बोलताना सौरभ तात्यांनी पालिकेच्या  स्थापनेपासून ते आत्तापर्यंत ज्यांनी ज्यांनी शहराच्या सेवेसाठी आपले योगदान दिले त्यांचे आभार मानले...  आपणही शहरासाठी एकत्र काम करून आदर्श घडवूया या विचाराने त्यांनी सर्वांना आत्मविश्वास देण्याचा आपल्या बोलण्यातून प्रयत्नही केला... त्यांची शहरासाठी अधिकाधिक काम करण्याची ऊर्मी त्यातून दिसली व त्यांना लोकांसाठी मोठं काम करायचय हेही जाणवले... नगरसेवक म्हणून निवडुन येऊन पालिकेच्या माध्यमातूंन जनसेवा करण्याचे भाग्य मिळाले त्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त करत सर्व शहरवासीयांचे आभारही मानले... यावेळी  लोकशाही आघाडीचे अध्यक्ष जयंत काका पाटील, नगरसेवक मोहसीन आंबेकरी, सभापती विजय वाटेगावकर, शिवाजी पवार तात्या, जयंत बेडेकर,  अख्तर आंबेकरी, गजेंद्र कांबळे, मुख्य अभियंता एम. एच. पाटील, अभियंता ए. आर. पवार, भालदार साहेब, मारुती काटरे, अभिजीत खवळे तसेच महिला अधिकारी, कर्मचारी उपस्थित होत्या...



No comments:

Post a Comment