वेध माझा ऑनलाइन
कराड
आप्पासाहेब नलावडे साखर कारखान्यात हसन मुश्रीफ यांनी 100 कोटींचा घोटाळा केला आहे, मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधातील ईडी कारवाईच्या भीतीनं माझ्यावर कारवाई करण्यात आली. मुश्रीफ यांच्या विरोधातील सर्व पुरावे ईडीला देणार आहे, असंही सोमय्या यांनी आज येथे झालेल्या पत्रकार परिषदेत सांगीतले . यासंबंधीचे पुरावे उद्या ईडी आणि इनकम टॅक्स विभागाकडे देणार आहे. या घोटाळ्याची चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. मी मुश्रीफ यांचा तिसरा घोटाळाही लवकरच उघडकीस आणणार आहे, असंही सोमय्या यावेळी म्हणाले
दरम्यान भाजप माजी खासदार किरीट सोमय्या त्यांनी राज्यातील ठाकरे सरकारवर देखील निशाणा साधला. उद्धव ठाकरे आणि गृहमंत्र्यांच्या इशारा वर माझ्यावर कारवाई झाली असून शरद पवारांचा सहभाग त्यासाठी महत्वाचा आहे असेही ते म्हणाले ठाकरे सरकारने माझी सुरक्षा काढून घेतली, मोदी सरकारने मला संरक्षण दिलं. राष्ट्रवादीच्या भाई लोकांकडून माझ्या जीवाला धोका आहे असंही सोमय्या यांनी म्हंटल आहे
No comments:
Post a Comment