कराड
राज्यात कोरोनामुळे नाट्यगृहे व सांस्कृतिक केंद्रे बंद अवस्थेत आहेत याला आता दोन वर्षे होऊन गेली तरी अद्याप सरकार कडून ती खुली होण्याबाबत ठोस निर्णय होत नाही त्यामुळे कला क्षेत्रावर अवलंबून असणाऱ्या कलाकार व कर्मचाऱ्यांवर अक्षरशः उपासमारीची वेळ आली आहे त्यामुळे आतातरी बंद असलेली राज्यातील सांस्कृतिक केंद्रे लवकरात लवकर सुरू करा अशी मागणी आज येथील यशवंतराव चव्हाण स्मृती सदन येथे कराड परिसरातील कलाकारांनी एकत्रित येऊन केली व सरकारचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला
कोरोनामूळे राज्यातील सिनेमागृह, नाट्यगृह बंद आहेत, कलेवर अवलंबून असणारे सर्व कलाकार व संबंधित कर्मचारी वर्गावर उपासमारीची वेळ त्यामूळे आली आहे राज्यातील संस्कृतीक केंद्रे खुली करण्यात येतील असे सरकारने काही दिवसांपूर्वी जाहीर करूनही ती खुली केली नाहीत त्यामुळे शहर व परिसरातील बहुतांशी कलाकारांच्या वतीने आज येथील टाऊन हॉल येथे एकत्रित येऊन राज्यातील सांस्कृतिक केंद्रे सुरू करा अशी एकत्रितपणे मागणी केली व सरकारचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला
यावेळी सिनेअभिनेते दिगदर्शक जुगलकिशोर ओझा, अभिनेते प्रशांत कुलकर्णी, कला दिगदर्शक वासू पाटील, सुप्रसिद्ध तमाशा कलावंत सिनेकलाकार नितिन बनसोडे, हेमंत पाटील, राम जोशी तसेच ओंकार आपटे, प्रमोद गरगटे, प्रदीप हर्षे, सुनिल परदेशी यासह अनेक नाट्यकर्मी यावेळी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment