भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सतत नव्यानव्या विधानांमुळे चर्चेत असतात. पुण्यात बोलताना त्यांनी केलेल्या एका नव्या विधानामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. मला माजी मंत्री म्हणू नका, दोन तीन दिवसांत कळेल, असं म्हणत राज्याच्या राजकारणात स्फोट होणार असल्याचे जणू त्यांनी संकेतच दिले आहेत.
माझा माजी मंत्री म्हणून उल्लेख करु नका, चंद्रकांतदादांच्या वक्तव्याने राजकारणात उलट सुलट चर्चा...
पिंपरी चिंचवड जवळील देहूगाव मधील एका खाजगी कार्यक्रमात मंचावरुन सूत्रसंचालकाने माजी मंत्री चंद्रकांत पाटील असा उल्लेख केला तेंव्हा माजी मंत्री म्हणू नका, दोन-तीन दिवसात कळेल, असं म्हणत राज्याच्या राजकारणात तीन दिवसांत संभाव्य भूकंप होणार असल्याचे संकेत पाटलांनी दिले. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य होतं.
चंद्रकांत पाटील यांच्या विधानामुळे मात्र राज्याच्या राजकारणात उलट सुलट चर्चा सुरु झाली आहे. तसंच पाटील यांच्या वक्तव्यानंतर तर्क-वितर्कांना उधाण आलंय. पाटील यांच्या बोलण्याच्या नेमका काय अर्थ असावा, याचे राजकीय कंगोरे उलगण्याचा बरेच जण प्रयत्न करत आहेत.
देहूत एका खाजगी दुकानाचे पाटलांच्या हस्ते उद्घाटन पार पडत होते. तेव्हा मंचावरील व्यक्ती वारंवार माजी मंत्री चंद्रकांत पाटील असा उल्लेख करत होती. तेव्हा ते पाटलांना माजी मंत्री म्हणू नका, दोन-तीन दिवसात कळेल,असं सूचक विधान करून चर्चेला उधाण आणलंय.
No comments:
Post a Comment