वेध माझा ऑनलाइन
कराड
कराड प्रीमियर लीग (के पी एल) क्रिकेट स्पर्धा मागील वर्षी यशस्वी पार पडली होती यंदाही कराड प्रीमियर लीग सीजन 2 लवकरच पार पडणार आहे या स्पर्धेच्या प्रवेश फॉर्मचे वाटप लोकशाही आघाडीचे गटनेते,नगरसेवक सौरभ पाटील (तात्या) यांच्या हस्ते आज करण्यात आले.
कराड शहरातील खेळाडूंच्या पाठीशी तात्या नेहमीच असतात त्यांना क्रिकेतसह प्रत्येक खेळाविषयी आस्था आहे वेगवेगळ्या खेळाबद्दल चांगली माहितीही आहे विशेषतः शहरातील तरुणांना हॉर्स रायडिंग बद्दल निरनिराळे प्रशिक्षण देण्यासाठी भविष्यात त्यांचे प्रयत्न राहणार आहेत असे त्यांनी अनेकदा बोलूनही दाखवले आहे दरम्यान या कराड प्रीमिअर लीग क्रिकेट स्पर्धेच्या प्रवेश फॉर्मचे वाटप आज त्यांच्या हस्ते करण्यात आले कराड प्रीमियर लीगचे शमनजीत आत्तार (सर).हणमंत घाडगे, मेहबुब शेख, जगदीश हिपलगर(जटाप्पा) संतोष तोडकर, नामदेव सावंत, अब्दुल आगा, लाला बागवान तसेच इतर अनेक खेळाडू यावेळी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment