वेध माझा ऑनलाइन
कराड
येथील पालिकेचे बांधकाम सभापती हणमंतराव पवार यांच्या पुढाकाराने आणि येथील पालिकेच्या सहकार्याने काल रविवार दिनांक 26 रोजी येथील दिवटे गल्लीतील चौंडेशवरी मंदिर याठिकाणी मोफत कोविड लसीकरण मोहीम राबविण्यात आली होती उद्या मंगळवार दिनांक 28 रोजी देखील सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत पुन्हा कोरोना लसीकरण मोहीम शहरातील नागरिकांसाठी दिवटे गल्ली येथे राबवली जाणार आहे अशी माहिती बांधकाम सभापती हणमंतराव पवार यांनी दिली आत्तापर्यंत एकूण तीन वेळा पवार मेहेरबान यांनी ही लसीकरण मोहीम पालिकेच्या सहकार्याने राबवली आहे आता चौथ्यांदा ही मोहीम ते उद्या (मंगळवारी) राबवणार आहेत अधिकाधिक लोकांनी या लसीकरणाचा लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले आहे
नगरसेवक हणमंतराव पवार यांनी कोरोना काळात रस्त्यावर उतरून लोकांना सगळ्या प्रकारे मदत केली आहे स्वतः घरोघरी जाऊन लोकांचे टेम्प्रेचर चेक करणे, रुग्णांना ऍडमिट करून बेड मिळवून देणे अशी लोकोपयोगी कामेही त्यांनी कोरोना काळात केली आहेत स्मशानभूमीत जाऊन कोविड योध्याचे मनोधैर्य वाढण्याचे काम देखील त्यांनी वारंवार केले आहे
शहरात पूरपरिस्थिती निर्माण झाली तेव्हा त्यांनी पाटण कॉलनीतील लोकांची सर्वतोपरी सहकार्य व सोय करून देण्यासाठी धडपड केली होती सामाजिक कार्यात नेहमीच पुढाकार घेऊन काम करणारे पवार मेहेरबान आता चौथ्यांदा कोविड लसीकरण मोहीम पालिकेच्या सहकार्याने राबवत आहेत शहरात त्यांच्या कामाचे कौतुक होते आहे
No comments:
Post a Comment