वेध माझा ऑनलाइन
कराड
येथील पालिकेचे आरोग्य सभापती गुंड्याभाऊ वाटेगावकर यांच्या पुढाकाराने आणि येथील पालिकेच्या सहकार्याने शहरातील शुक्रवार पेठेतील नामदेव मंदिर येथे आज मोफत कोविड लसीकरण मोहीम राबवण्यात आली ही लसीकरण मोहीम यशस्वी करण्याकरिता येथील नामदेव शिंपी समाज संस्थेचे मोठे योगदान मिळाले आहे
शहराच्या स्वच्छतेसह अनेक उपक्रमांमध्ये हिरीरीने सहभाग घेणारे मेहेरबान वाटेगावकर यांनी शहरातून होणाऱ्या प्रत्येक सामाजिक उपक्रमामधून आपला सहभाग नोंदवत आपले समाज्याप्रति असणारे कर्तव्य वेळोवेळी पार पाडण्याचा प्रयत्न केला आहे. नियमित नगरपालिकेत उपस्थित राहून कोणत्याही प्रभागातील लोकांना काहीही अडचण आल्यास पुढे होऊन ती सोडवताना त्यांना अनेकांनी पाहिल आहे. विशेष म्हणजे शहरातील असणाऱ्या प्रत्येक राजकीय पार्टीमध्ये त्यांचे एक विशेष स्थान आहे. शहरातील या राजकीय पार्ट्यांमधील सदस्यामध्ये ते असे काहीवेळा मिक्स झालेले दिसतात,जणू त्याच पार्टीचे सदस्य वाटू लागतात, हे त्यांचे वैशिष्ठय म्हणावे लागेल. त्यांनी मधल्या लॉक डाऊन काळात गरिबांच्या भावना ओळखून दिलेल्या योगदानाचे सर्वत्र कौतुक झाले.आज त्यांनी पुढाकार घेवून नामदेव शिंपी समाजाच्या मोठ्या सहकार्याने कोविड लसीकरण मोहिम राबऊन आपली सामाजिक बांधिलकी जपली आहेएकूण 250 हुन अधिक लोकांनी या लसीकरण मोहिमेचा लाभ घेतल्याचे वाटेगावकर यांनी सांगितले. नामदेव शिंपी समाज संस्थेचे ही मोहीम यशस्वी करण्याकरिता सर्व सहकार्य मिळाल्याचेही वाटेगावकर म्हणाले यावेळी डॉ शीतल कुलकर्णी नामदेव शिंपी समाजाचे संचालक संजय माळवदे, अतुल बारटक्के .बाळासाहेब माळवदे. संदीप कालेकर, संदीप खांडके, अनिल भांबुरे, सागर मिरजकर तसेच स्वयंसेवकही मोठ्या संख्येने उपस्थित होते
No comments:
Post a Comment