सातारा दि.10 (जिमाका): जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 433 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 3 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.
तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे आहे.
जावली 9 (9891), कराड 35 (38375), खंडाळा 12 (13960), खटाव 60 (24824), कोरेगांव 48 (21409), माण 29 (17259), महाबळेश्वर 8 (4621), पाटण 6 (10104), फलटण 96 (35794), सातारा 103 (50145), वाई 18 (15547) व इतर 9 (1972) असे आज अखेर एकूण 243901 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या कराड 1, माण 1 व फलटण 1 असे एकूण 3 असून आजअखेर जिल्ह्यामध्ये एकूण 6014 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 102 जणांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
*एकूण नमूने – 1904227*
*एकूण बाधित –243901*
*घरी सोडण्यात आलेले 231728*
*मृत्यू -6014*
*उपचारार्थ रुग्ण--9098*
0000
No comments:
Post a Comment