Sunday, September 19, 2021

नामदार बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते प्रीतिसंगमावर श्री गणेश आरती ; पालिकेकडून होणाऱ्या विसर्जन प्रक्रियेचे केले कौतुक...


वेध माझा ऑनलाइन
कराड
येथील प्रीतिसंगमावर आज अनंत चतुर्थी निमित्त गणेश विसर्जन होत आहे शहरातील घरगुती गणपतींसह सार्वजनिक मंडळाच्या गणेशमूर्तीचेही आज विसर्जन होत आहे मात्र यावर्षी कोविड च्या पार्शवभूमीवर येथील पालिकेच्या वतीने घरोघरी जाऊन गणेश मूर्तीं ट्रॅक्टर मधून एकत्रित संकलन करून त्या विधिवत पूजा करून विसर्जित केल्या जात आहेत या ठिकाणची पाहणी करण्याकरिता आज जिल्ह्याचे पालकमंत्री ना बाळासाहेब पाटील आले असता त्यांच्या हस्ते श्री गणेशाची आरती करण्यात आली त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला 

ते म्हणाले कोविड च्या पार्शवभूमीवर यावर्षी गणेशमूर्तींचे विसर्जन होत आहे कोरोनाचे सर्व नियम पाळून हे विसर्जन होत आहे मागील वर्षीपेक्षा यावेळी शिथिलता आहे तरी कोरोना अजूनही संपलेला नाही त्यामुळे सर्वांनी काळजी घेणे गरजेचे आहे पालिकेने ट्रॅक्टरच्या माध्यमातून गणपती मूर्ती संकलित करून त्या विसर्जित करण्याच्या प्रक्रियेचे त्यांनी यावेळी कौतुकही केले

No comments:

Post a Comment