Friday, December 31, 2021

राज्यातील १० मंत्री आणि २० आमदारांना कोरोनाची लागण : निर्बंध आणखी कठोर होणार ?

वेध माझा ऑनलाईन - गेल्या काही महिन्यांपासून कोरोना रुग्णसंख्येचा खाली येणारा आलेख आता पुन्हा वर जाऊ लागला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये पुन्हा एकदा कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसतेय. तर दुसरीकडे कोरोनाच्या डेल्टा विषाणूसह ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्याही वाढता दिसत आहे. काही दिवसांपूर्वी राज्यातील मंत्रिमंडाळातील काही मंत्र्यांनाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती.

राज्यातील १० मंत्री आणि २० आमदारांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. "जर यापुढेही राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत राहीली तर राज्य सरकार आणखी कठोर निर्बंध घालू शकते," असे संकेतही पवार यांनी दिले. अधिवेशनाच्या कालावधीत केवळ पाच दिवसांमध्ये १० मंत्री आणि २० आमदारांना कोरोनाची लागण झाली आहे. कालच राज्य सरकारनं कोरोनाची नवी नियमावली जाहीर केलीय लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी नियमांचं भान ठेवलं पाहिजे," असंही ते म्हणाले.

आज जिल्ह्यात 48 बाधीत, 5डिस्चार्ज

सातारा दि (जिमाका)
 जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यंत...
 जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 48 नागरिकांचे अहवाल  कोरोना बाधित आले तर 0 जणांचा मृत्यू झाला आहे तर 
5 जणांना आज डिस्चार्ज दिल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद यांनी दिली आहे

तालुकानिहाय कोरोना बधितांची संख्या पुढीलप्रमाणे...
जावली 2 कराड 9 खंडाळा 0 खटाव 3 कोरेगांव 1 माण0 महाबळेश्वर 0  पाटण 0 फलटण 4 सातारा 11 वाई 2  व इतर 9 आणि नंतरचे वाढीव 7 असे  आज अखेर एकूण 48 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत.  

जिल्ह्यात विविध रुग्णालयात... 
आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज  संध्याकाळपर्यंत  5 जणांना घरी  सोडण्यात आले आहे.

सातारा जिल्ह्यात 1 जानेवारी पासून नवीन आदेश जारी ; जिल्हाधिकारी

वेध माझा ऑनलाईन - राज्य शासनाच्या दि. 30 डिसेंबर २०२१ च्या आदेशानुसार  संपूर्ण राज्याकरिता नव्याने सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार सातारा जिल्हयाकरिता जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी 01जानेवारी पासून पुढील आदेश होईपर्यंत खालीलप्रमाणे आदेश पारित केले आहेत.

विवाह व विवाहाच्या अनुषांगिक सोहळयांचे बाबतीत, विवाह व त्या अनुषांगिक सोहळे बंदिस्त जागेत असो किंवा खुल्या मोकळया जागेत असो, त्यासाठी उपस्थितांची कमाल संख्या 50 व्यक्तींपर्यंत मर्यादित असेल. 
कोणताही मेळावा किंवा कार्यक्रम मग ते सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय किंवा धार्मिक इत्यादी सर्व प्रकारचे कार्यक्रम, बंदिस्त जागेत असो किंवा खुल्या मोकळया जागेत असो, याबाबतीत उपस्थितांची कमाल संख्या 50 व्यक्तींपर्यंत मर्यादित असेल.
अंत्यसंस्काराच्या बाबतीत, जास्तीत जास्त उपस्थितांची संख्या 20 व्यक्तींपुरती मर्यादित असेल.
जिल्हयातील पर्यटन स्थळे, मोकळी मैदाने अथवा जास्त गर्दी होणारी ठिकाणे तसेच लोकांच्या मोठ्या गर्दीला आकर्षित करणारी इतर ठिकाणे याबाबत संबंधित INCIDENT COMMANDER तथा उपविभागीय अधिकारी हे, या कार्यालयाकडून निर्गमित केलेल्या निर्बंधांव्यतिरिक्त आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन विभागाच्या दि.24 डिसेंबर २०२१ अन्वये आवश्यकतेनुसार फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू करु शकतात.
या कार्यालयाकडून यापूर्वी निर्गमित केलेल्या व अस्तित्वात असलेल्या इतर सर्व सूचना पुढील आदेशापर्यंत लागू राहतील.  
 कोविड अनुरूप वर्तनाचे नियम/धोरणे, वरील प्रमाणे असतील आणि त्यामध्ये विशेषरित्या नमूद न केलेले कोविड अनुरूप वर्तनाशी संबंधित असणारे इतर कोणतेही विषय/मुद्दे  या कार्यालयाकडून काढण्यात आलेल्या व अंमलात असलेल्या  प्रचलित नियमांनुसार/आदेशांनुसार असतील .
CONTAINMENT ZONE बाबत संबंधित INCIDENT COMMANDER तथा उपविभागीय अधिकारी हे ज्या ज्या वेळी स्वतंत्र आदेश काढून CONTAINMENT ZONE जाहीर करतील व सदर क्षेत्रामध्ये जे निर्बंध लागू करतील ते आदेश CONTAINMENT ZONE क्षेत्रास लागू राहतील.
या आदेशाची अंमलबजावणी करण्यास संबंधीतांनी टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधीतां विरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51 ते 60, व भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) कलम 188 नुसार तसेच भारतीय साथरोग अधिनियम 1897 अन्वये दंडनीय / कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 
00000

Thursday, December 30, 2021

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत सतीश सावंत यांचा पराभव झाल्यानंतर नितेश राणें म्हणतात... "गाडलाच'... अधिकृत फेसबुक पेजवरुन नितेश राणेंची पोस्ट व्हायरल...


वेध माझा ऑनलाईन - 
संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक मंडळाच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीची आज मतमोजणी पार पडली. या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला असून जिल्हा बँकेवर भाजपचाच झेंडा फडकला आहे. या निवडणूकीत अनेक दिग्गजांचं वर्चस्व पणाला लागलं होतं. परंतु, अनेकांना या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागल्याचं दिसत आहे. या निवडणुकीत केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि भाजप महाविकास आघाडीला धक्का देणार की, महाविकास आघाडीचे पॅनेल पुन्हा सत्ता ताब्यात ठेवणार याकडे लक्ष लागले होतं. आरोप-प्रत्यारोपांनी ही निवडणूक गाजली होती. त्यातच या निवडणूक प्रचारादरम्यान शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील प्राणघातक हल्ल्या प्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर आरोप झाले. त्यानंतर नितेश राणे अज्ञातवासात आहेत. परंतु, त्यांच्या अधिकृत फेसबुक पेसवरुन निवडणूक निकालांसंदर्भातील एक पोस्ट व्हायरल होत आहे. 
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत जोरदार चूरस रंगली होती. महाविकास आघाडीला 4 तर, भाजपला 4 जागा मिळाल्यात. कणकवलीत अटीतटीच्या लढतीत बँकेचे विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत पराभूत झालेत. सावंत आणि विठ्ठल देसाई यांना समसमान मतं मिळाल्यानं ईश्वर चिठ्ठीने निकाल जाहीर केला आणि नशिबाची साथ भाजपच्या विठ्ठल देसाईंना मिळाली. या निकालानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. सतीश सावंत यांचा पराभव झाल्यानंतर नितेश राणेंच्या अधिकृत फेसबुक पेजवरुन 'गाडलाच' या आशयाची एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. 

फेसबुक पोस्टमध्ये भाजप आमदार नितेश राणे सतीश सावंत यांच्या मानेवर उभे राहिले आहेत. या पोस्टरवर 'गाडलाच' असं कॅप्शन लिहिलं आहे. 





शाळा, कॉलेज, मॉल्स, चित्रपटगृह पुन्हा होणार बंद ?

वेध माझा ऑनलाईन
कराड
राज्यात करोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शुक्रवारी अर्थात ३१ डिसेंबरच्या मध्यरात्रीपासूनच निर्बंध लागू केले आहेत. यामुळे कार्यक्रमांसाठी एकत्र जमणाऱ्या लोकांची मर्यादा ५० करण्यात आली आहे. अंत्यविधीसाठी देखील २० लोकांचं बंधन घालण्यात आलं आहे. सध्या काही मोजक्याच गोष्टींवर निर्बंध घातले असले तरी या निर्बंधांमध्ये वाढ करण्याचा विचार राज्य सरकार गांभीर्याने करत आहे. यासंदर्भात गुरुवारी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत सविस्तर चर्चा झाली. यामध्ये शाळा, कॉलेज, मॉल्स, चित्रपटगृह यांच्यावरील संभाव्य निर्बंधांवर देखील खल झाला. तसेच, गंभीर परिस्थिती उद्भवल्यास लॉकडाऊनच्या पर्यायावर देखील चर्चा झाली.

आजपासून काय असतील निर्बंध?

राज्य सरकारने गुरुवारी रात्री उशिरा नवी नियमावली जाहीर केली आहे. यानुसार, खुल्या मैदान किंवा बंदिस्त सभागृहातील विवाह सोहळय़ांमध्ये फक्त ५० जणांच्या उपस्थितीला परवानगी असेल. सर्वच राजकीय, धार्मिक, सामाजिक कार्यक्रमांत फक्त ५० लोकांनाच सहभागी होण्यास परवानगी असेल. ही संख्या खुल्या किंवा बंदिस्त सभागृहांमधील कार्यक्रमांना लागू असेल. तसेच, अंतिम विधीसाठी स्मशानभूमीत फक्त २० लोकांनाच परवानगी देण्यात आली आहे. चौपाट्या, पर्यटन क्षेत्रे येथे गर्दी टाळण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आवश्यकता भासल्यास स्थानिक प्रशासनाने चौपाट्या, समुद्रकिनारे बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

ओमायक्रॉन आणि कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ ; टास्क फोर्सच्या बैठकीनंतर राज्यात आजपासून निर्बंध लागू

वेध माझा ऑनलाईन- गेल्या काही दिवासांपासून राज्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यातच ओमायक्रॉनबाधित रुग्णांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. त्यामुळेच चिंतेत वाढ झाली आहे. आरोग्य विभाग, टास्क फोर्स यांच्यातील झालेल्या बैठकीनंतर राज्यात निर्बंध लावण्यात आले आहेत. आजपासून निर्बंध लागू करण्यात आले आहेत. सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय कार्यक्रम आणि लग्नसोहळे फक्त 50 लोकांच्या उपस्थितीत करता येणार आहेत. तर अंत्यसंस्कारासाठी 20 लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे.  पर्यटनस्थळावर जमावबंदी लागू कऱण्यात आली आहे. स्थानिक प्रशासनाला कडक निर्बंध लावण्याची मुभा देण्यात आली आहे. 


सरत्या वर्षाला निरोप देण्याची तयारी सुरू असताना दुसरीकडे कोरोनाने नागरिकांची चिंता वाढवली आहे. मुंबईसह राज्यात पुन्हा एकदा कोरोनाबाधितांची वाढ होऊ लागली आहे. ओमायक्रॉनबाधितांच्या संख्येत वाढ झाल्याने प्रशासनाच्या चिंतेत आणखीच भर पडली आहे. सरत्या वर्षाला निरोप देण्याची तयारी सुरू असताना दुसरीकडे कोरोनाने नागरिकांची चिंता वाढवली आहे. मुंबईसह राज्यात पुन्हा एकदा कोरोनाबाधितांची वाढ होऊ लागली आहे. ओमायक्रॉनबाधितांच्या संख्येत वाढ झाल्याने प्रशासनाच्या चिंतेत आणखीच भर पडली आहे. त्यामुळे गुरुवारी झालेल्या बैठकीनंतर राज्यात निर्बंध लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

काय आहेत निर्बंध?

सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय कार्यक्रम आणि लग्नसोहळे फक्त 50 लोकांच्या उपस्थितीत
अंत्यसंस्कारासाठी 20 लोकांची उपस्थिती
पर्यटनस्थळावर जमावबंदी
कोरोनाबाबत आधीचे निर्बंधही कायम राहतील.

ओमायक्रॉनमुळे समुह संसर्ग सुरू झाल्याची भीती व्यक्त ! ; आज राज्यात आढळून आले 198 रुग्ण

वेध माझा ऑनलाईन - राज्यात एकीकडे कोरोनाचे रुग्ण वाढत आहे तर दुसरीकडे कोरोनाचा नवीन व्हेरिएंट ओमायक्रॉनचे रुग्ण सुद्धा वाढत आहे. मुंबई, पुण्यासह विदर्भ, मराठवाडा आणि नाशिकमध्येही ओमायक्रॉनचा शिरकाव झाला आहे. त्यामुळे ओमायक्रॉनमुळे समुह संसर्ग सुरू झाल्याची भीती वर्तवली जात आहे. आज राज्यात 198 रुग्ण आढळून आहे. तर एकूण रुग्णांची संख्या 450 वर पोहोचली आहे.

राज्याच्या आरोग्य विभागाने कोरोनाबाधित रुग्ण आणि ओमायक्रॉनबाधित रुग्णांची माहिती दिली आहे. गेल्या 24 तासांमध्ये राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी 198 रुग्ण आढळून आले. धक्कादायक म्हणजे, यामध्ये फक्त 30 जण परदेशातून आलेले आहे. त्यामुळे ओमायक्रॉनचा फैलाव होत असल्याचे समोर आले आहे.

मुंबई लॉक डाऊनच्या उंबरठ्यावर ?

वेध माझा ऑनलाईन
एकीकडे नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पार्ट्यांचं आयोजन केलं जात आहे, तर दुसरीकडे कोरोना  पुन्हा एकदा डोकं वर काढत आहे. मुंबईमध्ये गेल्या तीन दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. आज पुन्हा कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही 3 हजाराच्या पुढे गेली आहे.

मुंबई महापालिकेच्या शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची माहिती प्रसिद्ध केली आहे. या माहितीनुसार, गेल्या 24 तासात मुंबईमध्ये तब्बल 3671 नवे रुग्ण आढळले आहे. मागील तीन दिवसातली ही सर्वाधिक संख्या आहे. तर 371 रुग्ण आज बरे झाले आहे.
दोन दिवसांपासून मुंबईत कोरोनाबाधित संख्या वाढत आहे. मंगळवारी सुद्धा मुंबईमध्ये एकाच दिवशी कोरोनाची धक्कादायक आकडेवारी समोर आली. एकाच दिवसात 2172 रुग्ण आढळले होते. 2172 पैकी 1377 रुग्ण एकट्या मुंबईत होते.  तर बुधवारी एकाच दिवसामध्ये कोरोनाचे 2510 नवे रुग्ण आढळून आले होते.

राज्यात येत्या 2 दिवसात कठोर निर्बंध ? राज्यात आज साडेपाच हजारच्या घरात सापडले रुग्ण... मुंबईत सापडले साडेतीन हजार...!

वेध माझा ऑनलाईन - राज्यात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा झपाट्याने वाढत आहे. राज्यात आज साडे पाच हजाराच्या घरात नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर एकट्या मुंबईत साडे तीन हजारापेक्षा अधिक रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यात कठोर निर्बंध  लागण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आज टास्क फोर्सची बैठक पार पडली. या बैठकीत कोरोना निर्बंधांसह, संभाव्य धोका आणि उपाययोजनांबाबत चर्चा झाल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे  यांनी दिली आहे. तसंच नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर टोपे यांनी जनतेला महत्वाचं आवाहन केलं आहे.

‘कठोर निर्बंधांबाबत आज, उद्यामध्येच निर्णय’
राज्यातील रुग्णवाढ ही चिंता वाढवणारी आहे. टास्क फोर्सच्या बैठकीत महत्वाची चर्चा झाली. कठोर निर्बंधांबाबत अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील. तो निर्णय आज उद्यामध्येच घेतला जाईल, अशी माहिती टोपे यांनी टास्क फोर्सच्या बैठकीनंतर दिली आहे. ‘हे नक्कीच आहे की गर्दी टाळलीच पाहिजे. गर्दी नको कारण त्यामुळे संसर्ग झपाट्याने वाढेल. टेस्टिंग संदर्भात एसजीटीएफ हे कीट आहे. त्यातून ओमिक्रॉनचं डिटेक्शन होतं. ते किट वापरलं जावं, त्यामुळे डेल्टा व्हेरियंटचे रुग्ण किती आणि ओमिक्रॉन व्हेरियंटचे रुग्ण किती हे समजेल. तर ट्रिटमेंटवर ‘मोनोपिरॅमिल’ हे केंद्र सरकार आणि महाराष्ट्रातील टास्क फोर्सनं मान्य केलेलं अॅन्टी व्हायरल ड्रग आहे. त्याची मागणी आणि पुरवठा याबाबत सविस्तर चर्चा झाली, अशी माहितीही टोपे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

आज जिल्ह्यात 21 बाधीत,14 डिस्चार्ज

सातारा दि (जिमाका)
 जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यंत...
 जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 21 नागरिकांचे अहवाल  कोरोना बाधित आले तर 0 जणांचा मृत्यू झाला आहे तर 
14 जणांना आज डिस्चार्ज दिल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद यांनी दिली आहे

तालुकानिहाय कोरोना बधितांची संख्या पुढीलप्रमाणे...
जावली 1 कराड 2 खंडाळा 1खटाव 3 कोरेगांव 0 माण0 महाबळेश्वर 3  पाटण 0 फलटण 4 सातारा 4 वाई 0 व इतर 1 आणि नंतरचे वाढीव 2 असे  आज अखेर एकूण 21 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत.  

जिल्ह्यात विविध रुग्णालयात... 
आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज  संध्याकाळपर्यंत  14 जणांना घरी  सोडण्यात आले आहे.

नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला ; त्यांना आता कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता...

वेध माझा ऑनलाईन - भाजपला सिंधुदुर्गात खूप मोठा झटका बसला आहे. सेशन कोर्टाने भाजप आमदार नितेश राणे  यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. कोर्टात गेल्या दोन दिवसांपासून नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर सुनावणी सुरु होती. अखेर कोर्टाने शिवसेनेचे कार्यकर्ते संतोष परब  यांच्या हल्ल्याप्रकरणी नितेश राणे यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. विशेष म्हणजे कोर्टाने याप्रकरणी आज सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीतील उमेदवार मनीष दळवींचा अंतरिम जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर नितेश राणे यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे नितेश राणे यांना आता कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.

कोर्टाची सुनावणी संपल्यानंतर नितेश राणे यांचे वकील संग्राम देसाई यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. "हायकोर्टात जाण्याचा नक्कीच एक पर्याय आहे. आम्ही चर्चा करुन निर्णय घेऊ. शक्यतो आम्ही हायकोर्टातच जाऊ. मोबाईल फोन जप्त करायचे आहेत. त्यासाठी कस्टडीची गरज असल्याचं न्यायाधीशांनी सांगितलं आहे. या व्यतिरिक्त कोणतंही कारण सांगितलेलं नाही. हायकोर्टात याप्रकरणी उद्या अर्ज दाखल करु. मध्ये शनिवार-रविवार सुट्टी असल्याने निश्चितच सोमवारी किंवा मंगळवारी या प्रकरणावर सुनावणी होईल. अटकपूर्व जामीनासाठी आम्ही कोर्टात अर्ज केला आहे. त्यामुळे आम्हाला अटकेपासून दूर राहण्याचा कायदेशीर अधिकार आहे. हायकोर्टात जायचं नसेल तर आमच्याकडे सरेंडर होण्याचा पर्याय आहे. याशिवाय नितेश राणे यांनी पोलिसांना तपासात पूर्णपणे सहकार्य केलेलं आहे. यापुढेदेखील आम्ही मदत करु", असं वकील संग्राम देसाई यांनी सांगितलं

जयवंत शुगर्सवर ऊसतोडणी मजुरांचे लसीकरण

वेध माझा ऑनलाईन
कराड
येथील जयवंत शुगर्स कारखान्याच्यावतीने कारखाना कार्यस्थळावर ऊसतोडणीसाठी आलेल्या मजुरांसाठी नुकतीच कोविड-१९ प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिम राबविण्यात आली. कारखान्याचे संस्थापक डॉ. सुरेश भोसले, चेअरमन चंद्रकांत देसाई व प्रेसिडेंट चारुदत्त देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी कारखाना प्रशासनासमवेत ऊसतोड मजुरांच्या प्रत्यक्ष खोपीवर जाऊन लसीकरण केले.

याप्रसंगी कारखान्याचे सरव्यवस्थापक एन. एम. बंडगर, केन मॅनेजर नाथाजी कदम, चिफ अकौटंट आर. के. चन्ने, विशेष कार्यकारी अधिकारी आर. टी. सिरसाट, ई.डी.पी. मॅनेजर ए. एल. काशीद, मुख्य शेतकी अधिकारी आर. जे. पाटील, एच. आर. मॅनेजर एस. एच. भुसनर, स्टोअर किपर जी. एस. बाशिंगे, पर्चेस ऑफिसर पी. एस. जाधव, इन्स्ट्रुमेंट मॅनेजर ए. बी. खटके, सुरक्षा अधिकारी जे. पी. यादव, एस. व्ही. शिद, केनयार्ड सुपरवायझर एस. एम. सोमदे, ए. एम. गोरे आदी उपस्थित होते. 
 

कृष्णा हॉस्पिटलमध्ये ९५ वर्षाच्या वृद्ध महिलेवर बायपास शस्त्रक्रिया यशस्वी...

वेध माझा ऑनलाईन - येथील कृष्णा हॉस्पिटलच्या हृदय शस्त्रक्रिया विभागात एका ९५ वर्षाच्या वृद्ध महिलेवर नुकतीच बायपास शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली. एवढ्या वयस्कर महिलेवर यशस्वी शस्त्रक्रिया केल्याबद्दल कृष्णा हॉस्पिटलच्या डॉक्टर्सचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.
          
माण तालुक्यातील जाशी येथील रहिवासी असलेली ९५ वर्षीय वृद्ध महिला छातीत दुखू लागल्याने कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल झाली होती. याठिकाणी त्यांच्यावर डॉ. विजयसिंह पाटील यांनी ॲन्जिओग्राफी केली असता, त्यांच्यावर बायपास शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. खरंतर एवढ्या वयस्कर महिलेवर बायपास शस्त्रक्रिया करणे जोखमीचे असते. पण कृष्णा हॉस्पिटलमधील हृदय शस्त्रक्रिया विभागप्रमुख डॉ. प्रवीण साळुंखे यांनी हे आव्हान स्विकारून या महिलेवर यशस्वी बायपास शस्त्रक्रिया केली. तसेच ही शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत करण्यात आली. या महिलेची प्रकृती आता ठीक असल्याने तिला नुकताच रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. 

शस्त्रक्रिया यशस्वी केल्याबद्दल कृष्णा हॉस्पिटलच्या हृदयशस्त्रक्रिया विभागातील डॉ. प्रवीण साळुंखे, भूलतज्ज्ञ डॉ. सम्राट मदनाईक, हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अभिजीत शेळके, डॉ. विजयसिंह पाटील यांचे कृष्णा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले यांनी अभिनंदन केले.

कृष्णा हॉस्पिटलच्या हृदय व रक्तवाहिन्या शस्त्रक्रिया विभागात तज्ज्ञ डॉक्टरांच्या मदतीने व अत्याधुनिक उपचार प्रणालीचा वापर करत यापूर्वीही अनेक अवघड शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आल्या आहेत. विशेषत: कोविड-१९ च्या लॉकडाऊन काळात ८५ हून अधिक हृदय व रक्तवाहिन्यांशी संबंधित शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आल्या आहेत. यातील बहुतांश शस्त्रक्रिया मोफत केल्याने त्याचा रूग्णांना मोठा लाभ झाला आहे.
 

राज्यातील निर्बंध आणखी कडक करण्याबाबत अजितदादांनी दिले संकेत...

वेध माझा ऑनलाईन-कोरोनाचा धोका जास्त वाढल्याने महाविकास आघाडी सरकार आता कडक पाऊल उचलणार आहे. राज्यातील निर्बंध आणखी कडक करण्याचे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. कोरोना बाधित आणि कोरोना रुग्णसंख्या वाढल्यास निर्बंध कडक करणार असल्याचे अजित पवार म्हणाले.

त्याचवेळी कोरोनाचे नियम पाळले नाही तर लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज टास्क फोर्सशी चर्चा करणार आहेत. त्यामुळे त्यानंतर कोविड नियमाबाबत पुढेचे पाऊल उचलण्यात येणार आहे. मात्र, त्याआधीच अजित पवार यांनी कडक नियम करण्याचे संकेत दिलेत.
मुंबई, पुण्यात रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे खबरदारी घ्यावी लागेल. राजकीय नेत्यांनीही कोविड नियमांचं पालन करणे गरजेचे, असे अजित पवार म्हणाले. तसेच जोपर्यंत कोरोनाचे संकट दूर होत नाही तोपर्यंत महापालिका निवडणूक न घेण्याचा निर्णय सर्व पक्षांनी एकमताने घेतला आहे.
कोरोनाच्या केसेस वाढल्या नंतर निर्बंध हे कडक करावेच लागतील. संसर्ग आधीपेक्षा अधिक वेगाने वाढत आहे. त्यामुळे काळजी घ्यावी लागणार आहे .केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून जारी करण्यात आलेल्या निर्बंधांचे पालन करावे लागणार आहे. ओमायक्रोनचा समूह संसर्ग सुरू झालाय, अशी चर्चा आहे. मात्र त्याबद्दल ठोस माहिती नाही. या विषयात तज्ज्ञांसोबत चर्चा करणार आहे, असे अजित पवार म्हणाले.

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून खून नराधम आरोपी जेरबंद : सातारा जिल्ह्यात खळबळ

वेध माझा ऑनलाईन - रवले-सुतारवाडी ता. पाटण येथे सात वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिचा खून केल्याची संतापजनक घटना घडली आहेत. याप्रकरणी पाटण पोलिसांनी नराधम आरोपींला ताब्यात घेतले असून या घटनेने पाटणसह सातारा जिल्हा आणि राज्यभरात खळबळ उडाली आहे. 

         संतोष थोरात असे पोलिसांनी याप्रकरणी ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.  दरम्यान, या घटनेने रवले- सुतारवाडीसह ढेबेवाडी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून त्याठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 

          याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, पाटण तालुक्यातील रवले-सुतारवाडी येथील पीडित मृत अल्पवयीन मुलगी बुधवारी 29 रोजी सायंकाळी बेपत्ता झाली होती. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत संबंधित मुलीच्या कुटुंबीय, नातेवाईकांनी शोध घेतला. परंतु, ती मिळून आली नाही.  गुरुवारी पहाटे 2.30 वाजण्याच्या सुमारास रवले- सुतारवाडी येथे घटनेतील पीडित मृत मुलीच्या घरापासून सुमारे 500 मीटर अंतरावर ओढ्यात तिचा मृतदेह आढळून आला. 

         याबाबतची माहिती मिळताच ढेबेवाडी, पाटण पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तसेच गुरुवारी 30 रोजी सकाळी जिल्हा पोलीस प्रमुख अजय कुमार बंसल, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे किशोर धुमाळ, कराड उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. रणजीत पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. 
 
           दरम्यान, पोलिसांनी संशयित आरोपी संतोष थोरात याला पाटण पोलिसांनी ताब्यात घेतले असून परिसरात तणावपूर्ण वातावरण आहे. या घटनेने ढेबेवाडी परिसरासह पाटण, सातारा जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

पत्रकारांनी विचारले नितेश राणे कुठं आहेत...नारायण राणे म्हणाले... हे सांगायला आम्ही मूर्ख आहोत का...?

वेध माझा ऑनलाईन-  केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना कणकवली पोलिसांनी नोटीस बजावली असून, 3 वाजता हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. राणे यांना काल झालेल्या पत्रकार परिषदेत नितेश राणे कुठे आहेत, असा सवाल विचारण्यात आला होता. तेव्हा त्यांनी हे सांगायला आम्ही मूर्ख आहोत का, असं उत्तर दिलं होतं. आता याबाबतच पोलिसांनी राणेंना नोटीस बजावली असून, त्यांच्याकडून नितेश राणेंची माहिती घेण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

नेमकं प्रकरण काय?
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत यांचे निकटवर्तीय असलेल्या संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणात भाजप आमदार नितेश राणे यांना अटक यांना करण्यात यावी, याकरिता शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी सोमवारी सकाळी कणकवली पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला होता. तर दुसऱ्या बाजूला सभागृहात शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू यांनीही नितेश राणे यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. यानंतर कणकवली पोलिसांकडून नितेश राणे यांचा शोध सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार, नितेश राणे सध्या अज्ञातवासात गेले आहेत.

दहावी-बारावी विद्यार्थ्यांचं परीक्षेआधी लसीकरण करण्यात यावं ; बोर्डासह शिक्षक आणि पालकांची मागणी...

वेध माझा ऑनलाईन - देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी येत्या तीन जानेवारीपासून वयोगटातील मुलांचे लसीकरण करण्याची घोषणा केलीय. याचपार्श्वभूमीवर दहावी-बारावी विद्यार्थ्यांचं परीक्षेआधी प्राधान्यानं लसीकरण करण्यात यावं, अशी मागणी बोर्डासह शिक्षक आणि पालकांकडून केली जात आहे. महाराष्ट्रात 15 मार्चला इयत्ता दहावी आणि 4 मार्चला बारावी बोर्डाची परीक्षा सुरू होत आहे. या परीक्षेला राज्यातून दहावी आणि बारावीचे 26 लाखांच्यावर विद्यार्थी बसणार आहेत. 
 

राज्यात ओमायक्रॉनबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. यातच दहावी-बारावी बोर्ड परीक्षा ऑफलाईन घेतली जाणार आहे. यामुळं इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचं प्राधान्यानं लसीकरण करावं, अशी मागणी बोर्डाकडून करण्यात आली. त्यानंतर शिक्षक आणि पालकांनी सुद्धा बोर्ड परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांच्या लसीकरण लवकरात लवकर व्हावे, अशी मागणी केलीय.
राज्यात बोर्ड परीक्षेच्या कामात सहभागी होणाऱ्या दोन ते अडीच लाख शिक्षकांना प्राधान्यानं बूस्टर डोस देण्यात द्यावा, जेणेकरून बोर्ड परीक्षा सुद्धा सुरळीत पार पडतील असं शिक्षकांचं म्हणणे आहे. राज्यातील साधारणपणे 26 लाख विद्यार्थी हे दरवर्षी दहावी बारावी बोर्ड परीक्षा देतात. त्यामुळं परीक्षा सुरू होण्यापूर्वी विद्यार्थ्यांचं लसीकरण होणं गरजेचं आहे, असंही मत शिक्षकांनी मांडलंय. दरम्यान, मुंबई महापालिकेनं शाळांकडून 15 ते 18 वयातील विद्यार्थ्यांची माहिती मागवली आहे. विद्यार्थीसुद्धा लस घेण्यासाठी तयार आहेत. तसेच लसीकरण सुरू केल्यास पालकांच्या संमतीनं प्रशासनाच्या सहकार्यानं शाळेत लस देण्यास सुद्धा शाळा तयार आहेत. 



Wednesday, December 29, 2021

निर्बंध अजून कडक केले जाऊ शकतात आरोग्यमंत्री राजेश टोपेंचा इशारा ; लसीकरण वाढवण्यासाठी केलं आवाहन...

 वेध माझा ऑनलाईन- राज्यातील करोना रुग्णसंख्या वाढत असून लोकांकडून नियमांचं पालन केलं जात नसल्याने राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी चिंता व्यक्त केली आहे. आपल्याकडे जर सहजासहजी गोष्टी घेतल्या तर याची किमंत संख्यात्मक वाढ होऊन चुकवावी लागेल असं सांगत राजेश टोपे यांनी निर्बंध अजून कडक केले जाऊ शकतात असा इशारा दिला आहे. लसीकरणातही आपण थोडे मागे असून ते योग्य नाही सांगत त्यांनी ही टक्केवारी वाढवण्यासाठी आवाहन केलं आहे. १०० टक्के लसीकरणाचा निर्धार यावेळी त्यांनी व्यक्त केला. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

“मागील आठ दिवसात पाहिलं तर २० डिसेंबरदरम्यान महाराष्ट्रात पाच ते सहा दरम्यान अॅक्टिव्ह रुग्ण होते, पण आता महाराष्ट्रात ११ हजार ४९२ रुग्ण आहेत. २० हजारांपर्यंत हा आकडा जाऊ शकतो. मुंबईची तुलना केली तर मुंबईत ३०० च्या आसपास केसेस होत्या, आज १३०० केसेस आहेत. आज संध्याकाळी रिपोर्ट होतील त्यातून अंदाजे २२०० केसेस रिपोर्ट होतील. सात दिवसात सात पटीने रुग्ण वाढले आहेत. दोन दिवसात डबलिंग होत आहे अशी परिस्थिती आहे,” अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.

ओमिक्रॉनचा विस्फोट! दिवसभरात महाराष्ट्रात तब्बल 87 नवे रुग्ण, तर राज्यात 3900 नव्या कोरोना रुग्णांची भर...

वेध माझा ऑनलाईन- राज्यात ओमिक्रॉनचा विस्फोट झाला असून एकाच दिवसात आढळले तब्बल 87 रुग्ण आढळले आहेत. 43 प्रवाशांचा आंतरराष्ट्रीय प्रवास तर त्यांच्या सहवासातून 4 जणांना बाधा झाली आहे. 37 जणांचा कोणताही आंतरराष्ट्रीय प्रवास नसून त्यांनाही लागण झाली आहे. सर्वाधिक रुग्ण हे मुंबईत आहे. मुंबई ओमिक्रॉनचे 34 रुग्ण आढळून आलेत. तर महाराष्ट्रात एकूण तब्बल 3 हजार 900 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. दरम्यान, जवळपास चार हजाराच्या जवळपास हा आकडा पोहोचल्यानं सगळेच धास्तावले आहेत. कोरोना विषाणी पुन्हा गुणाकार करु लागल्यानं आता वेळीच धोका ओळखून अधिक सतर्कता बाळगण्याची गरज व्यक्त केली जाते आहे.

काय आहे आजची आकडेवारी?
महाराष्ट्रातील आजचे नवे रुग्ण – 3900
आज किती मृत्यू – 20
रुग्ण बरे होण्याचं प्रमाण – 97.61%
किती रुग्ण आज बरे झाले – 1306
होम क्वारंटाईनमध्ये किती – 122906
ओमिक्रॉनचे किती नवे रुग्ण – 85
ओमिक्रॉनचे कुठे किती रुग्ण?
मुंबई – 3
नागपूर आणि पिंपरी चिंचवड- प्रत्येकी 3
नवी मुंबई आणि पुणे मनपा – प्रत्येकी 2
पनवेल, कोल्हापूर आणि बुलढाणा

खासदार सुप्रिया सुळे यांचे पती सदानंद सुळे या दोघांचेही कोरोना अहवाल पॉझिटिव्ह ; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनाही कोरोना...

वेधमाझा ऑनलाईन
कराड
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांचे पती सदानंद सुळे या दोघांचेही कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. सुप्रिया सुळे यांनी आज ट्विटरवरून ही माहिती दिली. त्यामुळे आमच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाने कोरोना तपासणी करून घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

खासदार सुप्रिया सुळे यांनी आज 29 डिसेंबर रोजी त्यांच्या टि्वटर हँडलवरून दुपारी दीड वाजेच्या सुमारास ही माहिती दिली. त्यांनी ट्विटमध्ये लिहिले,
मी आणि सदानंद, आम्हा दोघांचीही कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. काळजी करण्याचे कारण नाही पण आमच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली कोरोना टेस्ट करुन घ्यावी,ही नम्र विनंती. काळजी घ्या.

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनाही कोरोना

काल दिनांक 28 डिसेंबर रोजी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस आले. त्यांनीदेखील ट्विट करून ही माहिती दिली. तसेच माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी कोरोना तपासणी करून घेण्याचे आवाहन त्यांनी केले होते. वर्षा गायकवाड या हिवाळी अधिवेशनात उपस्थित होत्या. त्यामुळे इतर मंत्र्यांनाही बाधा होते की काय ही चिंता वाढली आहे.

राज्यपालांचे "ते' पत्र... आणि विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक गुंडाळली...

वेध माझा ऑनलाईन
कराड
कोणत्याही परिस्थितीत विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेणारच अशी गर्जना करणाऱ्या ठाकरे सरकारला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या पत्रानंतर ही निवडणूक गुंडाळावी लागली. राज्यपालांनी पाठवलेल्या पत्रातील शेवटच्या तीन ओळीमुळे ठाकरे सरकारचा गेम फसला आणि नसत्या उद्योगात पडू नका सांगणाऱ्या ठाकरे सरकारला अखेर बॅकफूटवर जावं लागलं. राज्यपालांचं ते पत्रं व्हायरल झालं असून त्यातील शेवटच्या तीन ओळीची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काल सकाळी 11 वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रं पाठवलं. या पत्रातून त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या आदल्या दिवशीच्या पत्रावर तीव्र नाराजी व्यक्त केली. खासकरून मुख्यमंत्र्यांच्या पत्रातील भाषेवर राज्यपालांनी तीव्र आक्षेप घेतानाच मुख्यमंत्र्यांना गर्भित इशाराही दिला आहे.

राज्यपालांच्या मोजून चार पॅरे आहेत. राज्यपालांनी या पत्रात अत्यंत मोजक्याच शब्दात पण मुद्देसूद मांडणी केली आहे. कायदेशीर बाबी समजावून सांगतानाच मुख्यमंत्र्यांनी दाखला दिलेल्या संविधानाच्या अनुच्छेद 208चा अन्वयार्थही त्यांनी विशद केला आहे. त्याशिवाय, ‘तुमच्या पत्राचा असंयमी टोन आणि धमकावणारा सूर पाहून मी वैयक्तिकरीत्या खूप दु:खी झालो आहे. ते पत्र संविधानचं सर्वोच्च ऑफिस असलेल्या राज्यपालाचा अपमान आणि बदनामी करणारं आहे’, असं राज्यपालांनी या पत्रात नमूद केलं आहे. राज्यपालांचा हा सूर बरंच काही सांगून जात असल्याने अखेर आघाडी सरकारला निवडणुकीच्या मुद्द्यावरून माघार घ्यावी लागल्याचं सूत्रांनी सांगितलं.

आज जिल्ह्यात 21 बाधीत, 30 डिस्चार्ज

सातारा दि (जिमाका)
 जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यंत...
 जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 21 नागरिकांचे अहवाल  कोरोना बाधित आले तर 2 जणांचा मृत्यू झाला आहे तर 
30 जणांना आज डिस्चार्ज दिल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद यांनी दिली आहे

तालुकानिहाय कोरोना बधितांची संख्या पुढीलप्रमाणे...
जावली 0 कराड 3 खंडाळा 2 खटाव 1 कोरेगांव 1 माण 1 महाबळेश्वर 0  पाटण 1 फलटण 2 सातारा 9 वाई 1 व इतर 0 आणि नंतरचे वाढीव 0 असे  आज अखेर एकूण 21 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत.  

जिल्ह्यात विविध रुग्णालयात... 
आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज  संध्याकाळपर्यंत 30 जणांना घरी  सोडण्यात आले आहे.

Monday, December 27, 2021

आज जिल्ह्यात 14 बाधीत 15 डिस्चार्ज

सातारा दि (जिमाका)
 जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यंत...
 जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 14 नागरिकांचे अहवाल  कोरोना बाधित आले तर 0 जणांचा मृत्यू झाला आहे तर 
15 जणांना आज डिस्चार्ज दिल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद यांनी दिली आहे

तालुकानिहाय कोरोना बधितांची संख्या पुढीलप्रमाणे...
जावली 1 कराड 0 खंडाळा 0 खटाव 2 कोरेगांव 0 माण0 महाबळेश्वर 0  पाटण 0 फलटण 2 सातारा 8 वाई 0 व इतर 1 आणि नंतरचे वाढीव 0 असे  आज अखेर एकूण 14 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत.  

जिल्ह्यात विविध रुग्णालयात... 
आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज  संध्याकाळपर्यंत 15 जणांना घरी  सोडण्यात आले आहे.

लहान मुलांचे लसीकरण येत्या 3 जानेवारीपासून सुरू... आजपासून नोंदणीला सुरुवात...

वेध माझा ऑनलाईन
कराड
15 पंतप्रधान मोदी यांनी जाहीर केल्याप्रमाणे 15ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरण येत्या 3 जानेवारीपासून सुरू होणार आहे. मात्र, त्यासाठीची नोंदणी आज 1 जानेवारीपासून करायची संधी मिळणार आहे. पोर्टलवर ही नोंदणी करता येणार आहे खर तर 12 वर्षांच्या पुढील मुलांच्या लसीकरणास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, केंद्र सरकारने तूर्तास 15 वर्षांवरील मुलांचे लसीकरण करायला मान्यता दिली आहे. ओमिक्रॉनच्या विषाणूमुळे जगभरात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. हे पाहता अमेरिका आणि इंग्लंडसारख्या ठिकाणी मुलांचे लसीकरण सुरू करण्यात आले आहे. त्याच धर्तीवर आता भारतही पाऊल टाकताना दिसतो आहे.

अशी करा नोंदणी

आज 1 जानेवारीपासून Cowin पोर्टलवर लहान मुलांची लसीकरण नोंदणी सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी ओळखपत्र म्हणून विद्यार्थ्यांचे शाळेतील ओळखपत्र जोडले जाणार आहे. त्यामुळे आपल्या मुलाचे वय पंधरा असेल, तर ओळखपत्र जरूर असू द्या. शाळेतून मिळाले नसेल, अथवा हरवले असेल तर ते पुन्हा एकदा काढा. या नोंदणीनंतर 3 जानेवारीपासून प्रत्यक्ष लसीकरणाला सुरुवात होणार आहे. तूर्तास भारतातील मुलांना कोव्हॅक्सीन लस देण्यात येणार आहे. दोन डोसमध्ये 28 दिवसांचे अंतर ठेवले जाणार आहे.

Sunday, December 26, 2021

महाराष्ट्रात ओमिक्रॉनच्या विक्रमी रुग्णांची नोंद ! दिवसभरात 31 नवीन रुग्णांची नोंद...

वेध माझा ऑनलाईन
कराड
ओमिक्रॉनच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर काळजी वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. महाराष्ट्रात ओमिक्रॉनच्या विक्रमी रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. ओमिक्रॉन रुग्णसंख्येनं नवा उच्चांक गाठला असून नव्या 31 रुग्णांची दिवसभरात नोंद करण्यात आली आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात एकूण 141 रुग्णांची नोंद करण्यात आली असून त्यापैकी 61 रुग्ण हे उपचारानंतर बरे झाले आहेत.

मुंबईत सर्वाधिक रुग्ण!
ओमिक्रॉनचे सर्वाधिक रुग्ण हे मुंबईत आढळून आले आहे. राज्यातील 31 पैकी 27 रुग्णांचं निदान एकट्या मुंबईत झालं आहे. दरम्यान, गेल्या 24 तासात मुंबईतील कोरोना रुग्णवाढही चिंताजनक मानली जाते आहे. बीएमसीनं दिलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईत रविवारी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तब्बल 922 नव्या रुग्णांची भर पडली असून एकूण 326 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या मुंबईत कोरोनाचे एकूण 4295 सक्रिय रुग्ण आहेत.
मुंबई गेल्या 13 दिवसांत झपाट्यानं रुग्णवाढ नोंदवण्यात आली आहे. दुसऱ्या लाटेवर नियंत्रण मिळवण्यात पालिकेला यश आलेलं असतानाच ओमिक्रॉनसह पुन्हा एकदा कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत असल्याचं आकडेवारीतून अधोरेखित होत आहे.

राज्यात गेल्या 24 तासात 1 हजार 684 नव्या रुग्णांची नोंद तर, 918 रुग्णांनी कोरोनावर मात...

वेध माझा ऑनलाईन
कराड
महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होऊ लागलीय. राज्यात गेल्या 24 तासात  1 हजार 684 नव्या रुग्णांची नोंद झालीय. तर, 17 जणांचा मृत्यू झालाय. याशिवाय, 918 रुग्णांनी कोरोनावर मात केलीय. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.67 टक्के एवढे झालंय.


राज्यात आतापर्यंत 6 कोटी 84 लाख 55 हजार 314 जणांची कोरोना चाचणी करण्यात आलीय. त्यापैकी 66 लाख 57 हजार 888 जणांची कोरोना चाचणी सकारात्मक आलीय. राज्यात सध्या 89 हजार 251 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत. तर, 891 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

अखेर विधानसभेच्या अध्यक्षपदी पृथ्वीराज चव्हाण यांचं नाव झालं निश्चित! उद्या चव्हाण विधानसभा अध्यक्षपदासाठीचा अर्ज भरणार...खात्रीलायक वृत्त

वेध माझा ऑनलाईन
कराड
काँग्रेसमधील विधानसभा अध्यक्षपदाचा पेच अखेर सुटला आहे. विधानसभेच्या अध्यक्षपदी पृथ्वीराज चव्हाण यांचं नाव नक्की झाल्याचं खात्रीलायक वृत्त आहे. उद्या चव्हाण विधानसभा अध्यक्षपदासाठीचा अर्जही भरणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

राज्य सरकारने विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार उद्या 27 डिसेंबर रोजी उमेदवारी अर्ज भरायचा असून 28 डिसेंबर रोजी अध्यक्षांची निवड होणार आहे. विधानसभेचं अध्यक्षपद काँग्रेसच्या वाट्याला आलेलं आहे. त्यामुळे काँग्रेस अध्यक्षपद कुणाकडे देणार याबाबत तर्कवितर्क लढवले जात होते. काँग्रेसमधून एकाचवेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, ऊर्जा मंत्री नितीन राऊत, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि भोरचे आमदार संग्राम थोपटे यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, यात पृथ्वीराज चव्हाणांचं नाव या पदासाठी फिक्स झाल्याचं खात्रीलायक सूत्रांनी सांगितलं.

आ पृथ्वीराज चव्हाण यांची राजकीय कारकीर्द...

1991-1995, 1995-1998 या काळात ते लोकसभेचे सदस्य होते. ते कराड लोकसभा मतदारसंघातून तीनदा विजयी झाले आहेत. त्यांना सायन्स व टेक्नॉलॉजीच्या मंत्रालयाचे सल्लागार समितीचे सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आले होते. त्यानंतर 1992-93मध्ये ते इलेक्ट्रॉनिक अॅटोमिक एनर्जी मंत्रालयाचे सल्लागार सदस्य होते. 1994-1996मध्ये त्यांनी विज्ञान, माहिती व तंत्रज्ञान, पर्यावरण आणि वन खात्याच्या मंत्रालयाच्या सल्लागार समितीचे सदस्य म्हणूनही काम पाहिलं. 1998-99मध्ये ते राज्यसभेवर निवडून गेले. त्यानंतर 2002मध्ये त्यांची पुन्हा राज्यसभा सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांनी अर्थ नियोजन समितीचे सल्लागार सदस्य, संरक्षण मंत्रालयाच्या समितीचे सल्लागार सदस्य म्हणून काम पाहिले होते. 2000-2001मध्ये ते काँग्रेसचे प्रवक्तेही होते. त्यानंतर 2004 ते 2009पर्यंत ते पंतप्रधान कार्यालयात राज्यमंत्री होते.

पृथ्वीबाबांनी 11 नोव्हेंबर 2010 रोजी राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर 28 एप्रिल 2011 रोजी ते विधान परिषदेवर बिनविरोध निवडून आले. चार वर्षे ते मुख्यमंत्रीपदी होते. 26 सप्टेंबर 2014 मध्ये त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला.

आज जिल्ह्यात 13 बाधीत, 1 डिस्चार्ज

सातारा दि (जिमाका)
 जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यंत...
 जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 13 नागरिकांचे अहवाल  कोरोना बाधित आले तर 0 जणांचा मृत्यू झाला आहे तर 
1 जणांना आज डिस्चार्ज दिल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद यांनी दिली आहे

तालुकानिहाय कोरोना बधितांची संख्या पुढीलप्रमाणे...
जावली 0 कराड 0 खंडाळा 0 खटाव 0 कोरेगांव 0 माण 2 महाबळेश्वर 0  पाटण 0 फलटण 0 सातारा 9 वाई 0 व इतर 1 आणि नंतरचे वाढीव 1 असे  आज अखेर एकूण 13 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत.  

जिल्ह्यात विविध रुग्णालयात... 
आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज  संध्याकाळपर्यंत 1जणांना घरी  सोडण्यात आले आहे.

Saturday, December 25, 2021

पालिकेचे गटनेते राजेंद्र यादव यांच्या उपस्थितीत कराड शहरातील विविध रस्ते कामांचा शुभारंभ...

वेध माझा ऑनलाईन
कराड
नामदार बाळासाहेब पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून शहराच्या रस्ते कामासाठी निधी उपलब्ध झाला आहे त्या माध्यमातून पालिकेचे गटनेते राजेंद्र यादव यांच्या उपस्थितीत येथील विविध रस्ते कामांचा शुभारंभ नुकताच करण्यात आला...

यामध्ये देशपांडे कॉलनी व पारगावकर कॉलनी रस्ता डांबरीकरण करणे कामाचा शुभारंभ राजेंद्र यादव यांच्या उपस्थितीत झाला त्यानंतर सूर्या कॉम्प्लेक्स दत्त चौक ते पंचायत समिती रस्ता डांबरीकरण करणे तसेच कोयना दूध कॉलनी जिव्हेश्वर मंदिर रस्ता व कोयना दूध कॉलनी अंतर्गत 3 रस्ते डांबरीकरण करणे तसेच  रणजीत टॉवर ते पंकज हॉटेल ते पूना बेंगलोर हायवे लगतचा रस्ता डांबरीकरण करणे आदीं कमाचा शुभारंभ देखील यावेळी करण्यात आला
यावेळी यादव गटाचे सर्व नगरसेवक नगरसेविका  तसेच कार्यकर्ते व स्थानिक नागरिक उपस्थित होते

पालिकेचे गटनेते राजेंद्र यादव यांच्या उपस्थितीत कराड शहरातील विविध रस्ते कामांचा शुभारंभ...

वेध माझा ऑनलाईन
कराड
नामदार बाळासाहेब पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून शहराच्या रस्ते कामासाठी निधी उपलब्ध झाला आहे त्या माध्यमातून पालिकेचे गटनेते राजेंद्र यादव यांच्या उपस्थितीत येथील विविध रस्ते कामांचा शुभारंभ नुकताच करण्यात आला...

यामध्ये  नेहरू चौक ते कराड नगरपरिषद पर्यंतचा रस्ता डांबरीकरण करणे कामाचा शुभारंभ राजेंद्र यादव यांच्या उपस्थितीत करण्यात आला त्यानंतर श्रीराम चौक घाटे घर ते भांबुरे चौक ते मोरे घर या रस्त्याचा शुभारंभ झाला तसेच श्रीराम चौक घाटे घर ते भोई समाज मंदिर व श्रीराम चौक घाटे घर ते विठ्ठल चौक रस्ता डांबरीकरण करणे कामाचा शुभारंभ करण्यात आला त्यानंतर धर्मवीर संभाजीराजे चौक आयवा ग्रुप चौक ते वास्के चौकातील रस्ता डांबरीकरण शुभारंभ पार पडला शुक्रवार पेठेतील महादेव मंदिरा जवळील घाट कामाचे उद्घाटन पार पडले त्याचप्रमाणे कार्वे नाका पाण्याच्या टाकी खाली पोस्टल कॉलनी व सुमंगल नगर या दोन ठिकाणी अंगणवाडीसाठी दोन खोल्या बांधणे या कामाचे भूमिपूजन पार पडले सुमंगल नगर गल्ली क्रमांक 3 महाडिक घर ते अमलानी अपार्टमेंट रस्ता डांबरीकरण करणे कामाचा शुभारंभ यावेळी करण्यात आला वाढिव भाग येथील कार्वे नाका प्रियदर्शनी कॉलनी अर्बन बँकेपासून सहारा कॉलनीच्या कोपऱ्यापर्यंत चा रस्ता डांबरीकरण  करणे व सहारा कॉलनी मधील उत्तर कोपऱ्यापासून शेख यांच्या घरापासून उत्तरेस वेदपाठक घरापर्यंत जाणारा रस्ता डांबरीकरण करणे तसेच वाढिव विभागातील गाय मंदिर ते पूर्वेस गणेश नांगरे घरासमोरील रस्ता डांबरीकरण करणे अशा विविध कामांचा शुभारंभ देखील आज राजेन्द्र यादव यांच्या उपस्थितीत पार पडला

यावेळी बोलताना गटनेते राजेंद्र यादव यांनी शहरातील रस्ते चकाचक होऊन खड्डेमुक्त असतील अशी ग्वाही देत शहराचा विकासात्मक कायापालट करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत असेही यावेळी सांगितले यावेळी यादव गटाचे सर्व नगरसेवक नगरसेविका  लोकशाही गटाचे नगरसेवक मोहसिन आंबेकरी तसेच कार्यकर्ते व स्थानिक नागरिक यावेळी उपस्थित होते

...तर राज्यात पुन्हा लॉक डाऊन ; आरोग्यमंत्र्यांचे मोठे विधान...

वेध माझा ऑनलाईन
कराड
देशभरात तसेच राज्यातही नवीन वर्षाच्या स्वागताची जल्लोषी तयारी सुरू आहे. तसेच सगळीकडे नाताळच्या सेलिब्रेशनचीही जोरदार धूम आहे. या निमित्ताने गर्दोचे चित्र दिसत आहे. या गर्दीत कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढण्याची भिती आहे. रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढू शकते. अशातच ओमायक्रॉन व्हेरिएंटचाही संसर्ग वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून खबरदारीचे आवाहन करण्यात आले आहे. कोरोना आणि ओमायक्रॉन व्हेरिएंटचा संसर्ग वाढल्यानंतर ऑक्सिजनची गरज भासणार आहे. प्रसंगी ऑक्सिजनचा तुटवडाही भासू शकतो. ऑक्सिनच्या अनुषंगाने राज्यातील लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात येणार आहे. ज्या दिवशी 800 मॅट्रीक टन ऑक्सिजन लागेल, त्या दिवशी राज्यात लॉकडाऊन करण्यात येईल, असे मोठे विधान राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज केले.

ओमिक्रॉनची परिस्थिती भितीदायक नाही, पण काळजी घ्या ...
महाराष्ट्रातील कोरोना संसर्गाच्या सद्यस्थितीवर आरोग्य मंत्र्यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी कोरोनाच्या सध्याच्या परिस्थितीवर भाष्य केले. ओमायक्रॉनचा संसर्ग वाढत असला तरी भय नाही. पण काळजी घेतली पाहिजे. या सर्व पार्श्वभूमीवर तुम्ही सण आणि नवीन वर्षाचं स्वागत निश्चित करा. पण निर्बंधाचंही पालन करा. राज्यात आधी 500 ते 600 रुग्ण सापडत होते. आता ही रुग्णसंख्या 1400 वर गेली आहे. त्यात ओमायक्रॉनचे रुग्णही 100च्या घरात गेले आहेत. त्याची गती वाढली आणि आता जर लाट आली तर ती ओमिक्रॉनचीच असेल. त्यामुळे सर्वांनी काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य मंत्री टोपे यांनी केले.

… तर लॉकडाऊन केले जाईल
ऑक्सिजनच्या अनुषंगाने आपण लॉकडाऊन ठरवणार आहोत. ज्या दिवशी 800 मॅट्रिक टन ऑक्सिजन लागेल, त्या दिवशी लॉकडाऊन लागू करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. मात्र संसर्गाची गती अधिक असेल तर ऑक्सिजनची 800 मॅट्रिक टनाची आवश्यकता 500 मॅट्रीक टनावर आणावी लागेल. तशी परिस्थिती दिसत असल्याचे टोपे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. मात्र, ओमायक्रॉनच्या बाबतीत ऑक्सिजन लागण्याची शक्यता कमी आहे. पण कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजनची गरज लागू शकते. आम्हाला निर्बंध लावायचे नाही. आमचा तसा हेतू नाही. फक्त काळजीपोटीच आम्ही हे निर्बंध लावत आहोत. आम्ही लावत असलेल्या निर्बंधांचा चुकीचा अर्थ काढू नये. आरोग्याच्या स्पिरीटने त्याकडे पाहावे, असेही आवाहन टोपे यांनी केले आहे

भाजपा आमदार समीर मेघे यांना कोरोनाची लागण ; अधिवेशनात समीर मेघे यांची भेट घेतलेले इतरही आमदार धास्तावले...उपचारांसाठी रुग्णालयात दाखल

कराड
वेध माझा ऑनलाईन
वाढत्या ओमिक्रॉनच्या रुग्णसंख्येतच आता हिवाळी अधिवेशनातही कोरोनानं शिरकाव केलाय. भाजप आमदार समीर मेघे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे हिवाळी अधिवेशनात समीर मेघे यांची भेट घेतलेले इतरही आमदार आता धास्तावले आहेत. समीर मेघे यांनी स्वतः आपल्याला कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती दिली आहे. फेसबुक पोस्ट  लिहीत त्यांनी आपल्याला कोरोनाची लागण झाली असल्याचं म्हटलंय.

उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
कोरोनाची लागण झाल्याचं कळताच समीर मेघे हे रुग्णालयात उपचार घेण्यासाठी दाखल झाले आहेत. नागपुरातील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. प्रकृती बिघडल्यानं समीर मेघे पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाले असल्याची माहिती मिळते आहे. दरम्यान, ऐन हिवाळी अधिवेशनात सभागृहातीलच एक आमदार कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानं सगळ्याच आमदारांची चिंता वाढली आहे.
22 तारखेला समीर मेघे हे विधानसभा अधिवेशनासाठी सभागृहात हजर होते. यावेळी त्यांनी विधानसभेत इतरही आमदार आणि मंत्र्यांची भेट घेतली होती. त्यामुळे आता त्यांच्या संपर्कात आलेल्या आमदार, विधानसभेतील कर्मचारी वर्ग यांनाही कोरोना चाचणी करावी लागणार आहे. यातूनही इतरांना संसर्ग झालेला असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

विधानसभा अध्यक्षपदी नितीन राऊतांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता...आज काँग्रेसकडून करण्यात आले मोठे बदल...

वेध माझा ऑनलाईन
कराड
विधानसभेचा आखाडा आरोप प्रत्यारोपांनी गाजत असतानाच सत्ताधारी आणि विरोधकांना वेध लागलेत ते विधानसभा अध्यक्षपदाचे. सोमवारी त्याची निवडणूक आहे. पण अजूनही सत्ताधाऱ्यांनी स्वत:चा उमेदवार दिलेला नाही. विधानसभा अध्यक्षपद हे काँग्रेसकडे आहे आणि त्यामुळे ते कुणाला संधी देणार याबाबत उत्सुकता आहे. तीन एक नेत्यांची नावं चर्चेत आहेत पण शेवटी कुणाला संधी मिळते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी काँग्रेसमधून चार नेत्यांची नावे चर्चेत आहेत. त्यात भोरचे आमदार संग्राम थोपटे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण आणि ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांची नावे अध्यक्षपदासाठी चर्चेत आहेत. आज काँग्रेसकडून करण्यात आलेल्या मोठ्या बदलानंतर आता नितीन राऊतांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

नितीन राऊत होणार अध्यक्ष ? 
नितीन राऊत यांना काँग्रेससं एससी सेलमधूल हटवलं आहे. एक पत्रक जारी करत त्यांना काँग्रेस एससी विभागाच्या अध्यक्षपदावरुन मुक्त करण्यात आलं असून त्यांच्या जागी राजेश लिलोठिया यांना अध्यक्ष करण्यात आलं आहे. या बदलामुळे नितीन राऊत यांच्या नावावर लवकरच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये विधानसभा अध्यक्षपद हे काँग्रेसडे देण्यात आले आहे. काँग्रेसकडून आधी नाना पटोलेंना अध्यक्ष करण्यात आले होते, मात्र नाना पटोले यांचे नाव काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदी ठरल्यानंतर नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपद सोडले होते. त्यानंतर अध्यक्ष कोण होणार? हे ठरत नसल्याने बराच काळ हे पद रिक्त होतं. या अधिवेशनात विधानसभा अध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेला वेग आला आहे.

राज्यात आज 1485 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद तर 796 रुग्ण कोरोनामुक्त.....

वेध माझा ऑनलाईन
कराड
दैनंदिन रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ पाहायला मिळत आहे.   राज्यात आज  1485  नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 796  रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. मागील दोन- तीन दिवसांपासून कोरोनाची संख्या ही हजाराच्या पुढेच येत आहे. त्यातच नाताळ, वर्षाअखेर आणि नवीन वर्ष यामुळे होणाऱ्या गर्दीमुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढवण्याची शक्यता आहे. तसेच ओमायक्रॉन व्हेरियंटनेही चिंता वाढवली आहे. देशातील सर्वाधिक ओमायक्रॉन बाधित रुग्ण महाराष्ट्रात आहेत.  राज्यात आतापर्यंत 65 लाख 2 हजार 39 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.68 टक्के आहे.

कृष्णा'ने कोरोनाकाळात केलेली कामगिरी कौतुकास्पद ; केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांचे गौरवोद्गार ; कृष्णा कॅम्पसला भेट

वेध माझा ऑनलाईन
कराड
कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत कृष्णा अभिमत विद्यापीठ आणि कृष्णा हॉस्पिटलने कोरोनाग्रस्त रुग्णांची आपल्या परिवाराप्रमाणे काळजी घेतली. आजपर्यंत सुमारे ८००० हून अधिक रुग्णांवर यशस्वी उपचार करणाऱ्या कृष्णा हॉस्पिटलचे कार्य कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी काढले. भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित सुशासन दिवस कार्यक्रमासाठी कराड दौऱ्यावर आलेल्या ना.डॉ. पवार यांनी आज कृष्णा अभिमत विद्यापीठाला भेट दिली. यावेळी त्या बोलत होत्या.

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांचे दुपारी २.३० च्या सुमारास कृष्णा अभिमत विद्यापीठात आगमन झाले. यावेळी विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले यांनी पुष्पगुच्छ प्रदान करून स्वागत केले. याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले,  सौ. गौरवी भोसले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. 

त्यानंतर डॉ. पवार यांनी कृष्णा कॅम्पसमधील कृष्णा अभिमत विद्यापीठ, कृष्णा मेडिकल कॉलेज, कृष्णा आर्थिक परिवाराचे नवे कार्यालय, तसेच विद्यापीठाच्या सुसज्ज ग्रंथालयास भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांचे पती प्रवीण पवारही सोबत होते. 

यावेळी विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी, कृष्णा अभिमत विद्यापीठ आणि कृष्णा हॉस्पिटलच्या कार्याचे भरभरून कौतुक केले. कृष्णा हॉस्पिटलने कोरोनाकाळात खूप चांगले काम केले. फक्त कोरोनाग्रस्त रुग्णांचीच नाही तर या रुग्णांना सेवा देणाऱ्या डॉक्टर्स, कर्मचाऱ्यांचीही तितकीच काळजी घेतली. त्यांच्या या कार्याचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. कृष्णा हॉस्पिटलमधील कॅन्सर विभाग अद्ययावत असून, मुंबईनंतर सर्वप्रकारच्या अद्ययावत सेवा इथं उपलब्ध आहेत. याशिवाय इतर विभागही अद्ययावत असून, ग्रामीण भागातील रुग्णांसाठी हे इस्पितळ एक वरदान ठरले आहे. 

यावेळी डॉ. पवार यांचे सहाय्यक डॉ. ओमप्रकाश शेटे, कृष्णा विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. एम. व्ही. घोरपडे, कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डाॅ. ए. वाय. क्षीरसागर, सहाय्यक कुलसचिव एस. ए. माशाळाकर आदी उपस्थित होते.


आज जिल्ह्यात 22 बाधीत, तर 3 डिस्चार्ज

सातारा दि (जिमाका)
 जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यंत...
 जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 22 नागरिकांचे अहवाल  कोरोना बाधित आले तर 1 जणांचा मृत्यू झाला आहे तर 
3 जणांना आज डिस्चार्ज दिल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद यांनी दिली आहे

तालुकानिहाय कोरोना बधितांची संख्या पुढीलप्रमाणे...
जावली 0 कराड 0 खंडाळा 2 खटाव 4 कोरेगांव 3 माण 0 महाबळेश्वर 1  पाटण 1 फलटण 3 सातारा 8 वाई 0 व इतर 0 आणि नंतरचे वाढीव 0 असे  आज अखेर एकूण 22 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत.  

जिल्ह्यात विविध रुग्णालयात... 
आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज  संध्याकाळपर्यंत 3 जणांना घरी  सोडण्यात आले आहे.

Friday, December 24, 2021

राज्यात आज मध्यरात्रीपासून नवे निर्बंध लागू ; रात्री ९ ते सकाळी ६ यावेळेत जमावबंदी...

वेध माझा ऑनलाइन
कराड
राज्यातील वाढत्या कोविड प्रादुर्भावाचा विचार करून राज्य शासनाने संसर्ग रोखण्यासाठी काही निर्बंध लागू केले आहेत.  ते आज मध्यरात्रीपासून लागू राहतील.

विशेषत: युरोप तसेच युकेमध्ये ओमायक्रॉन व्हेरियंटमुळे रुग्णसंख्या दुप्पट वेगाने वाढत आहे.  जगातील ११० देशांमध्ये ओमायक्रॉनचा प्रसार झाला आहे. या विषाणुच्या प्रसाराचा वेग जास्त असल्याने सध्या काही प्रमाणात निर्बंध लावावेत व पुढील काळात याचा प्रसार बघून अधिक निर्बंध लावण्याबाबत विचार व्हावा असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. संसर्ग वाढू द्यायचा नसेल तर सर्वांनी जबाबदारीने आरोग्याचे नियम पाळणे, मास्क व्यवस्थित वापरणे आवश्यक आहे असेही मुख्यमंत्री म्हणाले.

एवढेच नव्हे तर केंद्रीय आरोग्य विभागाने देखील सर्व राज्यांसाठी संसर्ग रोखण्याकरिता पुरेशी काळजी घेण्यास व उपाययोजना करण्यास सांगितले आहे. सध्याच्या निर्बंधाचे स्वरूप हे प्राथमिक स्वरूपाचे असून ते आत्ताच न लावल्यास भविष्यात अधिक कठोर निर्बंध लावण्याची वेळ येऊ शकते असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
राज्यात देखील गेल्या दोन दिवसात एक हजारापेक्षा जास्त पॉझिटिव्ह रुग्ण दिसून येत आहेत.  ख्रिसमस उत्सव, लग्न समारंभ, नवीन वर्षाचे स्वागत यामुळे गर्दी वाढून संसर्गाचा धोका वाढण्याची मोठी शक्यता असल्यामुळे आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ प्रमाणे संपूर्ण राज्यात काही अतिरिक्त निर्बंध लावण्याचे ठरवण्यात आले आहे.

आज दिनांक २४ डिसेंबर २०२१ रोजी मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती यांच्या स्वाक्षरीने काढण्यात आलेल्या आदेशात खालीलप्रमाणे  अतिरिक्त निर्बंध असतील.

·         संपूर्ण राज्यभर सर्व सार्वजनिक ठिकाणी ५ पेक्षा जास्त व्यक्तींच्या एकत्र येण्यावर रात्री ९ ते सकाळी ६ यावेळेत बंदी असेल.
·         लग्न समारंभासाठी बंदिस्त सभागृहांमध्ये एकावेळी उपस्थितांची संख्या १०० च्या वर नसेल आणि खुल्या जागेत ही संख्या २५० च्या वर नसेल किंवा या जागेच्या क्षमतेच्या २५ टक्के यापैकी जे कमी असेल ते.
·         इतर सामाजिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रमांसाठी देखील  उपस्थितांची संख्या १०० च्या वर नसेल आणि खुल्या जागेत ही संख्या २५० च्या वर नसेल किंवा या जागेच्या क्षमतेच्या २५ टक्के यापैकी जे कमी असेल ते.
·         उपरोक्त दोन्ही कार्यक्रमांव्यतिरिक्तच्या कार्यक्रमांसाठी बंदिस्त जागेत जिथे आसनक्षमता निश्चित आहे अशाठिकाणी  क्षमतेच्या ५० टक्क्यांपेक्षा जास्त नसेल तसेच जिथे आसनक्षमता निश्चित नाही अशा ठिकाणी २५ टक्के उपस्थिती असेल.  अशा प्रकारच्या सर्व कार्यक्रमांमध्ये ते जर खुल्या जागेत होत असतील तर आसनक्षमतेच्या २५ टक्के पेक्षा जास्त उपस्थिती नसेल.
·         क्रीडा स्पर्धा, खेळाचे समारंभ यासाठी कार्यक्रम स्थळाच्या आसन क्षमतेच्या २५ टक्क्यांपेक्षा जास्त उपस्थिती नसेल.
·         वरीलपैकी कोणत्याही प्रकारात न मोडणाऱ्या समारंभ किंवा एकत्र येण्याच्या कार्यक्रमात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण उपस्थितांची संख्या किती असावी हे निश्चित करेल. असे करतांना २७ नोव्हेंबर २०२१ चे आपत्ती व्यवस्थापनाच्या आदेशाचे पालन होईल असे बघितले जाईल.
·         उपहारगृहे, जीम, स्पा, चित्रपटगृहे, नाट्यगृहे या ठिकाणी क्षमतेच्या ५० टक्के उपस्थिती राहील.  या सर्वांना त्यांची संपूर्ण क्षमता तसेच ५० टक्के क्षमतेची संख्या जाहीर करावी लागेल.
·         याशिवाय जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास आवश्यक वाटेल तिथे निर्बंध लावता येतील आणि ते करण्यापूर्वी  त्यानी जनतेस त्याची कल्पना देणे आवश्यक राहील.
·         जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन जिथे आवश्यक वाटेल तिथे अधिक कठोर निर्बंध लावता येतील. अशा परिस्थितीत देखील जनतेला निर्बंधाची योग्य ती माहिती देणे आवश्यक राहील.
...

राज्यात आज 20 ओमायक्रॉनबाधितांची नोंद..

वेध माझा ऑनलाईन
कराड
कोरोनाबाधितांच्या  दैनंदिन रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ पाहायला मिळत आहे.   राज्यात आज  1410  नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 868  रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. मागील दोन- तीन दिवसांपासून कोरोनाची संख्या ही हजाराच्या पुढेच येत आहे. त्यातच नाताळ, वर्षाअखेर आणि नवीन वर्ष यामुळे होणाऱ्या गर्दीमुळे कोरोना रुग्णाचा स्फोट होईल, असेही सांगितले जातेय. तसेच ओमायक्रॉन व्हेरियंटनेही चिंता वाढवली आहे. देशातील सर्वाधिक ओमायक्रॉन बाधित रुग्ण महाराष्ट्रात आहेत.  राज्यात आतापर्यंत 65 लाख 1 हजार 243  रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.69 टक्के आहे.  

राज्यात आज  20 ओमायक्रॉनबाधितांची नोंद

राज्यात  आज  20 ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झालेली  आहे. आतापर्यंत 108 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात  झाली आहे. त्यापैकी 54 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे.

राज्यातील महापालिका, नगरपरिषदा आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुकाही पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता...

वेध माझा ऑनलाईन
कराड
कोरोनाचं संकट वाढत असून ओमिक्रॉनचाही फैलाव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे इलाहाबाद हायकोर्टाने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच उत्तर प्रदेश विधानसभेच्या आगामी वर्षी होणाऱ्या निवडणुका पुढे ढकलण्याचे आवाहन केलं आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशातील निवडणुका पुढे जाण्याची शक्यता असतानाच राज्यातील महापालिका, नगरपरिषदा आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुकाही पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता आहे. आज विधानसभेतही त्याबाबतची चर्चा झाली. शिवसेनेचे नेते सुनील प्रभू यांनी तर उत्तर प्रदेशातील निवडणुका पुढे ढकलण्याची सूचना कोर्टाने पंतप्रधानांना केली आहे. निवडणूक आयोगाने तसा निर्णय घेतला तर महाराष्ट्रातही निवडणूक आयोगाला असाच निर्णय घ्यावा लागेल असं म्हटलं आहे. त्यामुळे राज्यातही निवडणुका पुढे ढकलल्या जाण्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.

सुनील प्रभू यांनी एका चर्चे दरम्यान विधानसभेत हे विधान केलं. ओमिक्रॉनचे रुग्ण उत्तर प्रदेशात वाढत आहेत. त्यामुळे राज्यातील निवडणुका पुढे ढकलल्या जाव्यात अशी सूचना इलाहाबाद कोर्टाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली आहे. ही परिस्थिती पाहून निवडणूक आयोगाला निर्णय घ्यावा लागणार आहे. निवडणूक पुढे ढकला जाऊ शकते का याबाबत भविष्य मी करणार नाही, करू शकत नाही. पण महाराष्ट्रातही ओमिक्रॉनचे रुग्ण वाढले तर निवडणूक आयोगाला समान निर्णय घ्यावा लागेल, असं प्रभू यांनी म्हटलं आहे. त्यामुळे राज्यातील निवडणुका पुढे ढकलल्या जाणार असल्याची चर्चा आहे.

राज्यात कोणकोणत्या निवडणुका होणार आहेत?

राज्यात मुंबई, ठाणे आणि पुणे महापालिकेसह 22 महापालिकांची निवडणूक होणार आहेत. त्याशिवाय ग्रामपंचायती आणि नगर परिषदांच्याही निवडणुका होऊ घातल्या आहेत. मात्र, देशावर कोरोना आणि ओमिक्रॉनचं संकट वाढल्याने या निवडणुकाही पुढे ढकलल्या जातात की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

ओमायक्रोन नंतर आता आणखी एका नव्या व्हेरियंटची चिंता ; नव्या व्हेरियंटचं नाव आहे डेल्मिक्रॉन....

वेध माझा ऑनलाईन
कराड
गेल्या २ वर्षांपासून कोरोना विषाणूने बघता बघता संपूर्ण जगाला हादरवून टाकले. कोरोनामुळे काही काळासाठी लोकं जणू जगणंच विसरले होते. सर्वत्र भयावह परिस्थती आणि मरणाची भीती कायम होती. आत्तापर्यंत कोरोनाचे अल्फा, बीटा, गॅमा, डेल्टा, डेल्टा प्लस असे वेगवेगळे व्हेरियंट आपण पाहीले. या प्रत्येकावर मात करून आता कुठे लोकांनी सुटकेचा श्वास सोडला तोच कोरोनाच्या ओमिक्रॉन या नव्या व्हेरियंटने जगभरात चिंतेचे वातावरण निर्माण केले. हे कमी का काय? तर यात भर म्हणून आता आणखी एका नव्या व्हेरियंटची जगभर चर्चा सुरू झाली आहे. या नव्या व्हेरियंटचं नाव आहे डेल्मिक्रॉन.

 काय आहे डेल्मिक्रॉन?
– ‘डेल्मिक्रॉन’ हा कोरोनाचा दुसरा व्हेरियंट आहे. तूर्तास तो पश्चिमेतील देशांमध्ये पसरतोय असे निदर्शनास आले आहे. सध्या जगभरात ओमिक्रॉन आणि डेल्टा या दोन्ही व्हेरियंटचे रुग्ण मोठ्या संख्येत आढळून आले आहेत. त्यामुळे या दोन्ही व्हेरियंटला एकत्रित करून ‘डेल्मिक्रॉन’ असं नाव ठेवण्यात आलं आहे.
डेल्मिक्रॉनच्या बाधितांची सर्वाधिक संख्या युरोप आणि युएसमध्ये आढळून येत आहे. हि माहिती राज्य सरकारच्या टास्क फोर्सचे सदस्य शशांक जोशी यांनी दिली आहे. रिपोर्टनुसार, भारतात डेल्टाचे रुग्ण सर्वाधिक होते. मात्र देशात ओमिक्रॉन किती भयंकर स्वरूप दर्शवेल हे काही सांगू शकत नाही. कारण जगभरात ओमिक्रॉनचा कहर पाहता त्याकडे दुर्लक्ष करणे चुकीचे असल्याचे WHO च्या अधिकाऱ्यांनी आधीच स्पष्ट केले आहे.
डेल्मिक्रॉनविषयी बोलताना तज्ञ सांगतात कि, हा कोरोनाचा डबल व्हेरियंट आहे. तज्ज्ञांच्या मते, वास्तविक डेल्मिक्रॉन हा डेल्टा आणि ओमिक्रॉन या व्हेरियंटचे मिश्रण आहे. हे दोन्ही व्हेरियंट भारतात अस्तित्वात आहेत. त्यामुळे डेल्मिक्रॉनकडे दुर्लक्ष करणे चुकीचे ठरेल. शिवाय हि लाट धोकादायक ठरू शकते, असे तज्ञांचे निकष सांगतात. सध्या संपूर्ण जग डेल्टा आणि ओमिक्रॉन या दोन्ही व्हेरियंटचा सामना करत आहे आणि यांची रुग्णसंख्या वाढल्यानेच डेल्मिक्रॉनचा संसर्ग निर्माण झाला आहे.

आज जिल्ह्यात 16 बाधीत, 0 डिस्चार्ज

सातारा दि (जिमाका)
 जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यंत...
 जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 16 नागरिकांचे अहवाल  कोरोना बाधित आले तर 1 जणांचा मृत्यू झाला आहे तर 
0 जणांना आज डिस्चार्ज दिल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद यांनी दिली आहे

तालुकानिहाय कोरोना बधितांची संख्या पुढीलप्रमाणे...
जावली 0 कराड 1 खंडाळा 0 खटाव 4 कोरेगांव 2 माण 2 महाबळेश्वर 0  पाटण 0 फलटण 2 सातारा 3 वाई 0 व इतर 1 आणि नंतरचे वाढीव 1 असे  आज अखेर एकूण 16 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत.  

जिल्ह्यात विविध रुग्णालयात... 
आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज  संध्याकाळपर्यंत 0 जणांना घरी  सोडण्यात आले आहे.

कराड रोटरी क्लब आयोजित कै राजाभाऊ कोटणीस स्मृती जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेस उस्फुर्त प्रतिसाद...

वेध माझा ऑनलाईन
कराड
रोटरी क्लब ऑफ कराड, रोटरी क्लब ऑफ कराड चारीटेबल ट्रस्ट, आणि कराड बॅडमिंटन क्लब ,आयोजित कै . राजाभाऊ कोटणीस स्मृती जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धा नुकतीच पार पडली त्या स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला 

 कराडचे पोलीस उपअधीक्षक रणजीत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व संदीप कोटणीस ,रणजीत शेवाळे, रोटरी क्लबचे अध्यक्ष चंद्रकुमार डांगे ,सचिव अभय पवार, स्पोर्ट्स डायरेक्ट अजय भट्टड, कॉप्स चेअरमन शशांक पालकर,  किशोर कुलकर्णी, यांच्या हस्ते या सर्व स्पर्धांचे बक्षीस वितरण पार पडले 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचे स्वागत रोटरी क्लब कराडचे अध्यक्ष चंद्रकुमार डांगे यांनी केले सूत्रसंचालन प्रबोध पुरोहित यांनी केले तर सचिव अभय पवार यांनी आभार मानले .
जिल्हास्तरीय  स्पर्धेसाठी 293 स्पर्धकांनी सहभाग नोंदविला इंटरनॅशनल पद्धतीच्या हुवा कोर्ट वरती शिवाजी स्टेडियम कराड येथे या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या
स्पर्धा यशस्वी करण्याकरता निलेश फणसळकर, अतुल पाटील ओमकार पालकर ,प्रकाश गद्रे, रोटरी क्लबचे पब्लिक इमेज डायरेक्टर राजेश खराटे ,अभिजीत चापेकर, राजेंद्र कुंडले, जय राम सचदेव, सुहास पवार, अमित बुतकर , सदस्यांचे सहकार्य लाभले 

स्पर्धेतील विजयी स्पर्धक व त्यांचे गट पुढीलप्रमाणे....
 
10 वर्षाखालील मुली  1 अपूर्वा खाडिलकर ,2 श्रद्धा इंगळे 

13 वर्षाखालील मुली 1 गार्गी पाटील 2 रिया सावंत

15  वर्षाखालील मुली .1  गार्गी चव्हाण 2 जुलि घोरपडे 

17 वर्षाखालील मुली 1 रिया शहा 2 गार्गी चव्हाण 

19 वर्षाखालील मुले 1.  वेदांत शिंदे 2 सोहम बारटक्के 

10 वर्षाखालील मुले .1 ईशान देशमुख 2 भावेश  घोडके 
 
13 वर्षाखालील मुले 1  सोहम शिंदे 2 आदित्य पाटील 15 वर्षाखालील मुले ,1 आर्यन खाडिलकर  2 सोहम शिंदे 

17 वर्षाखालील मुले 1 वेदांत शिंदे 2, अथर्व शिंदे 

15 वर्षाच्या खालील दुहेरी मुले 1st सोहम शिंदे व ऋषिकेश जय देवकर 2 तनिष्क  केंजळे निशान वाळिंबे
 
19 वर्षाखालील दुहेरी मुले 1 जयेश निंबाळकर ,ओम पवार 2)राजेश्वर कानारी, ओमकार सावंत 
पुरुष एकेरी 1) ओमकार पालकर दोन))2 ) पुष्कराज कुलकर्णी पुरुष दुहेरी 1  ओमकार पालकर पुष्कराज कुलकर्णी 2 अतुल पाटील निलेश फणसळकर 

35 वर्षाच्या पुढे पुरुष दुहेरी 
 1) नीलेश फणसळकर अतुल पाटील
 2) जितेंद्र जाधव ,निलेश शिंदे 50 वर्षावरील 

पुरुष दुहेरी 
1) जितेंद्र जाधव सचिन देशमुख 
२) मिलिंद खामकर सायमन धनराज 

मिक्स डबल 
1) अभिषेक मोहिते, ईशा वेलणकर 
2) ओमकार पालकर यामिनी सुरवंशी 

महिला एकेरी
1) इशा वेलणकर 
2) आर्या घाडगे

माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून कराड शहरासह कराड दक्षिण मध्ये ७ आरोग्य केंद्रांना मंजुरी ; नवीन वर्षात आरोग्य केंद्रे उभारली जाऊन कार्यान्वित होतील.

वेध माझा ऑनलाईन
कराड
कोरोना काळात शासकीय आरोग्य यंत्रणेवर जो ताण पडला  त्यांची नोंद घेत सामान्य नागरिकांना आरोग्य सेवा शासकीय खर्चाने मिळण्यासाठी  आरोग्य केंद्रे वाढविण्याची गरज होती या अनुषंगाने माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील कराड, मलकापूर व सैदापूर येथे ७ नागरी आरोग्य केंद्रे मंजूर झाली आहेत. 

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत १५ व्या वित्त आयोगातून कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील कराड शहरातील शुक्रवार पेठ येथे २, छत्रपती संभाजी महाराज भाजी मार्केट येथे १, वाखाण रोड येथे १ याचबरोबर मलकापूरमधील लक्ष्मीनगर व आगाशिवनगर येथे प्रत्येकी १, आणि सैदापूर येथे १ असे एकूण ७ नागरी आरोग्य केंद्र मंजूर झाले आहेत. 

कोरोनाच्या काळात वाढत्या रुग्ण संख्येमुळे रुग्णांना आरोग्य सुविधा देताना आरोग्य यंत्रणेची दमछाक होत होती. असलेली यंत्रणा अपुरी पडत होती. अश्या परिस्थितीत प्रशासनासोबत वेळोवेळी बैठका  घेऊन माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रशासनाला सूचना दिल्या होत्या, वेळोवेळी बेड वाढविले गेले व नागरिकांना आरोग्य सुविधा देण्याचा प्रयत्न केला गेला. आरोग्य केंद्रे वाढविली पाहिजेत यासाठी आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी शासन स्तरावर पाठपुरावा करीत कराड दक्षिण मध्ये नागरी आरोग्य केंद्रे मंजूर करून आणली. हि नागरी आरोग्य केंद्रे मंजूर करण्यासाठी राज्याच्या आरोग्य विभागाचे आयुक्त डॉ. एन रामास्वामी, सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच सातारा जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे सहकार्य लाभले. 


गटनेते राजेंद्र यादव यांच्या उपस्थितीत विविध रस्ते कामाचा कराडात शुभारंभ...

वेध माझा ऑनलाईन
कराड
नामदार बाळासाहेब पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून शहराच्या रस्ते कामासाठी निधी उपलब्ध झाला आहे त्या माध्यमातून पालिकेचे गटनेते राजेंद्र यादव यांच्या उपस्थितीत येथील विविध रस्ते कामांचा शुभारंभ नुकताच करण्यात आला...
 
त्यामध्ये शनिवार पेठ येथील वडार नाका, मुळीक चौक ते गणपती मंदिर रस्ता करणे कामाचा शुभारंभ राजेंद्र यादव यांच्या उपस्थितीत करण्यात आला त्यानंतर  ख्वाजा खिजर वारांगना चौक... कासमभाई बोर्डिग...राजू सनगर गल्ली येथील रैनाक ते कांबळे घर तसेच... सुपेकर घर ते सदा कोरडे घर येथील रस्ता करणे कामांचा शुभारंभदेखील यावेळी  करण्यात आला... हेड पोस्ट ते  काठीयावाड वॉच हाऊस ते मुक्ता मोबाईल ते लल्लूभाई चाळ रस्ता करणे कामाचा शुभारंभ करून हा कार्यक्रम संपन्न झाला

यावेळी.विजयसिह यादव (भाऊ) नगरसेवक हणमंतराव पवार , विजय वाटेगावकर , बाळासाहेब यादव .गजेंद्र कांबळे ,ओंकार मुळे  संजयसिह यादव  बापू देसाई , नगरसेविका  सौ स्मिता हुलवान , श्रीमती आशा मुळे सौ खराडे, 
माजी नगराध्यक्षा सौ . संगीत देसाई  प्रमोद पवार दादा पवार , पिंटू गोखले , विनायक होगाडे , अर्जुन होगाडे , प्रवीण यादव , रणधीर रेड्डी , पंकज यादव , दिलीप यादव , परसु म्हेत्री , सुनील सूर्यवंशी , बंटी सूर्यवंशी , सनी पवार , जैनुद्दिन भादी ,  संदीप काटवटे , महेंद्र प्रजापत ,सचिन काळेल, गजानन सनगर , प्रशांत सनगर , पुष्पा सनगर , सतीश मुळीक , नजमुद्दीन आतार , खाजासाब मकानदार , दीपक मुठेकर ,  शशिकांत पाटील , महादेव काटवटे , विजय खंडेलवाल , बिपिन शहा , दीपक रावळ , अशोक रावळ , बबन तारळेकर , संजय पवार , दादासो पोळ , विजय मुळीक , अशोक माने , नूर महंमद शेख , गोरख मुळीक , अमित काटवटे सर , युवराज अलकुंटे , सुहास मुळीक , बबन मुजावर , रमेश सगरे , हिंदुराव तुपे , पंकज मोडीगिरी , शिवाजी मुळीक , आकाश मुळीक प्रसाद धोत्रे अजय डोंगरे , दीपक जाधव  तसेच स्थानिक महिलां व नागरिकांची उपस्थिती होती

Thursday, December 23, 2021

ओमायक्रोन रुग्णांच्यात होतेय वाढ : आज निर्बंधाची घोषणा होण्याची शक्यता...!

वेध माझा ऑनलाईन
कराड
राज्यातल्या कोविड रुग्ण संख्येत होणारी वाढ लक्षात घेता संसर्ग रोखण्यासाठी कशाप्रकारे निर्बंध लावता येतील यावर आज टास्क फोर्स सदस्यांची बैठक झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. आगामी नाताळ, नववर्ष स्वागत असे प्रसंग लक्षात घेऊन कमीतकमी गर्दी कशी होईल तसेच विवाह समारंभ, पार्ट्या या अनुषंगाने हॉटेल्स आणि उपाहारगृहात होणाऱ्या गर्दीवर कसे निर्बंध लावता येतील यादृष्टीने विस्तृत चर्चा करण्यात येऊन याबाबत आज नवी नियमावली जाहीर केली जाईल. 

दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या बैठकीत इतर राज्यांनी  लावलेल्या निर्बंधांवर तसेच युरोप, अमेरिकेत कोरोनाची वाढत्या संख्येवर चर्चा करण्यात आली. मुख्य सचिव देवशीष चक्रवर्ती, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार डॉ दीपक म्हैसेकर, पालिका आयुक्त इकबालसिंह चहल, वैद्यकीय शिक्षण सचिव सौरभ विजय, टास्क फोर्सचे डॉ संजय ओक, डॉ शशांक जोशी, डॉ अजित देसाई, डॉ राहुल पंडित आदींनी सहभाग घेतला आणि सूचना केल्यात

रात्रीचा लॉकडाऊन करण्याचा राष्ट्रीय स्तरावर विचार सुरू ??? ; अजित पवार यांची माहिती...

वेध माझा ऑनलाईन
कराड
 कोरोनाचं संकट अजून गेलं नाही.ओमिक्रॉनचा धोका आहेच पण अजून नवीन विषाणूही आला आहे, असं सांगतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कोरोनाची गंभीर दखल घेतली आहे. आता तर रात्रीचा लॉकडाऊन करण्याचा राष्ट्रीय स्तरावर विचार सुरू आहे, अशी माहिती अजित पवार यांनी विधानसभा सभागृहात दिली. त्यामुळे रात्रीचा लॉकडाऊन लागणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

कोरोना संकटातही विधानसभेत बेफिकीर असणाऱ्या सदस्यांना अजित पवार यांनी कानपिचक्या दिल्या. देशात कोरोनाचं संकट कायम आहे. त्यामुळे देशाचे पंतप्रधानही कोरोना संकटावर गंभीर आहेत. त्यामुळे देशात रात्रीचा लॉकडाऊन लावण्यावर उच्च स्तरावर चर्चा सुरू आहे, असं अजित पवार म्हणाले.

राज्यात आज 1179 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 615 कोरोनामुक्त ; राज्यात आज 23 ओमायक्रॉन बाधितांची नोंद

वेध माझा ऑनलाईन
कराड
कोरोनाबाधितांच्या  दैनंदिन रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ पाहायला मिळत आहे. राज्यात आज  1179  नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 615  रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 65 लाख 375  रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.71 टक्के आहे. 

राज्यात आज  23 ओमायक्रॉनबाधितांची नोंद

राज्यात  आज  23 ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झालेली  आहे. आतापर्यंत 88 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात  झाली आहे. त्यापैकी 42 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे. 



देशात ओमायक्रॉनमुळे कोरोनाची तिसऱ्या लाटेची भीती?? केंद्राचे राज्यांना महत्त्वाचे निर्देश.... स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आवश्यकतेनुसार पावले उचलण्याच्या सूचना...

वेध माझा ऑनलाईन
कराड
देशात ओमायक्रॉनमुळे कोरोनाची तिसरी लाट येईल अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. ओमायक्रॉनमुळे रोज मोठ्या संख्येत नवे रूग्ण आढळण्याची भीती आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्राने राज्यांना महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. त्यात स्थिती नियंत्रणात राहावी यासाठी आवश्यकतेनुसार तातडीची पावले उचलण्याच्या सूचना आहेत. नाईट कर्फ्यूसह इतरही निर्बंधांच्या सूचना केंद्राने केल्या आहेत. 

डेल्टाची जागा ओमायक्रॉनने  घेतल्यास रोज मोठ्या संख्येने नवे रूग्ण आढळण्याची भीती कोविड टास्क फोर्स प्रमुख डॉ. व्ही. के. पॉल यांनी व्यक्त केली आहे. देशातील 14 राज्यात ओमायक्रॉनचा 14 राज्यांत फैलाव झाला आहे. डेल्टापेक्षा ओमायक्रॉनचा तीनपट अधिक वेग आहे.
महाराष्ट्रातही ओमायक्रॉनच्या रुग्ण संख्येत भर पडत आहे. देशातील सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात काल आणखी 11 रुग्णांची भर पडली. यापैकी 8 रुग्ण मुंबई विमानतळावर तपासणीतील आहेत तर प्रत्येकी 1 रुग्ण पिंपरी चिंचवड, उस्मानाबाद आणि नवी मुंबई इथे आढळलेत. 
महाराष्ट्र राज्यातील ओमायक्रॉन बाधित रुग्णांची संख्या आता 65 वर पोहचली असून देशातील सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. ओमायक्रॉन व्हेरिएंटने आता जम्मू काश्मीरमध्येही शिरकाव केला आहे. जम्मू काश्मीरमध्ये ओमायक्रॉनचे तीन रुग्ण आढळून आले. भारतातील ओमायक्रॉन बाधित रुग्णांची संख्या आता 220 वर पोहोचली आहे.

आज जिल्ह्यात 13 बाधीत,29 डिस्चार्ज

सातारा दि (जिमाका)
 जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यंत...
 जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 13 नागरिकांचे अहवाल  कोरोना बाधित आले तर 2 जणांचा मृत्यू झाला आहे तर 
29 जणांना आज डिस्चार्ज दिल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद यांनी दिली आहे

तालुकानिहाय कोरोना बधितांची संख्या पुढीलप्रमाणे...
जावली 0 कराड 0 खंडाळा 0 खटाव 4 कोरेगांव 0 माण 0 महाबळेश्वर 0  पाटण 0 फलटण 3 सातारा 2 वाई 0 व इतर 2 आणि नंतरचे वाढीव 2 असे  आज अखेर एकूण 13 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत.  

जिल्ह्यात विविध रुग्णालयात... 
आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज  संध्याकाळपर्यंत 29 जणांना घरी  सोडण्यात आले आहे.

ओमिक्रॉन विषाणूच्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणा सुसज्ज ठेवा- जिल्हाधिकारी शेखर सिंह

सातारा दि. 23 (जिमाका) : ओमिक्रॉन विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांसह सर्व यंत्रणा  प्रशासनाने सुसज्ज ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी  शेखर सिंह यांनी दिले.  

कोविड -19 प्रादर्भाव नियंत्रणासाठी करावयाच्या उपाययोजनाबाबतची जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात बैठक संपन्न झाली. यावेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह बोलत होते. या  बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी राधाकिशन पवार यांच्यासह आरोग्य विभागातील व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह म्हणाले, कारोना प्रतिबंधक पहिला डोस घेणाऱ्यांनी दुसरा डोसही प्राधान्याने घेण्यासाठी यंत्रणांनी प्रयत्न करावेत.  ओमिक्रॉनचा  धोका पाहता लसीकरणाला गती द्यावी. जिल्ह्यातील खासगी आस्थापंनामध्ये कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन होत नसल्याचे निदर्शनास येत आहे. जे खासगी आस्थापना नियमांचे पालन करणार नाही अशांवर दंडात्मक कारवाई करावी.

पोलीस विभागाने ज्या ठिकाणी विवाह  व सार्वजनिक समारंभ होत आहे तेथे भेट देवून तपासणी करावी. नियमांचे पालन होत नसल्यास कारवाई करावी. शासकीय कार्यालयांमध्ये नागरिकांना लसीकरण झाल्याचे प्रमाणपत्र पाहूनच प्रवेश देण्यात यावा. नगर परिषद व नगर पंचायतींमधील कर्मचाऱ्यांचे 100 टक्के लसीकरण झाले आहे की नाही याची तपासणी करावी. ज्या शासकीय रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन प्लँट मंजुर केले आहेत त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे. तसेच ज्या ठिकाणी ऑक्सिजन प्लँट कार्यान्वीत आहेत त्याची काटेकोरपणे तपासणी करावी. ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर पुरेसा औषधसाठा उपलब्ध करुन घेण्याच्या सूचनाही  जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केल्या.

ऑक्सिजन सिलेंडर, व्हेटीलेटर्स, रेमडीसिव्हर, बालकांना लागणारी आय.व्ही. फ्ल्यूडसचा पुरेसा साठा आरोग्य विभागाने उपलब्ध ठेवावा. तसेच भविष्यात उद्भवणाऱ्या संभाव्य परिस्थितीला तोंड देण्यासाठी आत्तापासून सर्व साधण सामुग्री व आवश्यक साधनांचे योग्य नियोजन करावे.  त्यासाठी आर्थिक तरतुद करण्यात आल्याचेही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी यावेळी सांगितले.
0000

Wednesday, December 22, 2021

कोरोना लसीकरण पूर्ण न झालेल्या लोकांना सार्वजनिक वाहतुकीस प्रवेश देता येणार नाही ; राज्य शासनाची हायकोर्टात भूमिका...

वेध माझा ऑनलाईन
कराड
लसीकरण पूर्ण न झालेल्यांना मुंबईत लोकलनं प्रवासाची मुभा दिल्यास कोरोनाचा पुन्हा उद्रेक होऊ शकतो. लसीकरण न झालेली व्यक्ती ही स्वत:सोबत इतरांसाठीही धोका ठरू शकते. त्यामुळे कोरोना लसीकरण पूर्ण न झालेल्या लोकांना मुंबई लोकलनं प्रवास करू न देण्याचा निर्णय हा सर्वांच्याच हिताचा आहे. कारण लसीकरण पूर्ण झालेल्या लोकांच्या मुलभूत अधिकारांचं रक्षण करणं ही देखील राज्य सरकारची जबाबदारी आहे. त्यामुळे लस घेतलेल्या आणि न घेतलेल्यांमध्ये भेदभाव करण्याचा राज्य सरकारचा कोणताही हेतू नाही. असं राज्य सरकारनं बुधवारी प्रतिज्ञापत्राद्वारे स्पषंट केलं आहे. 

राज्याचे मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती यांनी हे प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे. राज्याच्या आपत्तकालीन विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी या नात्यानं त्यांनी हे प्रतिज्ञापत्र कोर्टात सादर केलं आहे. ज्यात त्यांनी स्पष्ट केलंय की, केवळ लोकल ट्रेनच नव्हे तर इतर सर्व सार्वजनिक वाहतुकींच्या वापरासाठीही लसीकरण पूर्ण होणं अनिवार्य करण्यात आलेलं आहे. राज्यात करोना प्रतिबंधक लस सहजरित्या उपलब्ध आहे. राज्यातील 7.9 कोटी जनतेनं लसीचा पहिला डोस घेतलाय तर 4.95 कोटी जनतेनं लसीचे दोन्ही डोस पूर्ण केले आहेत. तसेच राज्यात लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी दारोदारी जाऊन लसीकरणाची मोहिमही राबवण्यात येत आहे. तसेच घटनेच्या अनुच्छेद 14 नुसार लस घेतलेले आणि न घेतलेले असं अपवादात्मक वर्गीकरण करणं म्हणजे भेदभाव केल्यासारखं म्हणता येणार नाही. तसेच संचारमुक्तीच्या अनुच्छेद 19 चंही इथं उल्लंघन होत असल्याचाही आरोप करता येणार नाही असं या प्रतिज्ञापत्रातून स्पष्ट करण्यात आलंय. मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठानं राज्य सरकारच्या या प्रतिज्ञापत्रावर याचिकाकर्त्यांना उत्तर सादर करण्याचे निर्देश देत सुनावणी 3 जानेवारीपर्यंत तहकूब केली. 

काय आहेत याचिका?

वैद्यकीय सल्लागार असलेल्या योहान टेंग्रा यांनी अँड. अभिषेक मिश्रा यांच्यामार्फत याबाबत याचिका हायकोर्टात दाखल केली आहे. लसींचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाच लोकल ट्रेननं प्रवास करण्याची मूभा देण्यात येणार असून लसीकरण पूर्ण न केलेल्यांना मात्र लोकलनं प्रवास करता येणार नाही, असा निर्णय राज्य सरकारने 10 आणि 11 ऑगस्ट रोजी जारी केला. मात्र, सरकारचा हा निर्णय मनमानी आणि भेदभाव करणारा असून केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांच्या आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांविरुद्ध असल्याचा आरोप याचिकेतून करण्यात आला आहे. तसेच इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या (आयसीएमआर) मार्गदर्शक तत्त्वांनुसार लस अनिवार्य नसून ऐच्छिक असल्याचे स्पष्ट केले आहे. तसं असतानाही सरकारचा हा निर्णय मार्गदर्शक तत्वांच्या विरोधात आहे. लसीकरण केलेल्या आणि लसीकरण न केलेल्या व्यक्तींमध्ये कोणताही फरक नसावा कारण, दोघेही कोरोना विषाणुचे प्रसारक असू शकतात आणि रोग पसरवू शकतात. जी व्यक्ती कोरोनातून पूर्णपणे बरी झाली आहे. ती व्यक्ती लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या व्यक्तीपेक्षा कोरोना विषाणु पसरण्याची शक्यता कमी असल्याचेही याचिकेत म्हटलेलं आहे.
याशिवाय राज्य सरकारच्या या निर्णयाला सामाजिक कार्यकर्ते फिरोझ मिठबोरवाला यांनीही फौजदारी रीट याचिकेतून आव्हान दिलेलं आहे. सरकारच्या आदेशामुळे लस न घेतलेल्या अथवा लसींचा एकच डोस घेतलेल्या नागरिकांच्या उपजिविकेवर या निर्णयामुळे गदा येणार असून लसीकरणाच्या आधारे लोकांमध्ये भेदभाव करणे म्हणजे सर्वसामान्यांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन करण्यासारखं असल्याचा दावा मिठबोरवाला यांच्या याचिकेतून करण्यात आली आहे. लसीकरण करणं हे ऐच्छिक आहे त्यामुळे राज्य सरकारचा निर्णय हा नागरिकांच्या मूलभूत हक्कांचं उल्लंघन करणारा असल्याचा दावाही याचिकेतून केला गेला आहे. सार्वजनिक वाहतूक आणि जागा वापरण्यासाठी लसीकरण न केलेल्या व्यक्तींचाही समावेश करावा आणि राज्य सरकारच्या निर्णयात सुधारणा करण्यात यावी अशी मागणीही याचिकेत करण्यात आली आहे. तसेच केंद्र सरकारलाही यावर आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत बाजू माडण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणीही याचिकाकर्त्यांनी केली आहे.



राज्यात आज 1201 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद तर 953 रुग्ण झाले कोरोनामुक्त...

वेध माझा ऑनलाईन
कराड
कोरोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत चढ उतार पाहायला मिळत आहे. राज्यात आज 1201 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 953  रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 64 लाख 99  हजार 760 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.71 टक्के आहे. 

राज्यात आज ओमायक्रॉनचा एकही रुग्ण नाही

राज्यात  आज ओमायक्रॉनचा एकाही  ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झालेली नाही. आतापर्यंत 65 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात  झाली आहे. त्यापैकी 35 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे.

कृष्णा उद्योग समूहाचे शिल्पकार दिवंगत जयवंतराव भोसले यांची 97 वी जयंती नांदगाव येथे विविध उपक्रमांनी साजरी..

वेध माझा ऑनलाईन
कराड
 कृष्णा उद्योग समूहाचे शिल्पकार दिवंगत जयवंतराव भोसले यांची 97 वी जयंती नांदगाव (ता. कराड )येथे विविध  उपक्रमांनी साजरी करण्यात आली. यावेळी मान्यवरांचे हस्ते दिवंगत जयवंतराव भोसले यांच्या प्रतिमेचे पूजन  करण्यात आले. तर विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाला  दक्षिण मांड व्हॅली शिक्षण संस्थेचे  सचिव   एस टी सुकरे, प्राचार्य आर बी पाटील, कालवडे -बेलवडे उपसा जलसिंचन योजनेचे संचालक संभाजी पाटील, ग्रामपंचायत सदस्य प्रशांत सुकरे,  विकास सोसायटीचे माजी अध्यक्ष जगन्नाथ पाटील, तंटामुक्ती समितीचे उपाध्यक्ष जयवंत मोहिते,हितेश सुर्वे, धोंडीराम शिंदे, संजय पाटील, संदीप पाटील, मधुकर पाटील, अरुण पाटील, शिवाजी माळी, भगवान पाटील, अर्जुन माळी, रघुनाथ जाधव, प्रकाश रसाळ, सुनील शिनगारे, सोमेश्वर तलबार, विलास माटेकर, निवृत्ती माटेकर, दिलीप माटेकर ,अशोक शिंदे, रणधीर शिंदे, अनिकेत तांबवेकर ,बाळासो नलवडे,  गौरव कडोले,  रोहित मुळीक आदींसह ग्रामस्थ विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतही शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य प्रशांत सुकरे, वसंत माटेकर, विलास माटेकर, बाळासाहेब नलवडे, रणधीर शिंदे, अनिकेत तांबवेकर, गौरव कडोले, रोहित मुळीक हे उपस्थित होते. 

 

आज जिल्ह्यात 15 बाधीत,25 डिस्चार्ज

सातारा दि (जिमाका)
 जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यंत...
 जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 15 नागरिकांचे अहवाल  कोरोना बाधित आले तर 1 जणांचा मृत्यू झाला आहे तर 
25 जणांना आज डिस्चार्ज दिल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद यांनी दिली आहे

तालुकानिहाय कोरोना बधितांची संख्या पुढीलप्रमाणे...
जावली 0 कराड 3 खंडाळा 2 खटाव 0 कोरेगांव 1 माण 2 महाबळेश्वर 0  पाटण 0 फलटण 1 सातारा 5 वाई 0 व इतर 1 आणि नंतरचे वाढीव 0 असे  आज अखेर एकूण 15 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत.  

जिल्ह्यात विविध रुग्णालयात... 
आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज  संध्याकाळपर्यंत 25 जणांना घरी  सोडण्यात आले आहे.

ओमिक्रॉन वाढत राहिल्यास शाळा बंद करण्याचा निर्णय घेऊ ; शिक्षणमंत्र्यांचा इशारा...

वेध माझा ऑनलाईन
 कराड
राज्यात सध्या वाढत असलेल्या ओमिक्रोनबाबत राज्य सरकारकडून खबरदारी घेतली जात आहे. नुकतीच शाळांनाही परवानगी देत सुरुवात करण्यात आली आहे. अशात आता शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आज पुन्हा एकदा शाळा बंद करण्याबाबत महत्वाची माहिती दिली आहे. “महाराष्ट्रातील ओमिक्रॉन प्रकरणे वाढत राहिल्यास सरकार पुन्हा शाळा बंद करण्याचा निर्णय घेऊ शकते,” असा इशारा गायकवाड यांनी दिला आहे.

राज्यातील विद्यार्थ्यांसाठी शाळा पुन्हा सुरू केल्यानंतर आता त्या पुन्हा बंद करण्याबाबत निर्णय घेण्याची शक्यता आहे. याबाबात मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या की, देशात सध्या ओमायक्रॉनची सर्वाधिक प्रकरणे महाराष्ट्रात आहेत. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशातील राज्यातील शाळा महाविद्यालयांना टाळे लागले होते. त्यानंतर आता राज्यासह देशभरात अनेक ठिकाणी शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रातील ओमिक्रॉन प्रकरणे वाढत राहिल्यास सरकार पुन्हा शाळा बंद करण्याचा निर्णय घेऊ शकते.
देशातील एकूण 213 ओमिक्रॉन प्रकरणांपैकी महाराष्ट्रात 54 रुग्णांची नोंद केली गेली आहे. ओमिक्रॉनची प्रकरणे वाढत राहिल्यास, आम्ही पुन्हा शाळा बंद करण्याचा निर्णय घेऊ शकतो. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. दरम्यान, काही राज्यांमध्ये ओमिक्रॉनच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने केंद्र सरकारने राज्य सरकारांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली असून तिचे पालन करण्याचे निर्देश सर्वच राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांना दिले असल्याचे यावेळी मंत्री गायकवाड यांनी सांगितले.

महाराष्ट्रात फेब्रुवारी महिन्यात ओमायक्रॉनचे रुग्ण वाढतील, अशी शक्यता टास्क फोर्सने वर्तवली असल्याची आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती...

वेध माझा ऑनलाईन
कराड
दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या ओमायक्रॉन व्हेरिएंटने अनेक देशात शिरकाव केला आहे. भारतातही ओमायक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत. मागील कोरोनाच्या दोन्ही लाटेनंतर आता ओमायक्रॉन विषाणूचा शिरकाव झाला आहे. ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या संसर्गामुळे कोरोनाचा धोका पुन्हा वाढला आहे. तर, महाराष्ट्रात फेब्रुवारी महिन्यात ओमायक्रॉनचे रुग्ण वाढतील, अशी शक्यता टास्क फोर्सने वर्तवली आहे. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे  यांनी दिली.

देशातील 12 राज्यांमध्ये ओमायक्रॉनचे 200 हून जास्त रुग्ण सापडले आहेत. महाराष्ट्र आणि दिल्लीत ओमायक्रॉनचे रुग्ण  सर्वाधिक आहेत. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत 77 रुग्ण बरे झाले आहेत. दरम्यान, राजेश टोपे  म्हणाले की, ‘टास्क फोर्सने वर्तवलेल्या अंदाजानुसार महाराष्ट्रात फेब्रुवारीत ओमायक्रॉनचे रुग्ण वाढण्याची शक्यता आहे. ओमायक्रॉनचा संसर्ग वाढल्याने त्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कोरोनाबाबतचे नियम पाळणं गरजेचं आहे,’ असं आवाहन राजेश टोपे यांनी केले आहे
पुढे बोलताना राजेश टोपे म्हणाले, ‘महाराष्ट्रात कोरोनाची तिसरी लाट आलीच तर ती ओमायक्रॉन व्हेरिएंटचीच असेल. पण त्याबाबत फार घाबरण्याची गरज नाही कारण ओमायक्रॉनचा संसर्ग झालेल्या रुग्णांमध्ये हॉस्पिटलाईज होण्याचे प्रमाण फार कमी आहे. परंतु, असं असलं तरी नाताळ आणि नववर्ष साजरं करताना काळजी घ्यावी.

गटनेते राजेंद्र यादव यांच्या उपस्थितीत शहरातील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ ; ना बाळासाहेब पाटील यांच्या माध्यमातून शहरासाठी 11कोटी निधी उपलब्ध...

वेध माझा ऑनलाईन
कराड
नामदार बाळासाहेब पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून शहराच्या रस्ते कामासाठी निधी उपलब्ध झाला आहे त्या माध्यमातून पालिकेचे गटनेते राजेंद्र यादव यांच्या उपस्थितीत येथील विविध रस्ते कामांचा शुभारंभ नुकताच करण्यात आला...

नामदार बाळासाहेब पाटील यांच्या विशेष प्रयत्नाने जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून शहरातील 115 कामासाठी 11 कोटी 26 लाख इतका निधी उपलब्ध झाला आहे त्या माध्यमातून पालिकेचे गटनेते राजेंद्र यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील मुख्य रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ नुकताच करण्यात आला त्यामध्ये येथील शुक्रवार पेठ सात शहीद चौक येथील इंगवले यांच्या घरापासुन ते प्रकाश पवार यांच्या घरासमोरुन जाणारा रस्ता...... तसेच संत तुकाराम हायस्कूल, राम मंदिर ते 11 फुटी महारुद्र हनुमान मंदिर याठिकाणचा रस्ता... तसेच शेलार वाडा ते सुहास शिंगण यांच्या घरा समोरून चौका पर्यतच्या रस्ता...आदी रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ गटनेते  यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला... यावेळी बांधकाम सभापती हणमंतराव पवार नगरसेविका सौ स्मिता  हुलवान तसेच जनशक्तीचे नगरसेवक व विविध मान्यवर  उपस्थित होते तसेच शनिवार पेठेतील लल्लूभाई चाळ रस्ता काँक्रेटिकरण करणे यादेखील कामाचा शुभारंभ याठिकाणी पार पडला...
यावेळी.विजयसिह यादव (भाऊ) नगरसेवक हणमंतराव पवार , विजय वाटेगावकर , बाळासाहेब यादव .गजेंद्र कांबळे ,ओंकार मुळे  जयंत बेडेकर  सुहास पवार अखतर आंबेकरी .शिवाजीराव पवार  वैभव हिंगमिरे , संजयसिह यादव मा बापू देसाई , दिनेश यादव  नगरसेविका  सौ स्मिता हुलवान , श्रीमती आशा मुळे .सौ सुप्रिया खराडे यांच्यासह.राहुल चव्हाण , प्रदीप माने ,अनिल जाधव, माधव पिसे,शिवाजी माळी अण्णा, जमनादास ठक्कर, केतन ठक्कर, बच्चू रावल, राजू रावल , किशोर रावल, संजय माळी , सतीश माळी,दीपक शहा , अरुण बेडके रावळ , शरद मुंढेकर , राजू कोरडे , शिरीष शहा शरीष घोडके , संदीप मुंढेकर , विलास बेडके ,दीपक कोरडे , सौरभ शहा तसेच स्थानिक महिलांचा व नागरिकांची उपस्थिती होती