कराड
पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी दोन दिवसांपूर्वी म्हणजे रविवार दिनांक 12 रोजी कराडच्या साई पायी पालखी सोहळ्यास नगर जिल्ह्यात अचानक सपत्नीक भेट देत सर्व साईभक्तांना धक्काच दिला या उभयतांनी पालखीत सामील होऊन साईबाबांच्या पादुकांचे दर्शन घेतले व पालखी खांद्यावर घेत साई नामाचा जयघोष केला
कराडच्या दत्त चौक मंदिरातील साईबाबा पायी पालखी सोहळा गेली कित्येक वर्षे अखंड चालू आहे याहीवर्षी 5 दिसेम्बर ते 18 डिसेंबर पर्यंत हा सोहळा साजरा होत आहे शेकडो साईभक्त या सोहळ्यात सहभागी होत असतात प्रतिवर्षी प्रमाणे पालखी सोहळा कराडमधून पायी चालत काल रविवारी अहमदनगर जिल्ह्यातील सुपा येथे आल्यानंतर याठिकाणी विसाव्यासाठी पालखी थांबली असता अचानक आमदार निलेश लंके त्याठिकाणी आले त्यांनी पालखीचे आदरातिथ्य केले साईबाबांचे मनोभावे दर्शन घेतले आणि पालखी खांद्यांवर घेण्याची इच्छा बोलून दाखवली त्याप्रमाणे त्यांनी पालखी खांद्यावर घेत साई नामाचा जयघोष करत सम्पूर्ण परिसरातून पालखीचे भ्रमण करून घेतले त्यानंतर सर्व साईभक्तांसह आमदार लंके यांनी चहा पानाचा आस्वाद घेत सर्वांची आदराने विचारपूस करत आपला व्यक्तिगत मोबाईल नंबर सर्वांना दिला काही अडचण आल्यास डायरेक्ट मला फोन करा असे सांगितले त्यानंतर रात्री मुक्काम कुठे आहे अशी विचारणा करत रात्रीची जेवण राहण्याची सोय व्यवस्थित आहे का? मी रात्री तुमच्याशी गप्पा मारायला येणार आहे असेही म्हणाले आणि रात्री 10 च्या सुमारास ते पुन्हा पालखीच्या मुक्काम स्थळी आले बाबांचे दर्शन घेतले व सर्व भक्तांबरोबर त्यांनी शब्द दिल्याप्रमाणे गप्पा मारल्या नंतर रात्री उशिरा ते तेथून निघून गेले
आमदार निलेश लंके हे लोकवर्गणीतून लोकांनी निवडून दिलेले राज्यातले लोकप्रिय आमदार आहेत त्यांनी कोविड संकटात केलेले काम देशात आदर्शवत मानले जाते अतिशय साध्या रहाणीमानाचे आमदार म्हणून त्यांचा लौकिक आहे गोरगरीब जनतेचे नेते म्हणून त्यांना महाराष्ट्र ओळखतो शब्दाला जगणारा लोकनेता म्हणून त्यांची ओळख आहे त्यांच्या या सर्व स्वभाव विशेष गुणांचा अनुभव यानिमित्ताने कराडच्या साईभक्त पालखी सोहळ्याच्या सर्व साईभक्तांनी अगदी जवळून घेतला त्याचीच चर्चा सगळे भक्त मोठ्या अभिमानाने करताना दिसत होते
No comments:
Post a Comment