कराड
वेतनवाढी नंतरही सरकारी कर्मचाऱ्यांच्या तुलनेत एसटीच्या कर्मचाऱ्यांच्या पगारामधील तफावत चर्चेत आहे त्यामुळे काही कर्मचाऱ्यांना झालेली पगारवाढ अमान्य असल्याची माहिती समोर आली आहे
एसटी कर्मचाऱ्यांच्या नवनियुक्त चालकाचं एकूण वेतन 24 हजार 595 करण्यात आलंय. सरकारी कर्मचारी जो चालक आहे, त्याला एकूण वेतन 35 हजार मिळतं. इथं 10 हजार 405 रुपयांची तफावत आहे. 10 वर्षे पूर्ण झालेल्या एसटीच्या चालकाचं एकूण वेतन 28 हजार 800 झालंय. तर सरकारी चालकाला 10 वर्षांनंतर 40 हजार पगार मिळतो. म्हणजे 11 हजार 200 रुपयांची तफावत आहे. 20 वर्षे पूर्ण झालेल्या एसटीच्या चालकाला एकूण वेतन 41 हजार 40 रुपये मिळेल. तर सरकारी चालकाला 45 हजार पगार मिळतो.
इथे 3 हजार 960 रुपयांची तफावत आहे.
30 वर्षे पूर्ण झालेल्या एसटीच्या चालकाला एकूण वेतन हे 56 हजार 880 करण्यात आलंय. सरकारी कर्मचाऱ्याला 55 ते 60 हजार पगार मिळतो.
इथं जवळपास 3 हजार 120 रुपयांची तफावत आहे
दरम्यान झालेली पगारवाढ तब्बल 79 टक्के कर्मचाऱ्यांना मान्य नाही, आम्हाला पगारवाढीची भीक नको. विलिनीकरण हवं अस त्यांचं म्हणणं आहे
No comments:
Post a Comment