वेध माझा ऑनलाइन - काँग्रेसच्या विरोधात बोलले तर ते भाजपाच्या संपर्कात आहेत अस होत नाही. भाजपाचे दार सगळ्यासाठी उघडे आहेत जिथे आम्हाला गरज वाटेल तिथे आम्ही घेऊ, असं म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्याबद्दल मोठं वक्तव्य केलं.काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेसच्या नेतृत्वावर केलेल्या विधानामुळे राज्यभरात राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. अशातच बावनकुळे यांनीही पृथ्वीराज चव्हाण यांच्याबद्दल मोठं विधान केलं आहे.
'काँग्रेसमध्ये ज्या ठिकाणी चुकतंय त्या ठिकाणी ते बोलत आहेत, त्यामुळे त्यांना वागणूक देखील वाईट मिळत आहे. आता विधानसभेत त्यांना चौथ्या रांगेत बसवण्यात आले होते. काँग्रेसच्या विरोधात बोलले तर ते भाजपाच्या संपर्कात आहेत असं होत नाही. भाजपाचे दार सगळ्यांसाठी उघडे आहेत जिथे आम्हाला गरज वाटेल तिथे आम्ही घेऊ, असं बावनकुळे म्हणाले. तसंच, एकदा आरोप झाला आणि त्यानंतर कोर्टात शिक्षा झाली तर आम्ही त्यांना घेत नाही, असंही बावनकुळे यांनी स्पष्ट केलं.
सत्ता संघर्ष बाबत वेगळा घटनापीठ तयार करण्यात आला आहे. एखाद्या कार्यक्रमामध्ये न्यायमूर्ती येतात यात काय गैर आहे. आपण काय आरोप करतो यावर विचार करायला पाहिजे, आपले आरोप म्हणजे न्यायव्यवस्था वर विश्वास नाही का, असा टोलाही बावनकुळे यांनी जयंत पाटील यांना लगावला.
बारामतीची घडी यावेळी बंद करणार अस मी बोललो. यात गैर काहीच नाही मी बारामतीत काम करतोय. मी 3 महिन्याला एकदा जाणार आहे. निर्मला सीतारामन देखील 6 वेळा बारामतीमध्ये येणार आहेत. बारामती शहर म्हणजे लोकसभा मतदारसंघ नाही. शहराचा विकास केला म्हणजे काही उपकार केले नाही, अशी टीकाही बावनकुळे यांनी केली.
मंत्रिमंडळ विस्तार संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारा कारण तो त्यांचा विषय आहे. विस्तार कधी करायचं आणि कुणाला कोणती खाती देणं हे मुख्यमंत्री आणि उपमख्यमंत्री यांचा अधिकार आहे, अशी प्रतिक्रिया बावनकुळे यांनी मंत्रिमंडळ विस्तारावर दिली.
ठाकरे गटातील कार्यकर्ते राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडवत आहेत. पोलीस त्याचा तपास करत आहेत. उद्धव ठाकरे यांना माझी विनंती आहे की त्यांनी त्यांच्या लोकांना समजवून सांगावे. रस्त्यावरचा वाद टाळावे ही माझी विनंती राहील, असंही बावनकुळे म्हणाले.
'रोज मी पंकजा मुंडे यांच्याशी मी बोलत आहे. त्या सध्या राष्ट्रीय पातळीवर काम करत आहेत. भाजपा पक्षात नाराज नाही ते इमानदारीत काम करत आहेत, असंही बावनकुळे म्हणाले.
नाना पाटोळे यांना दिवसा स्वप्न पडत आहेत. नाना पटोले यांचीच परिस्थिती काँग्रेस मध्ये केविलवाणी आहे. ते नितीन गडकरी साहेबांना काय ऑफर देणार, मी जीव देईन पण काँग्रेसमध्ये जाणार नाही हे स्वतः गडकरी साहेब बोलले आहेत, असा टोलाही बावनकुळे यांनी लगावला.
No comments:
Post a Comment