Friday, September 9, 2022

गणपती विसर्जन काळात कर्तव्य बजावणाऱ्या 200 पोलीस बांधवांना अल्पोपहाराचे वाटप ; रोटरी क्लब ऑफ कराडचा उपक्रम


वेध माझा ऑनलाइन - 
प्रतिवर्षी रोटरी क्लब ऑफ कराडच्या वतीने गणेश विसर्जनानिमित्त मिरवणुकी दरम्यान कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस बांधवांना पौष्टिक अल्पोपहाराचे वाटप करण्यात येते याहीवर्षी रोटरी क्लब ऑफ कराडच्या वतीने याच काळात कर्तव्य बजावणाऱ्या 200 पोलीस बांधवांना अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले. 

यावेळी कराड तालुका पोलीस उपअधीक्षक डॉ रणजीत पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी आर पाटील, रोटरी क्लब ऑफ कराड चे अध्यक्ष रो प्रबोध पुरोहित, सचिव रो चंद्रशेखर पाटील, प्रकल्प प्रमुख रो राजेश खराटे, रो रमेश गोखले, रो चंद्रकुमार डांगे, रो अभय पवार, अॅन सौ सीमा पुरोहित व अॅनेट कु. सई पुरोहित आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment