Saturday, September 3, 2022

अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशासाठी थेट दिल्लीतुन हलली सूत्रे ; कोणत्या नेत्यावर आहे त्यांच्या प्रवेशाची जबाबदारी?...वाचा बातमी...

वेध माझा ऑनलाइन ; महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय घडेल याचा आता नेम राहिला नाही. शिंदे गटाने राजकीय नाट्य घडवल्यानंतर आता काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आता भाजपच्या गळाला लागले आहे. चव्हाण लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे, चव्हाणांसाठी थेट दिल्लीतून सूत्र हलली असून केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे हेच यामागचे सूत्रधार असल्याचे समोर आले आहे.

महाराष्ट्रामध्ये सत्तानाट्य होऊन एक महिना होत नाही तोच आता काँग्रेस नेते आणि माजी मंत्री अशोक चव्हाण पक्ष सोडून भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. दोनच दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अशोक चव्हाण यांची एका ठिकाणी भेट झाली. त्यामुळे राजकीय चर्चांना आणखी बळ मिळाले. दिल्लीतून केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्यावर ही जबाबदारी सोपवली आहे. एकनाथ शिंदे यांनी प्राथमिक बोलणी केल्यानंतर भाजपकडून प्रयत्नांना सुरुवात झाली आहे, असं तेथील पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.

No comments:

Post a Comment