Sunday, September 11, 2022

कराड तालुक्यातील धोंडेवाडीची कन्या साक्षी पाटील नासाच्या अंतराळ प्रोजेक्टसाठी लवकरच होणार रवाना ; कराडकरांसाठी अभिमानाची बाब ;

वेध माझा ऑनलाइन - कराड तालुक्यातील धोंडेवाडी येथील साक्षी पाटील यांची अमेरिकन अंतराळ संस्थेच्या प्रोजेक्टसाठी नुकतीच निवड झाली आहे साक्षी पाटील या संपूर्ण भारतातुन या प्रोजेक्टसाठी एकमेव कॅंडिडेट ठरल्या आहेत कराडसह सातारा जिल्ह्यासाठी ही खूपच  अभिमानाची आणि गौरवाची बाब ठरली आहे.

सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात यानिमित्ताने एक मानाचा तुरा रोवला गेला आहे कराड तालुक्यातील धोंडेवाडी आनंद गावच्या कन्या साक्षी चंद्रकांत पाटील यांची नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशन या अमेरिकन अंतराळ संशोधन केंद्रात प्रोजेक्टसाठी निवड झाली आहे विशेष म्हणजे त्या भारतातील एकमेव कॅंडिडेट ठरल्या आहेत साक्षी यांची निवड ही सातारा जिल्ह्यासह राज्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.. साक्षी यांनी भोपाळ येथील एरोनॉटिक इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिक्षण पूर्ण केले तिथूनच त्यांची नासामध्ये निवड झाली आहे जगातील फक्त दहा जणांची या प्रोजेक्टसाठी निवड करण्यात आली असून त्यात साक्षी पाटील या भारतातील एकमेव कॅंडिडेट ठरल्या आहेत 

साक्षी पाटील या स्वातंत्र्यसैनिक स्व. आनंदराव पाटील यांच्या नात आहेत आनंदराव पाटील यांनी आपलं आयुष्य धोंडेवाडी या गावासाठी वाहून दिलं होत त्यांच्या कार्याने धोंडेवाडी गावाला आनंदगाव म्हणून संबोधले जाऊ लागले आणि आता त्यांच्या नातीने तिच्या कार्यातून महाराष्ट्रासह देशात तिच्या गावाचे नाव आणखी उंच केले आहे

No comments:

Post a Comment