Saturday, September 10, 2022

उद्या दि. 11 रोजी आधार कार्ड मतदार यादीशी लिंक करण्यासाठी विशेष शिबिर ; मतदारांनी मोठ्या संख्येने शिबिरामध्ये सहभागी व्हा ; जिल्हाधिकारी

वेध माझा ऑनलाइन -  उद्या रविवार दि. 11 रोजी आधार कार्ड मतदार यादीशी लिंक करण्या साठी विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. यावेळी संबंधित बी एल ओ नी आपापल्या मतदान केंद्रांवरती सकाळी.9:00 ते सायं.6:00 पर्यंत उपस्थित राहावे आपल्या केंद्राशी संबंधित शाळांना तशा सूचनाही देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे 

आतापर्यंत सातारा जिलयातील 10 लाख हुन अधिक मतदारांचे आधार लिंक झाले आहे.
सातारा जिल्ह्यातील मतदार यादीमध्ये नाव असलेल्या मतदारांनी या उद्याच्या विशेष शिबिरामध्ये सहभागी होऊन आपला आधार क्रमांक मतदार यादीशी लिंक करून घ्या, असे आवाहन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी केले आहे.  

No comments:

Post a Comment