वेध माझा ऑनलाइन - येथील यशवंत हायस्कूल येथे नुकतेच रयत शिक्षण संस्थेच्या कराड व पाटण तालुक्यातील सर्व शाळांमधील मुख्याध्यापक व गणित आणि विज्ञान विषयांच्या शिक्षकांची एक दिवसीय कार्यशाळा पार पडली या एक दिवसीय कार्यशाळेमध्ये रोटरी क्लब ऑफ कराड च्या वतीने त्यांना सीपीआर चे प्रशिक्षण देण्यात आले.
एखाद्या डॉक्टरानी आपात्कालीन परिस्थितीमध्ये रुग्णाच्या छातीवर दाब देऊन जीव वाचवल्याचं तुम्ही पाहिलं असेल. यालाच सीओलएस असं म्हटलं जातं. सीओलएस हि आपत्कालीन उपचार प्रक्रिया आहे. मात्र, त्यासाठी बेसिक प्रशिक्षणाची आवश्यकता आहे. त्या व्यक्तीला सीपीआरची गरज आहे की नाही हे लक्षात येणं आवश्यक आहे. सीपीआर कसा द्यायचा हे माहीत असल्यास संकटकाळी एखाद्या व्यक्तीचा जीव वाचवता येतो.रोटरी क्लब ऑफ कराड भूलतज्ञ डॉ शेखर कोगनुळकर यांनी उपस्थित सर्वांना शास्त्रोक्त पद्धतीने सीपीआर चे ट्रेनिंग दिले. तसेच बालरोग तज्ञ डॉ मनोज जोशी यांनी सीपीआर ट्रेनिंग चे महत्व व माहिती दिली उपस्थित शिक्षकांनी विचारलेल्या शंकांचे निरसन देखील यावेळी करण्यात आले.
याप्रसंगी रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य रविंद्र पवार, यशवंत हायस्कूलचे मुख्याध्यापक डी डी पाटील, इतर शिक्षक तसेच रोटरी क्लब ऑफ कराडचे प्रेसिडेंट प्रबोध पुरोहित, डो शेखर कोगनुळकर, डॉ मनोज जोशी हे उपस्थित होते.
No comments:
Post a Comment