कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार, राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री आमदार बाळासाहेब पाटील यांच्या प्रचार शुभारंभ सभेचे आयोजन सोमवार दिनांक 04/11/2024 रोजी दुपारी 04.30 वाजता पाल ता. कराड येथे करण्यात येणार आहे, अशी माहिती कराड उत्तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष देवराज पाटील (दादा) यांनी दिली.
यावेळी महाराष्ट्र, कर्नाटकसह देशभरातील भाविकांचे आराध्य दैवत असलेल्या श्री खंडोबा म्हाळसाकांत चरणी मान्यवरांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवण्यात येणार आहे. आणि श्री हनुमान मंदिरासमोरील पटांगणात भव्य प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले असून याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनिल माने, तसेच महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे प्रमुख पदाधिकारी आणि कराड, कोरेगाव, सातारा व खटाव तालुक्यांतील मतदार संघातील विविध गावचे ग्रामस्थ व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
आमदार बाळासाहेब पाटील यांच्या प्रचार शुभारंभाच्या जाहीर सभेसाठी सोमवार दिनांक 04/11/2024 रोजी दुपारी 04.30 वाजता पाल, ता. कराड येथे उपस्थित रहावे, असे आवाहन कराड उत्तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष देवराज पाटील (दादा) यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment