तरुण, उमदा जनतेत राहणारा, अर्ध्या रात्री उपलब्ध असणारा असा आमदार कराड दक्षिणेला हवा आहे कोणत्याही पदावर नसताना अतुल भोसलेंनी विकासकामे मंजूर करून आणली. मात्र पृथ्वीराजबाबांनी मुख्यमंत्री असताना एक फुटकी कवडी नाही दिली, अशी टीका देवेंद्र फड णवीस यांनी
केली.दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना थेट इशाराच दिला. कराड दक्षिणचा फैसला झालाय. कराड दक्षिणमध्ये ‘हवाओंका रूख बदल चुका है’, असं सांगत अतुलबाबाच निश्चित विजयी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान साठ वर्षे घरात सत्ता असूनही त्यांना जिल्ह्याचा काहीच विकास करता आला नाही असा आरोप उदयनराजे भोसले यांनी यावेळी केला तरुण वयात पृथ्वीराज चव्हाण यांनी जिल्ह्यासाठी विकासात्मक काहीच केलं नाही मग या वयात त्यांच्याकडून काय अपेक्षा करायची असेही ते यावेळी म्हणाले
महायुतीचे कराड दक्षिणमधील अधिकृत उमेदवार डॉ. अतुलबाबा सुरेश भोसले यांच्या प्रचारार्थ आज कराड येथील मलकापूरात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा पार पडली. यावेळी फडणवीस यांनी काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर निशाणा साधला. यावेळी खासदार उदयनराजे भोसले, जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, कराड दक्षिणमधील अधिकृत उमेदवार डॉ. अतुलबाबा सुरेश भोसले, डॉ. सुरेश भोसले, भारत पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
महायुतीचे उमेदवार डॉ. अतुल भोसले कोणत्याही पदावर नाहीत. तरी देखील रस्त्यांसाठी ४७३ कोटी, ७७ कोटींच्या पाण्याच्या योजना, छत्रपती शिवाजी स्टेडियमसाठी ९६ कोटींचा निधी त्यांनी मंजूर करून आणला. आम्ही त्यांना सर्वतोपरी सहकार्य केलं. आमच्या पेनाला कधी लकवा मारत नाही. अतुलबाबांसाठी आमचा पेन नॉनस्टॉप आहे. परंतु, पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांनी छत्रपती शिवाजी स्टेडियमसाठी फुटकी कवडी देखील दिली नसल्याचा आरोप यावेळी फडणवीसांनी केला.
काहीही झालं तरी माझ्यामुळेच झाल्याचं सांगत श्रेय घेण्याची पृथ्वीराज बाबांची प्रवृत्ती
पुणे-कोल्हापूर महामार्गाच्या विस्तारीकरण आणि हायवेवरील पुलांसाठी केंद्र सरकारने एकत्रित निधी दिलाय. परंतु, हायवेरचा चार पदरी पूल आम्ही मंजूर केल्याचे पृथ्वीराज चव्हाण सांगतात. काहीही झालं तरी माझ्यामुळेच झाल्याचं सांगून श्रेय घेण्याची त्यांची प्रवृत्ती असल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली. जो काम करतो, त्याला जनता श्रेय देत असते. मागायची गरज नसते, असंही फडणवीस म्हणाले.
साठ वर्षे घरात सत्ता असूनही त्यांना विकास करता आला नाही : उदयनराजे
लोकसभा निवडणुकीवेळीच अतुल बाबांचा निकाल लागलाय. समोर कोण आहे यापेक्षा त्याच्या माध्यमातून लोकहिताची किती कामे झाली हे पाहणे गरजेचे आहे. साठ वर्षे झाली माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या घरात सत्ता होती. एवढी वर्षे सत्ता केंद्रे असताना देखील कराड व संपूर्ण सातारा जिल्हा त्याच्याकडून दुर्लक्षित राहिला. एन तारुण्याच्या काळात पृथ्वीराज बाबांना जे जमलं नाही ते आज त्यांच्याकडून अपेक्षा करणं म्हणजे त्यांच्यावर अन्याय करण्यासारखं होईल. गेलेली वेळ आणि समुद्राच्या लाटा माग कोणीही असुदे कोणासाठी थांबत नसतात असे खासदार उदयनराजे भोसले यांनी म्हटले.
No comments:
Post a Comment