पुढारी ने आयोजित केलेल्या परिसंवादात आमदार पृथ्वीराज चव्हाण हे केंद्र सरकारने केलेला उड्डाणपूल मी केला म्हणून सांगतात... अहो केंद्रात भाजप ची सत्ता आहे...या सगळ्या गोष्टींशी तुमचा काय संबंध ? नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने हे पूल होत आहेत... एकदा नितीन गडकरींचे पृथ्वीराज बाबांबद्दलचे खासगीत मत जाणून घ्या...तुम्हाला त्यांचे मत कळेल...आणि तुम्ही पूल केला म्हणून काय सांगता...? तुम्हाला पाटण कॉलनी मधील तुमच्या घराला लागून असणाऱ्या झोपडपट्टी चे घरकुल करता आले नाही...तुम्ही मुख्यमंत्री होता...त्यापूर्वी केंद्रात होता... तुमच्या 3 पिढ्या 50 वर्षे सत्तेत होत्या...तरी तुम्हाला साधे घरकुल करता आले नाही...अनेकवर्षं ती झोपडपट्टी तशीच तिथे आहे...मात्र, तुमच्या घराच्या भिंतीला लागुन ती झोपडपट्टी आहे म्हणून तुम्ही स्वतःच्या घराची उंची वाढवून घेतलीत...आणि...उड्डाणपूल केला म्हणून सांगता...? असा घणाघात डॉ अतुल भोसले यांनी आ पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर आज केला...
दरम्यान... राज्यात सत्तेत संधी मिळाल्यास त्याठिकाणचे पुनर्वसन करून तिथे घरकुल उभे करण्याचे काम आपण करणार प्राधान्याने करणार असल्याचा शब्द त्यांनी यावेळी दिला
आज वडगाव येथे डॉ अतुल भोसले यांच्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ झाला यावेळी पार पडलेल्या सभेत त्यांनी आ पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर जोरदार घणाघात केला...
No comments:
Post a Comment