होऊ घातलेली विधानसभा निवडणूक विचारांवर आधारित असल्याने कराड उत्तर च्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेऊन स्व. यशंतरावजी चव्हाण साहेबांचे विचार पुढे घेऊन जाण्यासाठी सहकार्य करा असे प्रतिपादन आमदार बाळासाहेब पाटील यांनी केले.मसूर ता. कराड येथील प्रमुख कार्यकर्त्यांच्या संवाद बैठकी प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी सातारा जिल्हा परिषदेच्या शिक्षण व अर्थ समितीचे माजी सभापती मानसिंगराव जगदाळे, बाळासाहेब जगदाळे, तानाजीराव साळुंखे, लहुराज जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
आमदार पाटील पुढे म्हणाले की, मसूर ही ऐतिहासिक नगरी असून, आजूबाजूच्या गावांकरिता व्यापाऱ्याचे केंद्र आहे हे जाणून, मसूरचा सर्वांगीण विकास करण्याचे उद्दिष्ट ठेवून आपण दिलेल्या अधिकाराचा वापर करून लोकप्रतिनिधी या नात्याने या पंचवार्षिक मध्ये सुमारे 45 कोटी 47 लक्ष रुपयांची विकास कामे केली असून, काही विकास कामे पूर्ण झाली असून काही सुरू आहेत.
बूथ कमिटी सदस्यांनी तुतारी वाजवणारा माणूस हे आपले चिन्ह घराघरात पोहोचवा, प्रत्येक वार्डातून जास्तीत जास्त मतदान होण्याकरिता सूक्ष्म नियोजन करा असे सांगून ही विचारावर आधारित निवडणुक असून, यशवंतराव चव्हाण साहेबांचे विचार आपणास पुढे घेऊन जायचे आहे, त्याकरिता सहकार्य करा असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.
यावेळी जि. प. चे माजी सभापती मानसिंगराव जगदाळे, नरेश माने, प्राध्यापक कादर पीरजादे सरपंच पंकज दीक्षित यांनी मनोगत व्यक्त केले.
सूत्रसंचालन ग्रा.पं.माजी सदस्य डॉ. रमेश जाधव यांनी केले, आभार माजी सरपंच प्रकाश माळी यांनी मानले.
बैठकीस जगदीश वेल्हाळ, सुनील सुरेशराव जगदाळे, शहाजीराव जगदाळे, दिनकर शिरतोडे, प्रकाश माळी, दिनेश शहा, दिलीप लंगडे, नंदकुमार नलवडे, विजयसिंह जगदाळे, वसंत निकम, सिकंदर शेख, सागर जगदाळे, खलील मोमीन, कैलास कांबळे, सदाशिव रामुगडे, भिकोबा पाटोळे, जमीर मुल्ला, विकास पाटोळे, राम वाघ, अतुल शहा, अविनाश वायदंडे, डॉ.विनोद जगदाळे, सचिन वाघमारे, सतीश कदम, जाधव गुरुजी, किशोर जाधव, जितेंद्र निकम, प्रशांत पाटील, महेश घाडगे, मनोज शहा, ऋषिकेश जाधव, नितीन जाधव, समरसिंह जगदाळे, निखिल जाधव, शरद वेल्हाळ, श्रीराज जगदाळे, रमेश जगदाळे, किशोर जगदाळे, वामन शिरतोडे, बंडा दळवी, सचिन दीक्षित, शफीक शेख, संदीप कणसे, सागर पुरोहित, अविनाश हत्ते, गणेश लोहार, समर्थ जगदाळे, आप्पा काळे व पदाधिकारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment