Sunday, November 3, 2024

अमित ठाकरेंचा प्रचार करणार ; भाजपाने केली भूमिका स्पष्ट;

वेध माझा ऑनलाईन।
मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे माहीम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार आहे. माहीम विधानसभेतून मनसेकडून अमित ठाकरे, शिवसेना शिंदे गटाकडून विद्यामान आमदार सदा सरवणकर, शिवसेना ठाकरे गटाकडून महेश सावंत यांच्यात लढत होणार आहे. 

अमित ठाकरे रिंगणात उतरल्याने महायुतीमधील अनेक नेत्यांनी अमित ठाकरेंना पाठिंबा देण्याबाबत भूमिका मांडली आहे. मात्र, सदा सरवणकर यांनी कोणत्याही परिस्थितीत निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेण्यास नकार दिला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील अमित ठाकरेंना पाठिंबा देण्याबाबत आपली भूमिका मांडली आहे. यातच आता भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्या विधानाची चर्चा रंगली आहे. 

अमित ठाकरे आमचा मुलगा आहे. आम्ही अमित ठाकरेंचा प्रचार करणार...अमित ठाकरेंना आम्ही निवडून आणणार, असं प्रसाद लाड यांनी सांगितले. तसेच सदा सरवणकर ज्येष्ठ नेते आहेत. ते सध्या सिद्धिविनायक मंदीराचे अध्यक्ष आहेत. त्यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा देखील दिला आहे. एकनाथ शिंदे त्यांना विधानपरिषदेवर संधी देतील. त्यामुळे सदा सरवणकर उमेदवारी अर्ज माघार घेतील, असं आम्हाला वाटतं.

No comments:

Post a Comment