Sunday, November 10, 2024

विकास कामांना स्थगिती देऊन सरकारने राजकारण केले.- आमदार बाळासाहेब पाटील

वेध माझा ऑनलाइन।
लोकांच्या विकास कामांच्या संकल्पना पूर्ण करण्यासाठी महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये बजेटच्या माध्यमातून अनेक विकास कामांना निधी मंजूर झाला, परंतु भाजपने शिवसेना पक्ष फोडून एकनाथ शिंदे यांच्या सहकाऱ्यांना बरोबर घेऊन सरकार स्थापन केले व बजेटमध्ये मंजूर झालेल्या कामांना स्थगिती देऊन सरकारने राजकारण केले असे मत आमदार बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केले.

 कोपर्डे(काशिळ) ता.सातारा येथील कोपरा बैठकीप्रसंगी आमदार बाळासाहेब पाटील बोलत होते. या कार्यक्रमास भरत देशमुख, शहाजी निकम, रामचंद्र निकम, कृष्ण धोंडी कदम, हणमंत कदम, काकासो निकम, वसंत कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.  

आमदार बाळासाहेब पाटील पुढे म्हणाले, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांनी माझ्यावर सहकार व पणन तसेच आपल्या सातारा जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी दिली होती, त्यामाध्यमातून अनेक विकास कामे मार्गी लागली, बजेट मधून मंजूर झालेल्या 89 कोटी रुपयांच्या कामाला स्थिगिती दिली होती, त्या विरोधात मी हाय कोर्टामध्ये केस दाखल केली, त्या माध्यमातून ही स्थगिती उठली व कामे आता सुरू आहेत. आपण मला दिलेल्या संधीमुळे मी अनेक प्रकारचे विकास कामे या मतदारसंघात करू शकलो. यापुढेही अशाच आपली सेवा करण्याची संधी द्यावी अशी विनंती आमदार बाळासाहेब पाटील यांनी केली.

यावेळी भरत देशमुख, वसंत कदम यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी विकास कदम, अरुण निकम, कृष्णत कदम, फारुक शेख, दीपक निकम, नंदकुमार कांबळे, अशोक निकम, संदीप कदम, कृष्णत निकम, सुरेश कदम, राजवर्धन निकम, महेंद्र कदम, युवराज कदम, शिवाजी मोहिते, संभाजी संकपाळ, नाथाजी निकम, संपतराव निकम व ग्रामस्थ उपस्थित होते.

No comments:

Post a Comment