Friday, November 8, 2024

राहुल गांधी खोटं बोलणारी फॅक्टरी आहे ; अमित शाह ;

वेध माझा ऑनलाईन।
कराड दक्षिण विधानसभा मतदार संघात आज भाजपचे महायुतीचे उमेदवार अतुल भोसले यांच्या प्रचारार्थ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची जाहीर सभा पार पडली. यावेळी
“कर्नाटक, हिमाचल प्रदेश, तेलंगाणाच्या निवडणुकीत काँग्रेसने आश्वासनांचे पेटारे उघडले आणि निवडणुका जिंकल्या. परंतु, आश्वासनं पाळली नाहीत. आता सांभाळून आश्वासने द्या, असं काँग्रेससारख्या राष्ट्रीय पार्टीचा अध्यक्ष असं म्हणत असेल तर ती पार्टी आश्वासनं पाळू शकते का? असा सवाल करत केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. राहुल गांधी ही खोटं बोलणारी फॅक्टरी आहे. तरूणांनी त्यांच्या नादी लागू नये, असं आवाहनही त्यांनी केलं.

कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे भाजपा – महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री. अतुल भोसले यांच्या प्रचारार्थ कराड दक्षिण विधानसभा मतदार संघातील विंग येथे आज केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांची जाहीर सभा पार पडली. यावेळी खासदार उदयनराजे भोसले, कृष्ण सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले, जिल्हाध्यक्ष श्री. धैर्यशील कदम, श्री. सुनील तात्या काटकर, श्री. विक्रम पावसकर, श्री. भारत पाटील, श्री. रविराज देसाई आणि महायुती व मित्र पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, उपस्थित जनसमुदाय बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



No comments:

Post a Comment