Sunday, November 3, 2024

पवार कुटुंबात फूट! ; दोन ठिकाणी साजरा झाला पाडवा ;

वेध माझा ऑनलाइन।दिवाळी पाडवा झाला. बारामतीची परंपरा आहे की पवार कुटुंबीय मोठ्या उत्साहात दिवाळी आणि विशेष करून पाडवा साजरा करतात. पवार कुटुंबियांना भेटण्यासाठी राज्यभरातून लोक येत असतात. 50 वर्षांमध्ये पहिल्यांदाच पवार कुटुंबात दोन दिवाळी पाडव्याचे सण साजरे झाले

शरद पवार यांचा गोविंदबाग या ठिकाणी दिवाळी पाडवा साजरा होतो तिथे ते कार्यकर्त्यांना भेटतात. अजित पवार यांनी पहिल्यांदाच काठेवाडी येथे दिवाळी पाडव्याचे आयोजन केले होते.

सकाळी सात वाजता अजित पवार, सुनेत्रा पवार काठेवाडी येथे दिवाळी पाडव्यासाठी दाखल झाले. यावेळी कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे दिसले. अजित पवार, सुनेत्रा पवार यांच्यासोबत, मुलगा पार्थ आणि जय हेही उपस्थित होते.


पवार कुटुंबात फूट

दुसरीकडे शरद पवार यांना भेटण्यासाठी असंख्य कार्यकर्ते ‘गोविंदबाग’ या त्यांच्या बारामतीतील निवास्थानी दाखल झाले पवारांना भेटण्यासाठी कार्यकऱ्यांनी गर्दी केली . काहीही झालं तरी शरद पवार आमच्यासाठी सर्वकाही आहेत. त्यांना भेटण्यासाठी आम्ही आलो आहोत. वर्षानुवर्षे आम्ही त्यांना भेटायला येतो , त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी आम्ही येत असतो, असं तिथे उपस्थित कार्यकर्त्यानी सांगितलं.


कुटुंब म्हणून आम्ही एक आहोत- 
सुप्रिया सुळे

राजकीय दृष्ट्या आम्ही वेगवेगळा मार्ग स्विकारला आहे. मात्र कुटुंब म्हणून आम्ही एक आहोत, असं सुप्रिया सुळे आणि पवार कुटुंबिय म्हणताना दिसले. मात्र आता पहिल्यांदाच बारामतीत दोन दिवाळी पाडवा साजरा केला जात आहे.

No comments:

Post a Comment