वेध माझा ऑनलाइन ।राज्याच्या मुख्यमंत्रिपदासंदर्भात काल (28 नोव्हेंबर) रात्री दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी बैठक झाली. अमित शाह, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवारांसह इतर नेत्यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. या बैठकीत मंत्रिपदाबाबत देखील चर्चा झाली. मात्र या अमित शाह यांच्यासोबतच्या झालेल्या कालच्या दिल्लीतील बैठकीत एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासमोर गुगली टाकत अमित शाह यांच्याकडे केली एकनाथ शिंदेच्या पक्षाकडून 12 मंत्रिपदांची अमित शाह यांच्याकडे मागणीसोबतच विधान परिषदेच्या सभापती पदाची देखील मागणी करण्यात आली. मंत्रिपदात गृह, नगरविकास यासह महत्त्वाच्या खात्यांची मागणी एकनाथ शिंदे यांनी केली. पालकमंत्री पद देताना देखील पक्षाचा योग्य सन्मान राखावा, अशी एकनाथ शिंदेंनी अमित शाह यांना विनंती केली आहे. त्यामुळे गृह खातं भाजप एकनाथ शिंदेंना देणार का?, हे आगामी दोन दिवसांत स्पष्ट होणार आहे.
No comments:
Post a Comment