Tuesday, November 26, 2024

राज्यात थंडी वाढणार? वाचा बातमी...

वेध माझा ऑनलाइन।
महाराष्ट्रात हळूहळू गारठा जाणवू लागला आहे. कारण आता उत्तर महाराष्ट्रात चांगलीच हुडहुडी जाणवत आहे. अशातच गेल्या आठ दिवसांपासून उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे थंडीचा कडाका हळूहळू वाढू लागला आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात देखील गारठा वाढू लागला आहे.

राज्यात थंडी वाढणार? 
मात्र आता भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढणार असून मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तापमान देखील 10 अंशांखाली जाण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार, महाराष्ट्रात यावर्षी कडाक्याची थंडी राहणार असून नोव्हेंबरच्या शेवटी आणि डिसेंबरच्या सुरुवातीला महाराष्ट्रातील तापमान देखील कमी होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
त्यामुळे आता मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अनेक भागातील किमान तापमान 10 अंशांखाली जाण्याचा अंदाज आहे. तसेच उत्तरेकडून वारे वाहण्याची शक्यता असल्याने थंडी देखील मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.

No comments:

Post a Comment