Thursday, November 14, 2024

गोव्याचे मुख्यमंत्री म्हणाले ; पृथ्वीराज चव्हाण यांनी आता राजकारणातून रिटायर्ड व्हावे ; एवढ्या वर्षाच्या राजकारणात त्यांनी कराडातील युवकांसाठी कोणते उद्योग आणले नाहीत , ते काही कामाचे नाहीत; कराडकरांनो पृथ्वीराजबाबाना आता रिटायर्ड करा :

वेध माझा ऑनलाइन।
कराड दक्षिण मध्ये आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी एक तरी मोठा प्रकल्प आणला का ? ते लोकांची फसवणूक करून केवळ स्वतःसाठी राजकारण करत आहेत. त्यांच्या वयाचा विचार करता त्यांनी आता राजकारणातून रिटायर होणे गरजेचे आहे अन्यथा कराड दक्षिण च्या जनतेने त्यांना रिटायर्ड करावे. असे आवाहन गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले आहे. 

कराड येथील हॉटेल फर्न येथे भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर अतुल बाबा भोसले यांच्या प्रचारार्थ आयोजित डॉक्टरांच्या संवाद मेळाव्यात बोलत होते. यावेळी कृष्णा कारखान्याचे चेअरमन डॉक्टर सुरेश बाबा भोसले, कराडच्या माजी नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, डॉ अनघा राजगुरू, सारिका गावडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

मुख्यमंत्री सावंत पुढे म्हणाले की भोसले कुटुंबीयांनी आतापर्यंत विविध संस्थांच्या माध्यमातून दहा हजार लोकांना नोकऱ्या दिल्या आहेत. पृथ्वीराज बाबांनी किती लोकांना नोकऱ्या दिल्या ते पण त्यांनी जाहीर करावे. कोणता मोठा प्रकल्प या भागामध्ये आणला? असा सवाल करत अतुल बाबांना आमदार करण्याचा यही समय है... असा नारा त्यांनी यावेळी दिला. 

देशामध्ये गेल्या साठ वर्षांमध्ये जो विकास झाला नाही तो विकास 2014 पासून नरेंद्र मोदी यांनी केला आहे. यामध्ये मेडिकल कॉलेज गेल्या साठ वर्षांमध्ये 387 होती ते मोदीजींनी 750 कॉलेज सुरू केली आहेत. 2014 पूर्वी मेट्रो फक्त तीन शहरांमध्ये धावत होत्या आज वीस पेक्षा जास्त शहरांमध्ये धावत आहेत. 2014 मध्ये मोदी सरकारने स्वतंत्र आयुष मंत्रालय सुरू केले. यामुळे 180 देशांमध्ये ही चिकित्सा पद्धती राबवली जात आहे. यामुळे आपल्या देशातील डॉक्टर इतर देशांमध्ये जाऊन प्रॅक्टिस करत आहेत. ही आपल्या देशाच्या दृष्टीने फार मोठी बाब आहे. याचबरोबर स्वच्छ भारत अभियान राबवत महात्मा गांधी यांचे नंतर हातात झाडू घेऊन देशाला संदेश देणारा पंतप्रधान कोण असेल तर ते आहेत नरेंद्र मोदी. काँग्रेसने आतापर्यंत गरिबी हटाव हा फक्त नारा दिला असून 2014 पर्यंत देशांमधील गरीबी जैसे थे.. अशीच होती. परंतु मोदी सरकारने युवाशक्ती, नारीशक्ती, किसानशक्ती व गरीब कल्याण या चार पिलर वर देशातील प्रत्येक घटकांना मदत करण्याचे काम चालू आहे.
2014 ते 2019 या काळात महायुतीने राज्यांमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात विकास केला त्यामुळेच 2019 च्या निवडणुकीमध्ये सुद्धा राज्यातील जनतेने महायुतीला कौल दिला. परंतु शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पुत्रप्रेम आडवे आले व विकासाला और काटे आणण्याचे काम त्यांनी केले. परंतु पुन्हा एकनाथ शिंदे यांनी युतीला साथ दिली त्यामुळे राज्यातील विकास चालू आहे.
डॉक्टरांचे प्रश्न डॉक्टरांनाच कळणार तसेच युवकांचे प्रश्न युवकांनाच कळणार... यासाठी आपण कराड दक्षिण मधून तरुण आमदार म्हणून डॉक्टर अतुल भोसले यांना निवडून द्यावे असे आवाहन ही सावंत यांनी यावेळी केले. 
यावेळी सुरेश बाबा भोसले यांनीही कराड दक्षिण मधून डॉ. अतुल बाबा भोसले यांना निवडून द्यावे असे आवाहन या संवाद मेळाव्यात केले.
या मेळाव्यास कराड दक्षिण मधील मोठ्या प्रमाणात डॉक्टर्स उपस्थित होते.

No comments:

Post a Comment