"योगी आदित्यनाथांच्या 'बटेंगे तो कटेंगे', या घोषणेमुळं मतांचं ध्रुवीकरण झालं. आमचा पराभव झाला असला तरी लोकांमध्ये जाऊन पुन्हा नव्यानं उभं राहू," असा विश्वास राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी कराड येथील पत्रकार परिषदेत व्यक्त केला दरम्यान, हा लोकांनी दिलेला निर्णय असून आम्हाला तो मान्य आहे असंही शरद पवार यावेळी म्हणाले.
अजित पवार यांना जास्त जागा आल्या हे मान्य करणं गैर नाही. मी बारामतीत उमेदवार दिला नसता तर वेगळा मेसेज बाहेर गेला असता. तसंच नवखा उमेदवार आणि अनुभवी उमेदवार लढत याबाबत आम्हाला कल्पना होती. त्यामुळं अजित पवार आणि युगेंद्र पवार यांची तुलना होवू शकत नाही," असं म्हणत शरद पवार यांनी युगेंद्र पवार यांचा झालेला पराभव मान्य केला. दरम्यान "विरोधी पक्षनेता असणं कधीही योग्य आहे. ती फिगर आमच्याकडे नाही. त्यामुळं विरोधी पक्षनेता द्यायचा की नाही हा सरकारचा निर्णय आहे," असं शरद पवार म्हणाले.
'लाडकी बहीण योजने'बाबत शरद पवार म्हणाले की, "महायुतीनं 'लाडकी बहीण योजने'बाबतचा खोटा प्रचार केला. हे सरकार गेलं तर महाविकास आघाडी लाडकी बहीण योजना बंद करेल, असा खोटा प्रचार महायुतीनं केला. त्यामुळं महिलांनी आमच्याविरोधात मतदान केलं असल्याचं काही कार्यकर्त्यांनी मला सांगितलं. त्यामुळं याचा फटका आम्हाला बसला असावा."
निकालानंतर उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी 'ईव्हीएम'वर प्रश्न उपस्थित केले होते. त्यावर शरद पवार म्हणाले की, "याबाबत अधिकृत माहिती नसल्यामुळं मी 'ईव्हीएम' मशीनवर भाष्य करणार नाही. अधिकृत माहिती घेवून मी याबाबत अधिक बोलेन...
"
No comments:
Post a Comment