वेध माझा ऑनलाईन।
यंदाच्या निवडणुकीमध्ये सर्वांची नजर आहे ती बारामती मतदारसंघावर. पक्षात बंडखोरी करुन भाजपसोबत सत्तेत गेलेल्या अजित पवारांसाठी ही सन्मानाची आणि अस्तित्वाचीही लढाई असणार आहे. अजित पवारांच्या विरोधात त्यांचे पुतणे युगेंद्र पवार यांना बारामती मतदारसंघामध्ये अजित पवारांमध्ये उमेदवारी देण्यात आल्याने ‘काका-पुतण्या’ लढाईमध्ये आणखी चुरस निर्माण झाली आहे.
एकाच कुटुंबातील दोन व्यक्ती पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने या मतदारसंघात काटे की टक्कर होण्याची शक्यता आहे. लोकसभेप्रमाणे विधानसभेला देखील अजित पवारांना पराभवाला सामोरं जावं लागणार असल्याच्या चर्चा सध्या सुरू आहेत. अशात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी मोठा दावा केला आहे.
अजित पवारांना धक्का बसणार?
बारामतीमध्ये पवार साहेब आणि सुप्रिया सुळे या स्वतः लक्ष घालत असल्याने येथून युगेंद्र पवार विजय होतील असं भाकीत रोहित पवारांनी वर्तवलं आहे.
रोहित पवारांचं मोठं भाकीत
अजितदादांना मुख्यमंत्री शिंदे यांच्या जागा कमी आणून आपले महत्त्व वाढवायचे आहे, भाजपलाही शिंदे यांच्या जागा कमी करायच्या आहेत. तर शिंदे यांना भाजपच्या जागा कमी आणायच्या आहेत. या सर्वांचा फायदा महाविकास आघाडीला होईल, असा दावा आमदार रोहित पवार यांनी केला आहे.
बारामतीमध्ये पवार साहेब आणि सुप्रिया सुळे या स्वतः लक्ष घालत असल्याने येथून युगेंद्र पवार विजय होतील, असा विश्वास देखील रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे.
No comments:
Post a Comment