Sunday, November 3, 2024

दिवाळी निमित्त पवार कुटुंबाचा फोटो व्हायरल ; अजित पवार व त्यांचे कुटुंबीय फोटोत नाहीत...

वेध माझा ऑनलाइन।
दिवाळीचा सण सगळीकडे उत्साहात साजरा केला जात आहे. अशात पवार कुटुंबाचा यंदाच्या दिवाळीतील पहिला फोटो समोर आला आहे. बारामती मतदारसंघाचे शरद पवार गटाचे उमेदवार युगेंद्र पवार यांनी पवार कुटुंबाचा फोटो शेअर केलाय.

आज भाऊबीज आहे. यानिमित्त पवार कुटुंब एकत्र आलं होतं. युगेंद्र पवार यांना त्यांची बहीण सई पवार यांनी औक्षण केलं. याचा फोटो युगेंद्र पवारांनी शेअर केला आहे. दीपोत्सवाच्या प्रकाशमयी उत्सवात बहीण-भावांतील नाते उजळवणारा सण भाऊबीज... सर्वांना शुभेच्छा!, 
असं म्हणत युगेंद्र यांनी फोटो शेअर केलाय. 

फॅमिली टाईम, असं म्हणत युगेंद्र पवारांनी संपूर्ण पवार कुटुंबाचा फोटो शेअर केलाय. यात शरद पवार सुप्रिया सुळेंसह सगळे पवार कुटुंबीय उपस्थित आहेत. अजित पवार आणि त्यांचं कुटुंब मात्र या फोटोत नाहीये. 

No comments:

Post a Comment