कराड दक्षिण विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार डॉ. अतुल भोसले यांच्या प्रचार सभेसाठी आलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बॅगा, साहित्याची शुक्रवारी कराड विमानतळावर तपासणी करण्यात आली.
विमानात असलेल्या पिशवीतील डबाही उघडून पाहण्यात आला. त्या डब्यात चकल्या होत्या. दरम्यान, कालच गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या साहित्याची तसंच त्यांच्यासाठी आलेल्या मोकळ्या विमानांची तपासणी करण्यात आली होती.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा कराड दौरा नियोजित होता. त्यामुळे निवडणूक कर्मचाऱ्यांचं पथक विमानतळावर तळ ठोकून होत. दुपारी विमानाने फडणवीसांचं आगमन झालं. त्यावेळी निवडणूक कर्मचाऱ्यांनी त्यांच्या बॅगा तपासल्या. तसेच विमानात जाऊन साहित्याची तपासणी केली. त्यात एका पिशवीत गाठ मारलेली प्लॅस्टिकची पिशवी होती. त्या पिशवीत डबा होता. तो डबा देखील उघडून पाहिला.
No comments:
Post a Comment