Friday, November 8, 2024

उमेदवारासाठी कुटुंबीय उतरले प्रचारात; कराड दक्षिण विधानसभा निवडणुकीत रंगत वाढली;

वेध माझा ऑनलाईन।
सातारा जिल्ह्यात सर्व विधानसभा मतदार संघात अटीतटीची लढत पहायला मिळणार आहे. कराड दक्षिण च्या आखाड्यात डॉ अतुल भोसले व आ पृथ्वीराज चव्हाण यांची  उमेदवारी असल्याने त्यांच्या कुटुंबियांकडून प्रचारात हजेरी लावत मतदार बांधवांना मतदार करण्याचे आवाहन केले जात आहे. 

कराड दक्षिण विधानसभा मतदार संघात भाजप महायुतीकडून डॉ. अतुलबाबा भोसले यांनी निवडणुकीच्या रिंगणात दंड थोपटले आहेत. तर काँग्रेस महाविकास आघाडीकडून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराजबाबा चव्हाण आहेत. यावेळेस दोघांच्यामध्ये अटीतटीची लढत होणार आहे. डॉ. अतुल भोसले हे देवेंद्र फडणवीस यांच्या खास मर्जीतील. साखर कारखाने, हॉस्पिटल, बँका, शाळा- कॉलेजेस या माध्यमातून भोसले कुटुंब थेट जनतेशी कनेक्टेड आहे. त्यामुळे यंदाही कराड दक्षिणेत काटे कि टक्कर होणार हे नक्की. डॉ. अतुल भोसलेंच्या प्रचारासाठी त्यांचे वडील डॉ. सुरेश भोसले, पत्नी गौरवी अतुल भोसले यांच्यासह कुटुंबीकडून प्रचार केला जात आहे. तर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रचारासाठी पत्नी सत्वशीलादेवी पृथ्वीराज चव्हाण या महिलांच्या कार्यक्रमांना उपस्थिती लावत आहेत. 

No comments:

Post a Comment