वेध माझा ऑनलाईन।
सातारा जिल्ह्यात महत्वाच्या कराड दक्षिण विधानसभा मतदार संघात आता आठ जणांमध्ये निवडणूक होणार आहे. कारण आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी 12 उमेदवारांनी अर्ज काढून माघार घेतली आहे.
२६०, कराड दक्षिण विधानसभा मतदार संघासाठी एकूण २२ उमेदवारांनी २८ नामनिर्देशन पत्रे कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे यांच्याकडे दाखल केलेली होती. त्यापैकी २ अर्ज अवैध ठरले होते. उर्वरित २० अर्जांपैकी १२ जणांनी आपले अर्ज आज दि. ४ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत माघार घेतले. त्यामुळे निवडणूक रिंगणात ८ उमेदवार उरले आहेत.
कराड दक्षिण मतदारसंघातून पृथ्वीराज दाजीसाहेब चव्हाण (राष्ट्रीय काँग्रेस), अतुल सुरेश भोसले (भाजपा), संजय कोंडीबा गाडे (वंचित बहुजन आघाडी), इंद्रजित अशोक गुजर (स्वाभिमानी शेतकरी संघटना), विद्याधर कृष्णा गायकवाड (बहुजन समाज पार्टी) तर अपक्ष म्हणून महेश राजकुमार जिरंगे, विश्वजीत अशोक पाटील, शमा रहीम शेख हे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
उमेदवार व त्यांना मिळालेली चिन्हे :
१.अतुल सुरेश भोसले – भारतीय जनता पार्टी (कमळ),
२.पृथ्वीराज दाजीसाहेब चव्हाण – इंडियन नॅशनल काँग्रेस (हात),
३.विद्याधर कृष्णा गायकवाड – बहुजन समाज पार्टी (हत्ती)
४.इंद्रजित अशोक गुजर – स्वाभिमानी पक्ष (लिफाफा)
५.महेश राजकुमार जिरंगे – राष्ट्रीय समाज पक्ष (शिट्टी)
६.संजय कोंडीबा गाडे – वंचित बहुजन आघाडी (गॅस सिलेंडर),
७.विश्वजीत अशोक पाटील उंडाळकर – अपक्ष (बॅट)
८.शमा रहीम शेख – अपक्ष (हीरा)
No comments:
Post a Comment