वेध माझा ऑनलाईन ।
राज्य सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या निवडणूक प्रक्रियेत 259 कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातून एकूण 27 उमेदवारांपैकी 12 उमेदवारांनी अंतिम दिवशी आपली नामनिर्देशनपत्रे मागे घेतली. त्यामुळे आता कराड उत्तर विधानसभा निवडणूक रिंगणात एकूण 15 उमेदवार असणार आहेत. तर या ठिकाणी भाजप विरुद्ध शरदचंद्र पवार पक्ष अशी मुख्य लढत पहायला मिळणार आहे.
आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी इब्राहिम मेहमूद पटेल, अपक्ष (रा. वाघेरी, तालुका कराड), राजेंद्र बापूराव निकम, राष्ट्रीय मराठा पार्टी (रा. कोनजावडे, पोस्ट सावरघर, तालुका पाटण), गणेश वसंत घोरपडे, अपक्ष (रा. वाठार किरोली, तालुका कोरेगाव), संतोष पांडुरंग वेताळ, अपक्ष (रा. सुली, तालुका कराड), रवींद्र भिकोबा सूर्यवंशी, अपक्ष (रा. हेळगाव, तालुका कराड), सत्यवान गणपत कमाने, (रा. गोपुज, तालुका खटाव), महादेव दिनकर साळुंखे, अपक्ष (रा. वराडे, तालुका कराड), रवींद्र दत्तात्रय निकम, अपक्ष (रा. खडकपेठ, मसूर, तालुका कराड), दत्तात्रय भीमराव भोसले-पाटील, (रा. खोडशी, तालुका कराड), शिवाजी अधिकराव चव्हाण, अपक्ष (रा. कोपर्डी हवेली, तालुका कराड), प्रशांत रघुनाथ कदम, (रा. वडगाव उंब्रज, तालुका कराड), अधिकराव दिनकर पवार, अपक्ष (रा. गोटे पोस्ट मुंढे, तालुका कराड) यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले असल्याची माहिती 259 कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी विक्रांत चव्हाण, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कल्पना ढवळे, लालासाहेब गावडे व डॉक्टर जस्मिन शेख यांनी दिली आहे
No comments:
Post a Comment