Wednesday, November 6, 2024

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांना सर्वोच्च न्यायालयाचा झटका ; अजित पवारांना पक्षचिन्हाबाबत खुलासा करणारी सूचना राज्यातील वर्तमानपत्रांत छापावी लागणार ;

वेध माझा ऑनलाईन।
राज्यात विधानसभा निवडणुकीची तयारी आहे. अशातच गेल्या वर्षभरापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंडखोरी केली आहे. त्यानंतर अजित पवार यांनी 40 आमदारांना घेऊन ते भाजपाबरोबर महायुतीत सामील झाले. मात्र त्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं. अशातच आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांना सर्वोच्च न्यायालयान झटका दिला आहे.

 36 तासांचा अल्टिमेटम...
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवार यांच्या
विरोधात सर्वोच्च न्यायालयात पक्ष चिन्हाबाबत धाव घेतली होती. मात्र त्यानुसार, सर्वोच्च न्यायालयाने अजित पवारांना तब्बल 36 तासांचा अल्टिमेटम देखील दिला आहे.
त्यामुळे आता येत्या 36 तासांत उपमुख्यमंत्री अजित पवारांना पक्षचिन्हाबाबत खुलासा करणारी सूचना राज्यातील वर्तमानपत्रांत छापायची आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अध्यक्ष अजित पवार यांनी आज सर्वोच्च न्यायालयाला आश्वासन दिले आहे की, पुढील 36 तासांच्या आत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घड्याळ चिन्हाचाबाबत अस्वीकरण प्रसिद्ध केले जाईल.

तसेच हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे असं या अस्वीकरण पत्रकात असणार आहे. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या तोंडी निर्देशाला उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वतीने ज्येष्ठ वकील बलबीर सिंग यांनी हे आश्वासन देखील दिले आहे .

No comments:

Post a Comment