Wednesday, November 6, 2024

उद्धव ठाकरेंचा अमित ठाकरेंना छुपा पाठिंबा ? माहीम मतदार संघात नेमकं काय घडतय?

वेध माझा ऑनलाइन
मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. त्यामुळे माहीम विधानसभा मतदारसंघ सध्या कायम चर्चेत आहे. अमित ठाकरे निवडणुकीच्या मैदानात उतरल्याने उद्धव ठाकरे  पक्षाकडून उमेदवार देणार नाही, अशी चर्चा होती. परंतु त्यांनी महेश सावंत यांना उमेदवारी देत माहीममध्ये भगवा फडकलाच पाहिजे असा आदेश दिला. मात्र सध्या माहीममध्ये एक राजकीय ट्विस्ट पाहायला मिळत आहे. 


माहीम विधानसभा मतदारसंघात सध्यातरी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांची कोणतीच जाहीर सभा नसल्याचं समोर आलं आहे. 18 नोव्हेंबरपर्यंतच्या वेळापत्रकात तुर्तासतरी माहीम-दादरमधील जाहीर सभेबाबत कोणताच उल्लेख नाहीय. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. 

माहीम विधानसभेत ठाकरे गटाकडून महेश सावंत यांना उमेदवारी देण्यात आली आहे. महेश सावंत यांनी प्रचाराला देखील सुरुवात केली आहे. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या 18 नोव्हेंबरपर्यंतचं प्रचार दौऱ्याचं नियोजन समोर आलं आहे. यामध्ये माहिम मतदारसंघात दोघेही येणार नसल्याचं चित्र समोर आले आहे. त्यामुळे काकांची पुतण्याला छुपी मदत आहे का?, अशी राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे. शिवसेनेकडून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या 18 तारखपेर्यंतच्या सभांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार अमित ठाकरे यांच्या मतदारसंघासाठी दोघांच्याही प्रचारसभा नाहीत. 


No comments:

Post a Comment