Sunday, November 3, 2024

वडगावच्या अतुलबाबांच्या प्रचार सभेत राजेंद्रसिंह यादव, जगदीश जगताप आणि मोहनराव जाधव यांनी घेतला आ पृथ्वीराज चव्हाणांचा खरपूस समाचार ; काय म्हणाले हे तिन्ही नेते ? वाचा बातमी...

वेध माझा ऑनलाइन।
डॉ अतुलबाबांना कराड शहरातून किमान 8 ते 10 हजाराचे लीड देणार आहोत, या निवडणूकीनंतर लोक ठरवतील कराडची ओळख कोण आहे ते...कराड ची ओळख असे ताम्रपट कोणी घ्यायची गरज नाही... असा टोला कराडचे नगरसेवक यशवंत आघाडीचे व शिवसेना नेते राजेंद्रसिंह यादव यांनी पृथ्वीराज चव्हाण यांना लगावला

वडगाव येथे डॉ अतुल भोसले यांच्या निवडणूक प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी आपल्या भाषणात बोलताना यादव यांनी हा टोला लगावला...महायुतीच्या माध्यमातून कराड दक्षिण मध्ये एकूण एक हजार कोटी रुपये विकासनिधी आल्याचेही ते यावेळी म्हणाले... 

सध्या राज्यात सर्वत्र विधानसभेची रणधुमाळी सुरू झाली आहे...कराड दक्षिण मध्ये यानिमित्ताने दोन "बाबां' मध्येही पुन्हा काटे की टक्कर होताना दिसते आहे...मात्र यावेळी आतून राजकीय समीकरणे चांगलीच बदलली असल्याचे दिसून येत आहे... त्याच धर्तीवर प्रचाराचा धुरळा आता याठिकाणी उडणार आहे...त्याचीच झलक आज या सभेतून पहायला मिळाली...
दरम्यान यावेळी जगदीश जगताप म्हणाले, आ पृथ्वीराज चव्हाण यांनी मतदार संघात ठोस असे काहीच काम केलेल नाही.. जत्रेतल्या देवाला जसे जत्रेदिवशी पालखीत घालून फिरवतात...तसे या पृथ्वीराज बाबाना पाच वर्षातून एकदा भागातून फिरवले की परत पाच वर्षे हे गायब असतात...जयवंत अप्पा असतील डॉ सुरेश भोसले असतील अतुल भोसले असतील या संपूर्ण भोसले कुटुंबीयांनी सर्वसामान्य लोकांसाठी खूप मोठं काम करून ठेवले आहे

सैदापूरचे मोहनराव जाधव म्हणाले, कराडची खरी ओळख, कराडचा स्वाभिमान आणि अभिमान स्व यशवंतराव चव्हाण, पी डी पाटील साहेब, जयवंतराव भोसले हे आहेत... की ज्यांनी कराडकरांसाठी खूप मोठ भरघोस काम करून ठेवल आहे... पृथ्वीराज चव्हाण दिल्लीत जवळजवळ बारा वर्षे पंतप्रधान मंत्रालयाचे मंत्री होते,... राज्यात मुख्यमंत्री होते... त्यावेळी त्यांना कराडमध्ये आय टी हब करायला कोणी अडवले होते का?/मग का केलं नाही? अतुलबाबांनी आणलेल्या निधींबाबत ते लोकांची दिशाभूल करतात...त्यांची पायाखालची वाळू सरकली आहे...केंद्रात व राज्यात बीजेपीचे सरकार
असताना पृथ्वीराज चव्हाण म्हणतात या भागातली कामे मी केली...लोकांना आणखी किती खोटे बोलणार आहात...पृथ्वीराज चव्हाण यांच्या मेळाव्यात त्यांच्या कार्यकर्त्यांकडून भाषण करताना महिलांचा अपमान केला जातो... हे कितपत योग्य आहे असा सवाल देखील जाधव यांनी यावेळी केला...या प्रचार सभेत सर्वच वक्त्यांनी अतुल भोसले यांच्या विजयावर शिक्कामोर्तब केले... 

यावेळी कराड दक्षिण मधून विविध मान्यवरांसह हजारोंच्या संख्येने लोक उपस्थित होते

No comments:

Post a Comment