Sunday, November 3, 2024

जितेंद्र आव्हाड म्हणाले...अजित पवारांची पाकिटमार टोळी आहे... त्यांच्यात हिम्मत असती तर...

वेध माझा ऑनलाइन।
निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार जितेंद्र आव्हाड यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संबंधित केलेल्या वक्तव्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. जितेंद्र आव्हाडांनी अजित पवारांवर टीका करताना म्हटलं, ही पाकीटमारांची टोळी आहे. त्यांच्यात हिंमत होती, तर अजित पवार म्हणाले असते, शरद पवारांनी तुतारी निशाणी घेतलं, तसं मीही दुसरं चिन्ह घेऊन लढतो. तुम्ही तर तुमच्या काकाने देशात वाढवलेली पार्टी चोरून माझी पार्टी म्हणून फिरत आहात. पण जनतेला वास्तव काय आहे हे माहीत आहे, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले,

No comments:

Post a Comment