राज्यातील लोकसभा निवडणुकीत शिवसेना महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं होतं, या यशामुळे महाविकास आघाडीतील प्रमुख पक्षांचा आत्मविश्वास बळावला. त्यातच, विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने तयारीही आणि मजबूत महाविकास आघाडी बनल्याचे चित्रही दिसून आले. मात्र, विधानसभा निवडणुकांच्या जागा वाटपावेळी काही मतभेद काँग्रेस आणि शिवसेना पक्षात पाहायला मिळाले. मात्र, निवडणूक निकालानंतर अनेकांच्या भुवया उंचावतील असेच चित्र दिसून येत आहे. लोकसभा निवडणुकीत तब्बल 30 जागांवर विजय मिळवणाऱ्या महायुतील विधानसभेला 288 पैकी केवळ 49 जागांवरच विजय मिळाला आहे. त्यामुळे, महाविकास आघाडी पुढील निवडणुकांना कसे सामोरे जाते हे पाहावे लागेल. त्यातच, शिवसेना युबीटी पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बोलवलेल्या उमेदवारांच्या बैठकीत अनेकांनी पुढील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वतंत्रपणे लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे. याबाबत शिवसेना युबीटी नेते आणि माजी विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनीही माहिती दिली.
No comments:
Post a Comment