राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीने मोठं यश मिळवलं. महाविकास आघाडीसह इतर पक्षांना विधानसभेला मोठा फटका बसला. तर राज्यातील अनेक मतदारसंघामध्ये ईव्हीएम मशीनवरती आक्षेप घेण्यात आले आहेत, त्याबाबत अनेक उमेदवारांनी तक्रारी निवडणूक आयोगाकडे दिल्या आहेत, तर मोठ्या जोमाने निवडणुकीला सामोरं गेलेल्या मनसेला एकही जागा मिळवता आली नाही. मनसेने देखील आता ईव्हीएमवर आक्षेप घेतला आहे. मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी मागच्या काही दिवसापासून जे व्हिडिओ समोर येत आहेत, ते पाहता लक्षात येईल निकाल कसा मॅनेज केला आहे. हा निकाल आम्हाला मान्य नसल्याचं त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे.
No comments:
Post a Comment