Tuesday, November 26, 2024

ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह ; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्याला झापलं

वेध माझा ऑनलाइन।
राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर राजकीय वातावरण तापलं असून महायुतीकडून जल्लोष व आनंद व्यक्त केला जात असताना महाविकास आघाडीचे नेते पराभवाचं चिंतन करत आहेत. त्यातच, विजयी आमदारांची व पराभूत आमदारांची बैठक घेऊनही सूचना केल्या जात आहेत. पराभूत उमेदवारांकडून ईव्हीएमच्या घोळावर संशय व्यक्त होत असून आता शरद पवारांनीही ईव्हीएम संदर्भातील घोळावर कायदेशीर लढाई लढण्यासाठी समिती गठीत केली आहे. त्यानुसार, यंदाच्या निवडणूक निकालानंतर संशयास्पद वाटणारे सर्वते पुरावे गोळा करण्याचे आवाहनही उमेदवारांना केले आहे. दरम्यान, राज्यातील निकालानंतर ईव्हीएमवर शंका उपस्थित झाल्याने, ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात  करण्यात आली होती. मात्र, न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली आहे. तसेच, याचिकाकर्त्यांना खडे बोलही सुनावले आहेत. 

विधानसभा निवडणुकानंतर दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करताना पुन्हा मतपत्रिकेद्वारे निवडणुका घेण्यास सुप्रीम कोर्टाने स्पष्ट शब्दात नकार दिला आहे. ईव्हीएमला विरोध करणारी याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली. तसेच, जिंकलं की तुम्हाला ईव्हीएम चांगले वाटतात आणि निवडणूक हरलं की तुम्हाला ईव्हीएममध्ये छेडछाड दिसते, अशा शब्दात सुप्रीम कोर्टाने याचिकाकर्त्यांना झापलं आहे.  

डॉ. के.ए. पॉल यांनी ही याचिका केल होती. मात्र, न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती पी.बी. वराळे यांच्या खंडपीठाने ही याचिका फेटाळली आहे. त्यामुळे, ईव्हीएमच्या घोळावरुन संशय व्यक्त केला जात असल्याच्या आरोपांना आता काहीही अर्थ उरला नाही.

No comments:

Post a Comment