वेध माझा ऑनलाइन।
राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल हाती येत आहेत. सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदार संघातील मतदानाच्या मतमोजणीला सकाळी आठ वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. रम्यान, कराड दक्षिण विधानसभा मतदार संघात अतिटतीची निवणूक होत असून या ठिकाणी सकाळी निवडणूक विभाग प्रशासनाकडून उशिरा मतमोजणीला सुरुवात करण्यात आली. दरम्यान, वार्तांकन करण्यासाठी आलेल्या कराडातील माध्यम प्रतिनिधींना सकाळी निवडणूक प्रशासनाकडून अपमानास्पद वागणूक देण्यात आली. निवडणूक विभागाकडून प्रतिनिधींना देण्यात आलेल्या ओळपत्र असून देखील त्यांना मतमोजनीची माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात आल्याने माध्यम प्रतिनिधींकडून प्रशासनाचा निषेध करण्यात आला आहे.
कराड दक्षिण विधानसभा मतदान संघाच्या मतदानाची मोजणी हि कराड येथील शासकीय धान्य गोदाममधील स्ट्रॉंगरूममधून केली जात आहे. दरम्यान, सकाळी साडे आठ वाजल्यापासून मतमोजणीस सुरुवात होणार होती. मात्र, प्रशासनाच्या नियोजनाच्या अभावामुळे मतमोजणीस सुरुवातीला विलंब झाला. या ठिकाणी कराडातील विविध दैनिक, चॅनेलमधील पत्रकार, माध्यम प्रतिनिधी वार्तांकन करण्यासाठी आले. दरम्यान, मतमोजणीच्या अगोदर संबंधाची माध्यम प्रतिनिधींना निवडणूक प्रशासनाकडून ओळख पत्रे देखील देण्यात आली आहेत. ओळखपत्रांच्या साहाय्याने त्यांना मतमोजणीच्या केंद्रात वार्तांकन करण्यासाठी प्रवेश दिला जाईल असे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून सुरुवातीला सांगण्यात आले होते.
दरम्यान, प्रत्यक्ष वार्तांकन करण्यासाठी आलेल्या माध्यम प्रतिनीधी, पत्रकार बांधवांना प्रशासनाकडून मतमोजणीसाठी प्रवेश नाकारण्यात आला.
तसेच पत्रकारांना बसण्याची देखील व्यवस्था करण्यात आली नव्हती तसेच येथील एक महिला अधिकारी पत्रकारांशी उद्दामपणे बोलल्याने निवडणूक आयोग विभागाकडून देण्यात आलेल्या या अपमानास्पद वागणुकीचा तसेच कराड दक्षिण मतदान केंद्रावर प्रशासनाकडून केल्या जात असलेल्या भोंगळ कारभाराचा पत्रकार, माध्यम प्रतिनिधींकडून निषेध करण्यात आला आहे.
No comments:
Post a Comment