राज्यामध्ये काँग्रेस आघाडी सरकार असताना राज्याला 10 वर्षात या सरकारने विकासासाठी 1 लाख करोड रुपये दिले तर मोदीच्या नेतृत्वाखाली युती सरकारने 10 वर्षात राज्याला 10 लाख कोटी रुपये देत विकासाची दृष्टी दाखवली तरीही शरद पवार म्हणतात राज्यावर अन्याय झाला असे या वयातही शरद पवार खूप खोट बोलतात असा आरोप केंद्रीय नेते अमित शाह यांनी आज कराड मध्ये येऊन केला...
मनमोहनसिंग सरकार असताना आतंकवादी कारवाया वाढल्या होत्या...आम्ही पाकिस्तानात घूसून दहशतवाद संपवला...हा मोदी सरकार आणि युपीए सरकार मधला फरक असल्याचेही ते यावेळी म्हणाले...दरम्यान अतुलबाबांचा यावेळी विजय निश्चित असून त्यांच्या विजयी सभेला आपण हजर राहणार असल्याचेही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले...
कराड दक्षिण चे भाजप महायुतीचे उमेदवार डॉ अतुलबाबांच्या विंग येथील झालेल्या आजच्या सभेत ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते
यावेळी उदयनराजे यांच्यासहित जिल्ह्यातील भाजप शिवसेनेचे अनेक प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते... तसेच शहर व परिसरातील जेष्ठ नागरिक युवक व महिलानी हजारोंच्या संख्येने यावेळी उपस्थिती लावली होती
अतुलबाबांच्या नेतृत्वाखाली आंतरराष्ट्रीय लेव्हलची मोठी इन्व्हेस्टमेंट कराडमध्ये करणार
अमित शाह यांनी.. अतुलबाबांच्या नेतृत्वाखाली आंतरराष्ट्रीय लेव्हलची मोठी इन्व्हेस्टमेंट कराडमध्ये करणार असल्याचे सांगत राज्यात देखील युती सरकारने रस्त्याचे मोठे जाळे पसरवत विकास केला आहे जलयुक्त शिवार,कृष्णा बिमा योजना, टेम्बु म्हैसाळ योजना सारख्या अनेक लोकपयोगीं योजना राबवत जनतेला सुख सुविधा देण्यावर राज्यातील युती सरकारने भर दिला आहे लाडकी बहीण योजना राबवून बहिणींचा सम्मान केला आहे यापुढे लाडकी बहीण योजनेमध्ये वाढ होणार असून 2100 रुपये बहिणींना मिळणार आहेत असेही ते म्हणालेमागच्या निवडणुकीत अतुल भोसले अगदी थोडक्यात पराभूत झाले पण यावेळी मोठ्या फरकाने ते विजयी होणार आहेत मुद्दामून त्यांच्यासाठी मी आज आलो आहे त्यांच्या विजयानंतर देखील विजयी सभा घेण्याकरिता मी पुन्हा नक्की येईन असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले
निवडणुकीत विजयी होऊन आम्ही तुमच्याकडे येणार
डॉ अतुल भोसले म्हणाले... लोकसभेला माझ्यावर प्रभारी म्हणून आपण जबाबदारी दिलीत या मतदार संघात उदयनराजे याना निवडून देण्यासाठी आम्ही मोठे लीड देत जिल्ह्यातून पहिल्यांदा भाजप चा खासदार दिल्लीत पाठवला आहे होणाऱ्या विधानसभा निवडणुकीतुन देखील विजयी होऊन आम्ही तुमच्याकडे येणार आहोत
उद्धव ठाकरेंना जबरदस्त टोला
अमित शाह म्हणाले उद्धव ठाकरे सध्या अफजलखान व औरंगजेब यांचे उदात्तीकरण करणाऱ्या लोकांबरोबर मांडीला मांडी लावून बसत आहेत त्यांना शरम वाटली पाहिजे सत्तेसाठी ते एवढ्या खालच्या दर्जाला गेले आहेत
राम मंदिरला विरोध करणार्याना चपराक
जे लोक राम मंदिर अनेकवर्षं बांधू शकले नाहीत त्यांना नरेंद्र मोदींनी चपराक दिली आहे हे लोक म्हणत होते राम मंदिर झाल्यानन्तर रक्तपात होईल त्या लोकांनी पाहिलं राम मंदिर आयोद्धेतच झालं... आणि कोणी साध बोट उचलायच धाडस करू शकले नाहीत...काँग्रेस आणि आमच्या सरकारमध्ये हा फरक आहे असेही शाह म्हणाले
No comments:
Post a Comment