वेध माझा ऑनलाइन | मनोज जरांगे यांच्या भूमिकेकडे राज्याचं लक्ष लागलं होतं. अखेर मनोज जरांगे यांनी मोठी घोषणा केली आहे. मनोज जरांगे यांनी आपण कोणत्या मतदारसंघातून लढणार आहोत हे जाहीर केलं आहे. तसंच जिथे उमेदवार द्यायचा नाही त्या मतदारसंघात उमेदवार पाडला जाणार असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
जरांगेची मोठी घोषणा
बीड जिल्ह्यातील केज मतदारसंघातून आपण लढणार असल्याचं मनोज जरांगे यांनी जाहीर केलं आहे. आष्टी, गेवराई मतदारसंघातून लढायचं की नाही यावर चर्चा करून निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती मनोज जरांगे यांनी दिली आहे. तसंच मंठा परतूर मतदारसंघातून उमेदवार देत तेथूनही लढणार आहेत.जालना जिल्ह्यातून केवळ एकाच मतदारसंघात मनोज जरांगे लढणार आहेत. परतूर -मंठा मतदारसंघातून उमेदवार देणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे.
No comments:
Post a Comment