वेध माझा ऑनलाइन
राज्यात निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून यंदा जनतेनं सत्तेच्या चाव्या महायुतीकडे एकहाती सोपवल्या आहेत. अशातच लोकसभेत पराभवाची चव चाखलेल्या दादांनी विधानसभेत मात्र, काकांना पछाडलं. दादांच्या राष्ट्रवादीनं यंदाच्या निवडणुकीत 41 आमदार निवडून आणले. अशातच घवघवीत यशानंतर आज यशवंतराव चव्हाणांच्या पुण्यतिथीनिमित्त अजित पवार स्मृतीस्थळावर अभिवादन करण्यासाठी उपस्थित राहिले. त्यावेळी अजितदादा आणि रोहित पवारांची भेट झाली. दोघांमधील संवादही चर्चेचा विषय ठरला. एवढंच काय, रोहित पवारांना दादांनी आग्रह करत खाली वाकून नमस्कार करायला लावला. त्यानंतर अजितदादांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. त्यावेळी रोहित पवारांसोबतच्या भेटीबाबत बोलताना अजित पवारांनी शरद पवारांचाही उल्लेख केला.
यशवंतराव चव्हाणांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यासाठी प्रीतीसंगमावर अजित पवार आणि रोहित पवार उपस्थित होते. त्यावेळी दोघेही आमने-सामने आले. दोघांमध्ये मिश्किल सवांद झाला. अजित पवारांनी अगदी काका या नात्यानं हक्कानं रोहित पवारांना खाली वाकून नमस्कार करायला लावला. त्यानंतर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. त्यावेळी ते म्हणाले की, "मराठी संस्कृती आहे... आम्ही लवकर आलो असतो तर, साहेबांची भेट झाली असती... आम्ही दर्शन घेतलं असतं... टायमिंग जुळलं नाही... मी डिपार्मेंटवरही चिडलो... रोहितला मी शुभेच्छा दिल्यात..."
No comments:
Post a Comment