Monday, January 4, 2021

आज जिल्ह्यात 41 जण बाधित

 सातारा दि.5 (जिमाका): जिल्ह्यात काल सोमवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 41 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले तर 1 बाधिताचा मृत्यु झाला असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये 
*सातारा तालुक्यातील* पिरवाडी 1, झरेवाडी 1, कराड 2, वळसे 1, ढोणे कॉलनी सातारा 1,
*कराड तालुक्यातील* कराड 3, सोमवार पेठ 3, गुरुवार पेठ 2, 
*फलटण तालुक्यातील* फलटण 2, शुक्रवार पेठ 1, कोळकी 2, फडतरवाडी 1, पाडेगाव 1,लक्ष्मीनगर 1,
*खटाव तालुक्यातील* वडूज 1, ललगुण 1, 
*माण तालुक्यातील* जांभुळणी 1, विरकरवाडी 1,मार्डी 1,
*कोरेगाव तालुक्यातील* कोरेगाव 7, आसनगाव 2,
*खंडाळा तालुक्यातील* नायगाव 1, 
*वाई तालुक्यातील* आसले 1, 
इतर 2,
बाहेरील जिल्ह्यातील नवी मुंबई 1,
*1 बाधिताचा मृत्यु*
खासगी हॉस्पीटलमध्ये बुध ता. खटाव येथील 82 वर्षीय पुरुषाचा उपचारदम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.
*एकूण नमुने -289880*
*एकूण बाधित -54857*  
*घरी सोडण्यात आलेले -52343*  
*मृत्यू -1795* 
*उपचारार्थ रुग्ण-719* 
0000

बाळासाहेब थोरात काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देणार? याच महिन्यात जाहीर होणार नवे प्रदेशाध्यक्ष?

 कराड
बाळासाहेब थोरात काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. काँग्रेसमध्ये होत असलेल्या बदलांच्या पार्श्वभूमीवर बाळासाहेब थोरात यांनी ही भूमिका घेतल्याचं म्हटलं जात आहे. थोरात आज राजधानी दिल्लीत असून पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी घेणार असल्याचं समजतं. आता काँग्रेस हायकमांड बाळासाहेब थोरात यांच्या भूमिकेवर कोणती भूमिका घेणार हे पाहावं लागेल.
काँग्रेसमध्ये बाळासाहेब थोरात यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष आणि विधीमंडळ नेता अशी दोन पद होतं. शिवाय महाविकास आघाडी सरकारमध्येही ते महसूल मंत्री आहेत. यातून महाराष्ट्रतील काँग्रेसचे काही नेते सतत दिल्लीत जाऊन प्रदेशाध्यक्ष बदलावे यासाठी हायकमांडकडे लॉबिंग करत होते अशी चर्चा होती.प्रदेशाध्यक्ष बदलाची मागणी आणि त्यावरुन दिल्लीत होणारी चर्चा यामुळे अखेरीस बाळासाहेब थोरात यांनी स्वतःहून पद सोडण्याचा निर्णय घेतल्याचं समजतं.दरम्यान याआधीही अशाच चर्चांमुळे बाळसाहेब थोरात यांनी काँग्रेसचं प्रदेशाध्यक्षपद सोडण्याची तयारी दाखवली होती. त्यांनी दिल्लीत जाऊन तसं कळवलं देखली होतं. महाराष्ट्र प्रभारी एच के पाटील यांच्या मुंबईत दौऱ्यातही थोरात यांनी त्यांच्यासमोर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पद सोडण्याची मानसिकता बोलून दाखवली होती.
राज्यात महाविकास आघाडी सरकार आणण्यात आणि काँग्रेसने याला पाठिंबा द्यावा यात बाळासाहेब थोरात यांनी मोठी भूमिका बजावली होती. तसंच त्यांच्याच नेतृत्त्वात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची कामगिरी समाधानकारक होती. परंतु प्रदेशाध्यक्ष बदलाची मागणीमुळे थोरात यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपद सोडण्याचं ठरवलं असं सांगितलं जात आहे.
प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचा राजीनामा स्वीकारल्यानंतर या पदासाठी कोणाची वर्णी लागणार याचीही चर्चा सुरु आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी आ पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावासह राजीव सातव, अमित देशमुख, यशोमती ठाकूर, नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार यांची नावं चर्चेत असल्याचं समजतं. याबाबतचा निर्णय या महिन्यातच अपेक्षित आहे.

विलासकाकांच्या जाण्याने एका राजकीय युगाचा अंत झाला - आ पृथ्वीराज चव्हाण यांनी वाहिली श्रद्धांजली

कराड: 
काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते विलासराव पाटील उंडाळकर यांच्या निधनाने एका राजकीय युगाचा अंत झाला आहे. काही दिवसांपूर्वी सातारा येथील रुग्णालयात विलासकाकांना उपचारासाठी दाखल केल्यानंतर  रुग्णालयात  त्यांच्या तब्येतीबाबत चौकशी केली होती. डॉक्टरांच्या सोबत चर्चेत सांगितले होते कि, काकांची तब्येत सुधारत आहे. तसेच काल सुद्धा काकांचे पुत्र उदयसिंह पाटील यांच्या सोबत फोनवरून काकांच्या तब्येतीची चौकशी केली होती. पण अचानक आज सकाळी समजले कि काकांचे दुःखद निधन झाले. हि बातमी अत्यंत वेदनादायी होती. काकांच्या जाण्याने राज्यातील काँग्रेसचे पितृतुल्य छत्र हरपले आहे अशा शब्दात आ पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली .

आ चव्हाण बोलताना पुढे म्हणाले, काका काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते होते तसेच कोणत्याही पक्षांच्या आमिषाला बळी न पडता काँग्रेसची विचारधारा त्यांनी कधीही सोडली नाही. विचारधारेशी ते कायम प्रामाणिक राहिले. कधीही ते जातीयवादी विचारधारेकडे झुकले नाहीत. जनतेशी नाळ असलेला नेता अशी त्यांची ओळख होती. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे ते सलग ३५ वर्षे आमदार होते. तसेच जवळपास १२ वर्षे राज्याच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून विविध खात्यांची त्यांनी जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली होती. 
विलासकाकांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबियांवर जो दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्यांच्या दुःखामध्ये मी व माझे कुटुंबीय सहभागी आहोत.

अभिनेते रितेश देशमुख यांनी केले ऍड उदयसिह पाटील यांचे सांत्वन...

कराड 
अभिनेते व पूर्व मुखमंत्री विलासराव देशमुख यांचे चिरंजीव रितेश देशमुख यांनी माजी मंत्री विलासकाका पाटील उंडाळकर यांच्या निधनाची बातमी कळताच त्यांचे चिरंजीव उदयसिह पाटील यांचे त्यांच्या घरी जाऊन सांत्वन केले.
 राज्याचे माजी मुख्यमंत्री कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते विलासरावजी देशमुख व माजी मंत्री विलासकाका उंडाळकर यांचे राजकारणा व्यतिरिक्त घनिष्ठ संबंध होते. अनेक वेळा विलासकाका विलासराव देशमुख यांच्या घरी उपस्थित असत. याच ठिकाणी विलासराव देशमुख यांचे चिरंजीव अभिनेते रितेश देशमुख यांची व विलास काका यांची ओळख घट्ट होत गेली. दोन दिवसापासून कराडमधील भोसले कुटुंबीयांकडे पाहुणे म्हणून आलेल्या रितेश देशमुख यांना विलास काका यांच्या निधनाची बातमी समजताच ते विलास काकांच्या अंतिम दर्शनासाठी आले होते. त्यांच्याबरोबर भारतीय जनता पार्टीचे कार्यकारणी सदस्य अतुल भोसले कृष्णा अभिमत विद्यापीठाचे कुलपती सुरेश बाबा भोसले हे उपस्थित होते. अंतिम दर्शनानंतर अभिनेते रितेश देशमुख यांनी माध्यमांशी बोलण्यास नकार दिला. मात्र, विलासकाका पाटील-उंडाळकर यांचे चिरंजीव ऍड. उदयसिंह पाटील यांचे सांत्वन करून काकांचे अंतिम दर्शन घेतले

Sunday, January 3, 2021

आज जिल्ह्यात 61 जण बाधीत

सातारा दि.3 (जिमाका): जिल्ह्यात काल शनिवार रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 61 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून एका कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये 
*सातारा तालुक्यातील* सातारा शहरातील  सातारा 2, शाहूपूरी 1, सोमवार पेठ 1, शाहूपूरी 2, मंगळवार पेठ 1, चिमणपुरा पेठ 4, गुरुवार पेठ 1, नागठाणे 1, सदरबझार 1,  शाहूनगर 2, वडूथ 1, पिरवाडी 3, पाटखळ 1, देगाव तांबे 1, सोनगाव 1, अपशिंगे 1, अतित 1, नुने 1, 
*कराड तालुक्यातील*  शहरातील गुरुवार पेठ 1, चरेगाव 2, शिरवडे 2,   हणबरवाडी 1, कृष्णा मेडीकल कॉलेज 1,
*फलटण तालुक्यातील*  जिंती 1, लक्ष्मीनगर 1, 
*कोरेगाव तालुक्यातील*   कोरेगाव 1, सुभाषनगर 1, वाघोली 1, जळगाव 1, 
*जावली तालुक्यातील*   कुडाळ 1, बामणोली 1, 
*खंडाळा तालुक्यातील*  औंध 1,
*माण तालुक्यातील* तडवळे 1, दहिवडी 2, म्हसवड 2, जांभूळणी 1, मार्डी 5, धामणी 1, बोथे 1, 
*वाई तालुक्यातील*  राऊतवाडी 2, धावडी 1, चिंधवली 1, परतवाडी 1, 
कोरोनाबाधिताचा मृत्यू
खाजगी हॉस्पीटलमध्ये आयटीआय रोड ता. सातारा येथील 54 वर्षीय पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
 
*एकूण नमुने -288529*
*एकूण बाधित -55006* 
*घरी सोडण्यात आलेले -52080* 
*मृत्यू -1794* 
*उपचारार्थ रुग्ण-1132* 
0000

Saturday, January 2, 2021

आज जिल्ह्यातील 44 जण बाधीत

 सातारा दि.2 (जिमाका): जिल्ह्यात काल शुक्रवार रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 44 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून एका कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये 
*सातारा तालुक्यातील* सातारा शहरातील रंगोली कॉलनी 1, समतापार्क शाहूपूरी 1,  चारभिंतीजवळ शाहूनगर 4, कामेरी 6, पाटखळ 1, आसले 1, आझादनगर 1, धनवडेवाडी 1, चिंचणेर निंब 1, कोंडवे 1, वनवासवाडी 1,  
*कराड तालुक्यातील* करवडी 1, गोवारे 2, 
*फलटण तालुक्यातील* डोळेगाव 1, तरडगाव 1,  पाडेगाव फार्म 2, 
*खटाव तालुक्यातील* पुसेगाव 1, कलेढोण 1,
*कोरेगाव तालुक्यातील* कोरेगाव 1, भाडळे 1, 
*जावली तालुक्यातील* कुंभारगणी 1, रायगाव 2, सायगाव 4, कुडाळ 1, 
*खंडाळा तालुक्यातील* अंदोरी 1, अहिरे 1, 
*वाई तालुक्यातील* मोडेकरवाडी 1, 
*महाबळेश्वर तालुक्यातील* मारीपेठ 1, 

एका कोरोनाबाधिताचा मृत्यू
खाजगी रुग्णालयात उपचार घेतलेल्या पिंगळी ता. माण  मधील 75 वर्षीय पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

*एकूण नमुने -287311*
*एकूण बाधित -54945*  
*घरी सोडण्यात आलेले -52075*  
*मृत्यू -1793* 
*उपचारार्थ रुग्ण-1077* 
0000

Friday, January 1, 2021

आज जिल्ह्यातील 70 जण बाधीत

सातारा दि.1 (जिमाका): जिल्ह्यात काल गुरुवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 70 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर  1 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये 
        *सातारा तालुक्यातील* सातारा 2,  मंगळवार पेठ 1,शनिवार पेठ 1, गोडोली 1,कोडोली 1, सम्राटनगर 1, चिमणपुरा पेठ 1, शाहुनगर 2,  तामजाई नगर 1, डोळेगाव वेचले 2, देगाव 1, तडवळे 1, मारवे 1, देगाव 1,
           *कराड तालुक्यातील* शनिवार पेठ 1,
           *पाटण तालुक्यातील* निसरे 1,  
             *फलटण तालुक्यातील* ननवरे वस्ती 4, गोखळी खटकेवस्ती 2, साखरवाडी 2, निंभोरे 1, राजाळे 1,  
            *खटाव तालुक्यातील* मायणी 1,  निमसोड 2, वडूज 1,
           *माण तालुक्यातील* गोंदवले 1, मार्डी 1, पुकळेवाडी 1, पानवन 1, लोधवडे 1, मार्डी 2, म्हसवड 4,
           *कोरेगाव तालुक्यातील* भाडळे 1, रहिमतपूर 2, दुघी 1,  
           *जावली तालुक्यातील* कुडाळ 1, महामुलकरवाडी 4, बामणोली 1,
           *खंडाळा तालुक्यातील* लोणंद 1, 
           * वाई तालुक्यातील* व्याहळी 1, भीवडी 1,
        *महाबळेश्वर तालुक्यातील* मेटगुटाड 2, पाचगणी 2,
           *इतर* 1, अंबवडे 5, भादे 1, 

*बाहेरील जिल्ह्यातील* राजुरी 1, 
*1 बाधिताचा मृत्यु*
खासगी हॉस्पीटलमध्ये बोडके ता. माण येथील 47 वर्षीय महिलेचा मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे. 

*एकूण नमुने -286263*
*एकूण बाधित -54901*  
*घरी सोडण्यात आलेले -52005*  
*मृत्यू -1792* 
*उपचारार्थ रुग्ण-1104* 
0000