Monday, May 3, 2021

सातारा जिल्ह्यात उद्यापासून कडक लोकडाऊन ; पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांची माहिती

सातारा
 जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधित रूग्ण मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. कोरोनाचा पाॅझिटीव्हचा दर वाढलेला त्याचबरोबर मृत्यदरही वाढत आहे. त्यामुळे जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेवरील वाढणारा ताण कमी करण्यासाठी सातारा येथे जिल्ह्यातील पदाधिकारी व अधिकाऱ्यांची बैठक पूर्ण झाली आहे. उद्यापासून (दि.4 मे) कडक लाॅकडाऊन लावण्यात येणार असल्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी पत्रकारांना सांगितले.

सातारा येथे शासकीय विश्रामगृहात जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि जिल्हाप्रशासनाची महत्वपूर्ण बैठक नुकतीच संपन्न झाली. या बैठकीस पालकमंत्री बाळासाहेब पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, माजी मुख्यमंत्री व आ. पृथ्वीराज चव्हाण, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, आ. शशिकांत शिंदे, प्रभारी जिल्हादंडाधिकारी रामचंद्र शिंदे, पोलिस अधीक्षक अजयकुमार बंन्सल, अंचल दलाल यांच्यासह अधिकारी वर्ग उपस्थित होते.

पालकमंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले, जिल्ह्यात सध्या लाॅकडाऊन लावलेला आहे. मात्र तरीही कोरोनाचे रूग्ण वाढत आहे. तेव्हा उद्यापासून कडक लाॅकडाऊन लावण्यात येणार आहे. त्यासंबधी पोलिस यंत्रणा, मुख्याधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी हे सध्याकाळी नियमावली जाहीर करणार आहेत

काशिळ येथील कोविड रुग्णालयाचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते उद्घाटन...कराड व सातारा तालुक्यातील कोरोना रुग्णांना मिळणार चांगली आरोग्य सुविधा...

वेध माझा ऑनलाइन
सातारा दि.3 (जिमाका): काशिळ येथे सुरु करण्यात आलेल्या कोविड रुग्णालय कराड व साताराच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे. कराड व सातारा तसेच काशिळ परिसरातील नागरिकांना या रुग्णालयाचा लाभ होणार असून या रुग्णालयामार्फत कोविड रुग्णांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळणार आहेत, असा विश्वास पालकमंत्री बाळसाहेब पाटील यांनी व्यक्त केला.
काशिळ येथील कोविड रुगणालयाचे उद्घाटन पालकमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते आज झाले. यावेळी ते बोलत होते. या उद्घाटन प्रसंगी गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शभूराज देसाई, खासदार श्रीनिवास पाटील, माजी मुख्यमंत्री तथा आमदार पृथ्वीराज चव्हाण, प्रभारी जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, तहसीलदार आशा होळकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण आदी उपस्थित होते.
या कोविड रुग्णालयात 32 आयसीयु बेड व 31 ऑक्सिजन बेड असे एकूण 63 बेड आहेत. यामधील सुरुवातीला 32 ऑक्सिजन बेड कार्यान्वीत करण्यात येणार असून काही दिवसानंतर आयसीयु बेड कार्यान्वीत करण्यात येणार आहे.  सातारा येथील जम्बो कोविड रुग्णालयातील आरोग्य  यंत्रणेमार्फत या कोविड रुग्णालयात आरोग्य सेवा दिल्या जाणार आहेत. या रग्णालयात कोविड रुग्णांना चांगली आरोग्य सेवा मिळेल असा विश्वासही पालकमंत्री श्री. पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.
काशिळ येथील कोविड रुग्णालय हे मोक्याच्या ठिकाणी असून काशिळ परिसरातील नागरिकांबरोबर कराड व सातारा तालुक्यातील नागरिकांना आरोग्य सेवा मिळणार आहे. शासनाने हॉस्पीटल सुरु केले आहे. या रुग्णलयासाठी नियमित कर्मचारी द्यावेत. हे रुग्णालय सुरु केल्याबद्दल माजी मुख्यमंत्री तथा आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी शासनाचे आभार मानले.
0000

Sunday, May 2, 2021

शाहू चौक मित्रपरिवाराच्या वतीने कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांना मोफत जेवणाची सोय ; सम्पूर्ण जिल्ह्यातूंन उपक्रमाचे होतय कौतुक...

वेध माझा ऑनलाइन
कराड
येथील शाहू चौक मित्रपरिवाचा माणुसकीचे साक्षात दर्शन देणारा उपक्रम सध्या सम्पूर्ण जिल्ह्यात चर्चेत आहे कोरोना रुग्णाच्या नातेवाईकांना सकाळी आणि संध्याकाळी मोफत जेवण रुग्णालयात जाऊन  पुरवण्याचे काम हा ग्रुप करतोय शहर व परिसरात अनेक रुग्ण विविध रुग्णालयात दाखल आहेत त्याठिकाणी या ग्रुप चे सदस्य जाऊन ही सेवा मोफत देत आहेत 

सध्या कोरोनाचा हाहाकार सम्पूर्ण शहर व परिसरात पाहायला मिळतोय रोज शेकडो रुग्ण विविध हॉस्पिटल मधून ऍडमिट होत आहेत अनेक रुग्ण बाहेर गावाहून येथील हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत त्यांच्याबरोबर त्यांचे नातेवाईक बरोबर असतात मात्र त्यांना रुग्णांसंवेत थांबता येत नाही तर त्यांना बाहेर कुठेतरी आसरा घेऊन थांबावे लागते बाहेर गावाहून आल्यामुळे त्यांच्या जेवणाचीही परवड होताना दिसते आहे  मात्र शाहू चौक मित्र परिवाराने या नातेवाईकांना दोन वेळच मोफत जेवण देण्याची सोय केली आहे आणि  माणुसकीचे दर्शन देत आपली बांधीलकी जपली आहे
कोणतेही सामाजिक काम करण्याकरिता एखाद्या राजकीय पदाची किंवा राजकारणात असण्याची गरज नसते तर लोकांसाठी माणुसकीने विचार करण्याची प्रवृत्ती व समाजाप्रती आपण काही देणे लागतो याची जाणीव महत्वाची असते याच जाणीवेतून येथील शाहू चौक मित्रपरिवार सध्याच्या कोविड च्या संकटात लोकांच्या मदतीला धावून आला आहे रुग्णांच्या नातेवाईकांना दोन वेळच मोफत जेवण देत या शाहू चौक मित्रपरिवाराने शहरातल्या  "मी पुढारी' असे स्वतःला म्हणवणार्यापुढे  आपलाआदर्श निर्माण केला आहे 
कोणी गरजू व्यक्तीला मदत हवी असल्यास आमच्या ग्रुपशी येथील शाहू चौक येथे संपर्क साधावा असे आवाहन शाहू चौक परिवराच्या वतीने करण्यात आले आहे

रोहित, ऑक्सिजन टँकर पाठवलाय, स्वतः थांबून उतरवून घे... आर आर आबांच्या मुलाला अजितदादांचा फोन...

वेध माझा ऑनलाइन
रात्री साडेबारा वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आर. आर. पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांना फोन केला. ‘रोहित, ऑक्सिजन टँकर पाठवला आहे. तू स्वतः थांबून तो उतरवून घे’ अजितदादांच्या फोननंतर क्षणाचाही विलंब न करता रोहित पाटील यांनी मध्यरात्री सांगलीत जाऊन ऑक्सिजन टँकर उतरवून घेतला. त्यांनतर यातील 23 जंबो टाक्या आणि 2 ड्युरा टाकी ऑक्सिजन घेऊन रोहित पाटील स्वतः ग्रामीण रुग्णालयात रात्री उशिरा उपस्थित झाले. ऑक्सिजनभावी कोरोनाग्रस्त रुग्ण दगावू नयेत, याची काळजी घेत मध्यरात्री रुग्ण वाचवण्यासाठी आबांच्या मुलाने केलेली ही धडपड नक्कीच कौतुकास्पद आहे.

सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यात कोरोनाने अक्षरशः थैमान घातले आहे. दररोज शंभरहून अधिक जणांना कोरोनाची बाधा होत आहे. तासगाव शहरासह ग्रामीण भागातही कोरोनाचा विळखा अधिक घट्ट होत आहे. शहरातील ग्रामीण रुग्णालय तसेच अन्य खासगी ठिकाणी कोरोना हॉस्पिटल सुरु करण्यात आली आहेत. मात्र रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने गरजूंना ऑक्सिजन, व्हेंटिलेटरचे बेड उपलब्ध करुन देताना प्रशासनाची दमछाक होत आहे. रुग्णांच्या नातेवाईकांचीही जिल्हाभर बेड शोधताना फरफट होत आहे.

गेल्या काही दिवसांत रुग्णसंख्या वेगाने वाढत असल्याने आमदार सुमन पाटील, रोहित पाटील यांच्या प्रयत्नातून येथील ग्रामीण रुग्णालयात कोरोनाग्रस्तांसाठी 56 ऑक्सिजनेटेड बेड उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. त्यामुळे या ठिकाणी सध्या अनेक रुग्णांवर उपचार सुरु आहेत. मात्र एकूणच राज्यभरात रुग्णसंख्या वाढ वेगाने होत असल्याने ऑक्सिजनचा मोठा तुटवडा भासत आहे.

तासगावतही कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजन कमी पडत आहे. या स्थितीनंतर तासगावातील रुग्णांसाठी ऑक्सिजन टँकर उपलब्ध करुन घ्यावा, अशी मागणी रोहित पाटील यांनी राज्य सरकारकडे केली होती. या मागणीचा ते सतत पाठपुरावा करत होते. तासगावातील गंभीर स्थिती ते सरकारच्या निदर्शनास आणून देत होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे त्यांनी ऑक्सिजन टँकरची मागणी लावून धरली होती.

अखेर काल मध्यरात्री अजित पवारांनी रोहित पाटील यांना फोन केला. ‘रोहित, ऑक्सिजनचा टँकर पाठवला आहे. तू स्वतः थांबून तो उतरवून घे’ या अजितदादांच्या सूचनेनंतर रोहित पाटील स्वतः मध्यरात्री घरातून बाहेर पडले. भारत गॅसच्या विवरण केंद्रावर रात्री उशिरापर्यंत थांबून त्यांनी ऑक्सिजनचा टँकर उतरवून घेतला

कराड पालिकेचे गटनेते राजेंद्रसिह यादव "कोरोना पॉझिटिव्ह'; सर्वांनी काळजी घ्या - गटनेत्यांचे आवाहन...

कराड 
कराड शहरातील नागरिकांची सेवा करताना विविध लोकांचा संपर्क आला दरम्यान कोरोना चाचणी करून घेतली असता कोरोना बाधित झालो आहे. यातून मी लवकर बरा होऊन पुन्हा आपल्या सेवेत रुजू होईल अशी माहिती जनशक्ती आघाडीचे गटनेते राजेंद्रसिंह यादव यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. 

माझ्यावर निरातिशय प्रेम करणार्‍या कराडकर नागरीकांनी माझ्या प्रकृती विषयी सातत्याने विचारणा करुन माझी अत्यंत काळजीने विचारपूस केली या सर्व सह्रदयींसाठी मी मनोभावे वस्तुस्थिती मांडतो आहे. कोरोना महामारीची झळ कराडकरांना लागू नये, यासाठी गेली वर्षभर मी नगरपरिषद, शाहीर आत्माराम यादव प्रतिष्ठान या माध्यमातुन गरजुंसाठी धान्य वाटप, भाजीपाला वाटप, सॅनिटायझर, मास्कचे वाटप, लसीकरण आणि कराड शहरातील वेगवेगळ्या गल्ली - मोहल्ल्यात तसेच झोपडपट्यांमधे स्वखर्चाने केलेली औषध फवारणी अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून सातत्याने समाजात वावरत असल्यामुळे नुकताच मी कोरोना पाॅझिटीव्ह झालो आहे. गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्यांनी योग्य ती वैद्यकीय चाचणी करुन स्व:ताची काळजी घ्यावी. माझ्यावर योग्य ते उपचार सुरु आहेत. लवकरच मी यातून बरा होऊन कोरोना महामारीच्या या संकटात कराडकरांच्या मदतीसाठी हजर होईन.

2217 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 44 बाधितांचा मृत्यू

 सातारा दि. 2 (जिमाका): जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 2217 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित  आले असून 44 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.
  तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 173 (5514), कराड 263 (16191), खंडाळा  134 (6608), खटाव 206 (9177), कोरेगांव 207 (9060),माण 144 (6643), महाबळेश्वर 76 (3370), पाटण 77 (4377), फलटण 278 (13589), सातारा 494 (24626), वाई 134 (8138 ) व इतर 31 (579) असे आज अखेर  एकूण   107472  नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत. 
  तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या  तर आज  अखेर मृत्यू झालेल्या  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 0 (104), कराड 10 (449), खंडाळा 3 (85), खटाव 6 (262), कोरेगांव 0 (234), माण 2 (143), महाबळेश्वर 0 (32), पाटण 0 (119), फलटण 6 (193), सातारा 13 (755), वाई 4 (198) , व इतर 0, असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 2574 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
0000

Saturday, May 1, 2021

2383 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 34 बाधितांचा मृत्यू

सातारा दि. 1 (जिमाका): जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 2383 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित  आले असून 34 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.
  तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 117 (4941), कराड 309 (15953), खंडाळा  209 (6474), खटाव 145 (8971), कोरेगांव 273 (8853),माण 123 (6499), महाबळेश्वर 25 (3294), पाटण 71 (4300), फलटण 406 (13361), सातारा 515 (24132), वाई 165 (8004 ) व इतर 25 (548) असे आज अखेर  एकूण   105350  नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत. 
  तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या  तर आज  अखेर मृत्यू झालेल्या  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 1 (104), कराड 7 (439), खंडाळा 0 (82), खटाव 3 (256), कोरेगांव 1 (234), माण 0  (141), महाबळेश्वर 1 (32), पाटण 1 (119), फलटण 3 (187), सातारा 9 (742), वाई 8 (194) , व इतर 0, असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण  2530 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
0000