Saturday, April 13, 2024

दहावी, 12 वी चा निकाल कधी लागणार ? वाचा बातमी...

वेध माझा ऑनलाईन।यावर्षी दहावी आणि बारावीची परीक्षा कॉपीमुक्त होण्यासाठी सगळ्या परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे लावणे बंधनकारक केलेले होते. आता याच पार्श्वभूमीवर जुलै महिन्यामध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळकडून दहावी बारावीच्या प्रत्येक परीक्षा केंद्राची तपासणी केली जाणार आहे.

त्या परीक्षा केंद्रावरचे सगळे सीसीटीव्ही कॅमेरे चालू आहे का? त्याला बॅकअप आहे का? याची पडताळणी देखील होणार आहे. ज्या परीक्षा केंद्र बोर्डाच्या आदेशानुसार सीसीटीव्ही कॅमेरे बसवणार नाहीत. तेथील केंद्राची मान्यता देखील रद्द केली जाणार आहे.

यावर्षी सीबीएससी बोर्डाने देखील दहावीच्या परीक्षेसाठी बेस्ट ऑफ फाईव्हची पद्धत सुरू केलेली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने हा फॉर्मुला अवलंबला आहे. आता ओपनबुक परीक्षा पद्धती अंमल अवलंबण्याची सीबीएससी बोर्डाची तयारी आहे.

या नवीन पद्धतीमुळे कॉपी करण्याच्या प्रकाराला कायमस्वरूपीचा आळा बसणार आहे. असा विश्वास या निर्णया मागे असणार आहे. त्याचप्रमाणे परीक्षांचे स्वरूप देखील बदलणार आहे. सेमिस्टर पद्धतीने ही परीक्षा होऊ शकते, असे शिक्षक तज्ञांनी सांगितलेले आहे.

इयत्ता दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा संपल्यानंतर त्यांच्या उत्तर पत्रिकांची तपासणी चालली आहे. आतापर्यंत या दोन्ही वर्गाच्या 85 टक्के उत्तरपत्रिका तपासून पूर्ण झालेल्या आहेत. त्याचप्रमाणे प्रात्यक्षिक परीक्षेचे गुण शाळांनी ऑनलाईन पद्धतीने बोर्डाला देखील पाठवलेले आहे. दरवर्षी आपण पाहिले तर बारावीचा बोर्डाचा निकाल हा जूनच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होतो. तर दहावीच्या बोर्डाचा निकाल हा दुसऱ्या आठवड्यात जाहीर होतो. परंतु आता यावर्षी दहावी आणि बारावीचे निकाल हे 5 जून पूर्वीच लागणार आहे.

Friday, April 12, 2024

काँग्रेस अल्पसंख्याक पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी झाकीर पठाण यांची निवड

वेध माझा ऑनलाईन। सातारा जिल्हा राष्ट्रीय काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष झाकीर पठाण यांची अल्पसंख्याक सेलच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.अल्पसंख्यांक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार इम्रान प्रतापगडी यांनी ही निवड केली असून याबाबतचे पत्र झाकीर पठाण यांना देण्यात आले आहे.
 
झाकीर पठाण हे गेली 35 वर्षे काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून काम पाहत आहेत. त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना राष्ट्रीय काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष म्हणून संधी देण्यात आली होती. त्यांच्या संघटन कौशल्याची दखल घेत राष्ट्रीय काँग्रेसचे अल्पसंख्यांक विभाग उपाध्यक्ष व महाराष्ट्र अल्पसंख्याक विभागाचे प्रभारी माननीय मोहम्मद अहमद खान यांच्याकडे महाराष्ट्र काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेशाध्यक्ष मा. आमदार वजहद मिर्झा यांनी त्यांना पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष करण्याकरिता शिफारस केली होती त्यांच्यावर आता पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
 या निवडीबद्दल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, खासदार इम्रान प्रतापगडी ,आमदार वझाजात मिर्झा, मा. आमदार एम एम शैख, मा.आमदार मुझफर हुसैन, डॉ सुरेश जाधव, रणजितसिंह देशमुख, संजय तडाखे , राहुल काळोखे, रजिया शेख,इचलकरंजीचे नगर सेवक इम्रान मकानदार यांच्यासह काँग्रेस नेते व कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले.

सांगली लोकसभेसाठी काँग्रेसचे विशाल पाटील बंडाच्या तयारीत ; पक्ष कार्यालयावरील काँग्रेस शब्द पुसून टाकला :

वेध माझा ऑनलाईन ।
महाविकास आघाडीमध्ये सांगली लोकसभेची  जागा ठाकरे गटाला गेल्यानंतर काँग्रेसचे इच्छुक उमेदवार विशाल पाटील हे नाराज असून बंडाच्या तयारीत आहेत. विशाल पाटील यांच्या समर्थकांकडून मिरज तालुका काँग्रेस कमिटी बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. तसेच सांगलीतील पक्ष कार्यालयावरील काँग्रेस शब्द पुसून टाकला आहे. त्यामुळे सांगली लोकसभेसाठी विशाल पाटील अपक्ष लढण्याची शक्यता जोर धरत आहे.

२ दिवसांपूर्वीच विशाल पाटील आणि विश्वजित कदम यांनी सांगलीच्या जागेबाबत फेरविचार करण्यात यावा असे आवाहन महाविकास आघाडीच्या नेत्यांना केलं होते. त्यानंतर आज सांगलीमध्ये काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची तालुका न्याय बैठक पार पडली आहे. या बैठकीमध्ये विशाल पाटील यांनी सांगली लोकसभा निवडणूक लढवावी अशी आग्रहाची मागणी काँग्रेस कार्यकर्त्यांनी केली. एवढंच नव्हे तर कवठे महांकाळ, मिरत तालुक्याच्या कार्यकर्त्यांनी थेट राजीनामा देण्यास सुरुवात केली आहे. तर मिरज तालुक्याची काँग्रेसची कमिटी बरखास्त करण्यात आली आहे. सांगली जिल्ह्यात काँग्रेसचं नाव घ्यायचं नाही, अशी भूमिका आता काँग्रेस कार्यकर्ते घेत आहेत. या घडामोडींनंतर आता विशाल पाटील अपक्ष लढण्याच्या तयारीत आहेत का? अशा चर्चांना उधाण आलंय.

महत्वाची बाब म्हणजे विशाल पाटील यांच्या समर्थकांकडून उमेदवारीचे २ अर्ज घेण्यात आले आहेत. त्यामुळे विशाल पाटील बंड करून अपक्ष निवडणूक लढवणार हे जवळपास नक्की वाटत आहे. विशाल पाटील अपक्ष लढल्यास काँग्रेस हायकमांड काय भूमिका घेणार?? विशाल पाटील यांच्यावर कारवाई करणार का? हे पाहणे महत्वाचे ठरेल. 

बारामतीत पवार विरुद्ध पवार रंगला सामना ; शरद पवार म्हणाले...सुनेत्रा पवार या मूळ पवार नाहीत ; बारामतीत वातावरण तापणार ;

वेध माझा ऑनलाईन ।बारामतीमध्ये पवार विरूद्ध पवार अशी सुरू असणारी लढाई आता ओरिजनल पवार यांच्यापर्यंत येऊन पोहोचली आहे. लेकीला निवडून दिलं आता सूनेला निवडून द्या, असं आवाहन अजित पवार यांनी बारामतीकरांना केलं होतं. यावरून सुनेत्रा पवार या मूळ पवार नाही असं वक्तव्य शरद पवार यांनी केलंय. इतकंच नाहीतर सुनेत्रा पवार मूळ पवार नसून त्या बाहेरच्या असल्याचे म्हटलंय. मूळ पवारांमध्ये फरक असंच विधान शरद पवारांनी केलंय. सुनेत्रा पवार या लोकसभेच्या बारामतीतील उमेदवार असून त्या अजित पवारांच्या पत्नी आहेत. सुनेत्रा पवार या मूळच्या धाराशीवच्या तेर गावच्या आहेत. मोठ्या राजकीय घराण्यातील आहे. आणि पद्मसिंह पाटलांच्या त्या बहिण आहेत. सुनेत्रा पवार यांचं वडिलांकडील नाव सुनेत्रा बाजीराव पाटील आणि आई द्रौपदी पाटील आहे. म्हणजेच लग्नानंतर सुनेत्रा पाटील या लग्नानंतर सुनेत्रा पवार झाल्यात. त्यामुळे अजित पवार यांनी सुनेत्रा निवडून द्या म्हणताच शरद पवार यांनी मूळ पवारचा मुद्दा उपस्थित केला ... एकूणच या सर्व घडामोडींमुळे बारामतीत वातावरण तापणार असच आता दिसू लागलय...

अभिनेते सयाजी शिंदे साताऱ्यातील रुग्णालयात दाखल ; पार पडली तातडीची हृदय शस्त्रक्रिया ; काय आहे बातमी...?


वेध माझा ऑनलाईन।
मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते सयाजी शिंदे यांच्या प्रकृतीबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. इतकेच नव्हे तर त्यांच्या हृदयावर तातडीने शस्त्रक्रिया पार पडल्याचे समोर आले आहे. दिनांक ११ एप्रिल २०२४ रोजी अचानक छातीत त्रास जाणवू लागल्याने सयाजी यांना साताऱ्यातील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर डॉक्टरांनी तातडीने त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्याचे सुचविले आणि ही शस्त्रक्रिया पार पडली.

अभिनेते सयाजी शिंदे यांच्यावर नुकतीच अँजिओप्लास्टी सर्जरी पार पडली आहे. यानंतर त्यांच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांकडून माहिती देण्यात आली आहे. माहितीनुसार, सयाजी शिंदे यांच्यावर साताऱ्यातील प्रतिभा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्यावर डॉ. सोमनाथ साबळे यांच्या देखरेखीखाली उपचार सुरु आहेत.

Thursday, April 11, 2024

मी कोणाचेही आव्हान मानत नाही ; शशिकांत शिंदेंनी उदयनराजे यांचे नाव न घेता फोडली डरकाळी ;

वेध माझा ऑनलाईन।
खासदार श्रीनिवास पाटील व त्यांचे चिरंजीव सारंग पाटील यांना राष्ट्रवादी ने लोकसभा उमेदवार म्हणून साताऱ्यातून नाकारले त्यानंतर बऱ्याच गॅपने शशिकांत शिंदे यांची उमेदवारी याठिकाणी जाहीर झाली ... अशातच त्यांच्यासमोर उदयनराजे यांचे या निवडणुकीत आव्हान असणार आहे याबाबत शशिकांत शिंदे यांना विचारले असता... शशिकांत शिंदे म्हणाले... माझ्या समोर कोणाचेही आव्हान आहे असे मी मानत नाही... माझी उमेदवारी कोणत्या उमेदवाराशी किंवा व्यक्ती विरोधात नाही, तर तत्वाशी आहे... मी 24 तास काम करणारा कार्यकर्ता आहे...श्रीनिवास पाटील यांची उमेदवारी रद्द झाल्यानंतर मला पक्षाने लढायला सांगितले...पक्ष आणि नेता अडचणीत असताना मी लढायला उतरलो आहे... ही निवडणूक लोकांनी हातात घेतली आहे...आता जिल्हाच ठरवेल की इथल्या लोकांना खासदार म्हणून कोण पाहिजे ते...

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार या पक्षाची सातारा लोकसभेसाठीची उमेदवारी आमदार शशिकांत शिंदे यांना नुकतीच जाहीर झाली आहे त्यानंतर आज ते कराड येथील स्व यशवन्तराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते 

आमदार बाळासाहेब पाटील, पाटण राष्ट्रवादीचे नेते सत्यजित पाटणकर, काँग्रेस नेते ऍड उदयसिंह पाटील, शिवराज मोरे , शिवसेना जिल्हाप्रमुख हर्षद कदम समनवयक इंद्रजित गुजर राष्ट्रवादी युवकचे पोपटराव साळुंखे ,प्रशांत यादव जयंत बेडेकर तसेच लोकशाही आघाडी चे आजी माजी नगरसेवक महिला कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

यावेळी बोलताना शशिकांत शिंदे पुढे म्हणाले...हा जिल्हा यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा  आहे याठिकाणी कधीही जातीयवादाची बीजे येथील जनतेने पेरून दिलेली नाहीत याहीवेळी इथली जनता जातीयवादी प्रवृत्तीला थारा देणार नाही पवार साहेबांना हा जिल्हा मानतो... जनतेचा प्रतिनिधी म्हणून मला उमेदवारी मिळाली आहे... मला कोणाचेही आव्हान नाही... मी लढवैय्या नेते शरद पवार यांचा कार्यकर्ता आहे मी जनतेसाठी 24 तास काम करणारा कार्यकर्ता आहे विरोधकांनी खोट्या केसेस घालून विनाकारण त्रास देण्याचे राजकारण करून रडीचा डाव खेळू नये...विरोधकांनी लोकशाही मार्गाने निवडणुकीला सामोरे जावे...लोकांच्या मध्ये महायुतीच्या विरोधात सुप्त लाट आहे...त्यांच्या हुकूमशाही पद्धतीला जनता थारा देणार नाही...

रेंद्र पाटील माथाडी नेते आहेत त्यांची पक्षाची भूमिका व माझी भूमिका वेगळी आहे यापूर्वी  आम्ही कोणत्याही व्यासपीठावर असलो तरी  माथाडी म्हणून एकत्र असायचो...पण भाजपने राजकीय पक्षाप्रमाणे आता आमच्यातही फाटाफूट केली आहे...माथाडी लोकांचा शरद पवारांवर विश्वास आहे... आणि मीही त्यांच्याबाबत चांगले काम केले आहे, त्यामुळे माथाडी मतदार माझ्या पाठीशी ठाम राहील याचा मला विश्वास वाटतो...आमदार महेश शिंदे यांच्या डोक्यात या अडीच वर्षात हवा गेली आहे लवकरच ती हवा लोकं त्यांच्या डोक्यातून काढतील... त्यांच्या कार्यपद्धतीवर जनतेची खूप नाराजी आहे असेही ते यावेळी म्हणाले

दरम्यान शशिकांत शिंदे यांची आज भर दुपारच्या उन्हात कराडच्या कोल्हापूर नाक्यावर गाड्यांच्या ताफ्यासह एन्ट्री झाली... यावेळी आमदार बाळासाहेब पाटील व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी त्यांचे फटाक्यांची आतिषबाजी करत जोरदार स्वागत केलं तसेच याठिकाणी घोषणाबाजी देखील करण्यात आली महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला त्याठिकाणी अभिवादन करण्यात आलं

Wednesday, April 10, 2024

भाजपची 10 वी उमेदवार यादी जाहीर ; उदयनराजे यांचे यादीत नाव नाही...जिल्ह्यात चर्चेला उधाण ;

वेध माझा ऑनलाइन। बुधवारी भाजपकडून लोकसभा उमेदवारांची दहावी यादी जाहीर करण्यात आली आहे. परंतु या यादीमध्ये सुद्धा साताऱ्यातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेले उदयनराजे यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आलेला नाही. त्यामुळे आता पुढील यादीत उदयनराजे भोसले यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर करण्यात येईल की नाही? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. सध्या भाजपकडून आज जाहीर झालेल्या यादीत नाव उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये नेमक्या कोणत्या नेत्यांचा समावेश आहे हे पाहुयात.

भाजपची दहावी यादी...
चंदीगड – संजय टंडन

मैनपुरी – जयवीर सिंह ठाकूर


कौशांबी – विनोद सोनकर

फुलपूर – प्रवीण पटेल


इलाहाबाद – नीरज त्रिपाठी

बलिया– नीरज शेखर


मछलीशहर – बी.पी.सरोज

गाजीपूर – पारस नाथ राय

आसनसोल – एस. एस. अहलुवालिया

यादीत उदयनराजेंचे नाव नाही
भाजपने आज उमेदवारांची दहावी यादी जाहीर केली असली तरी या यादीत सातारा मतदारसंघाचा सस्पेन्स कायम ठेवला आहे. विशेष म्हणजे, सातारा मतदारसंघासाठी भाजपकडून उदयनराजे भोसले यांना उमेदवारी देण्यात येईल, अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे. परंतु आज दहावी यादी जाहीर करून देखील उदयनराजे यांचे नाव समोर आलेले नाही. त्यामुळे भाजप नेमकी काय खेळी खेळत आहे, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.